Studyfromhome.com Blog content is created for Primary Education Development.

Breaking

abhyas majha इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image

abhyas majha  इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image
Click On Image

بحث هذه المدونة الإلكترونية

الاثنين، 31 مايو 2021

مايو 31, 2021

बोधकथा - मनःशांती - Moral Story

 बोधकथा - मनःशांती - Moral Story


एका राजाने भगवान बुद्धांना विचारले, आपण कोण? मला आपल्यासारखी मनःशांती लाभेल का? यावर बुद्ध म्हणाले, अवश्य लाभेल. माझे विचार पण खुप दरिद्री होते. माझ्याजवळ खूप काही होतं; पण आत काहीच नव्हतं. जे मला जमलं ते तुला नक्कीच जमेल. 


जे एका बीजाला वृक्ष बनवने  शक्य आहे, ते दुसऱ्यालाही आहे. प्रत्येक बीजाचा वृक्ष बनू शकतो. तुझाही असाच शांतिवृक्ष बनेल. कारण मनुष्याची आंतरिक शक्ती सारखीच असते ; परंतु तुला त्यासाठी काहीतरी करावं लागेल. 


राजा म्हणाला, मी काहीही करण्यास तयार आहे. सर्वसंगपरित्यागसुद्धा करेन. बुद्ध म्हणाले, काही गमावून त्यागून शांती मिळत नाही. स्वत:जवळचे सर्व सोडायला तू सिद्ध आहेस. सोडशीलही; पण तुला शांती मिळणार नाही. जो स्वत:लाच हरवायला तयार असतो, त्यालाच शांती मिळते.



तात्पर्य : स्वत:जवळचे नव्हेतर स्वत:च समर्पित झाल्याशिवाय मन:शांती लाभत नाही.

السبت، 29 مايو 2021

مايو 29, 2021

बोधकथा - संपत्तीचा लोभ - Moral Story

 बोधकथा - संपत्तीचा लोभ - Moral Story

एक साधू एका जंगलातून जात होता. जंगलातून जात असताना अचानक त्याला एक मस्तक आणि पोलादी पाय असणारा एक विचित्र माणूस समोर आला. त्या माणसाला बघून साधूला थोड़े आश्चर्यच वाटले. आता पर्यंत या जंगलातून साधूने खूप वेळा भ्रमंती केली होती; पण अशा प्रकारचा माणूस भेटेल, अशी त्याला शंकासुद्धा आली नव्हती. 


कुतूहल म्हणून साधूने त्या माणसाला त्याच्या आहाराविषयी विचारले. यावर तो म्हणाला, मी भूखंड खातो आणि समुद्राचे पाणी पितो. तसा मी अत्यंत सुखी आहे. सर्व भौतिक सुविधा मला उपलब्ध आहेत. माझ्या आहारासाठी मी अनेक भूखंड आरक्षित केलेले आहेत, पण तरीही मला भविष्याची चिंता छळत आहे. 


यावर साधूने विचारले, इतकी सुखं पायाशी लोळत असताना तुला भविष्याची चिंता का बरं? तो माणूस म्हणाला, आज जरी मला प्रचंड जमीन व अमर्याद पाणी उपलब्ध असले तरी हे सारे गिळंकृत केल्यानंतर काय खाऊ? हा प्रश्न मला सतत छळत असतो.



तात्पर्य : माणसाला सत्ता, संपत्ती आणि सन्मान यांचा लोभही असाच अमर्याद असतो, तो आयुष्यभर  संपत नाही.

مايو 29, 2021

देशभक्तीपर गीत - जयोस्तुते

 देशभक्तीपर गीत - जयोस्तुते


जयोस्तुते श्री श्री महन्मंगले शिवास्पदे शिवास्पदे शुभदे। ।

स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे।।धृ.।।


राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीति संपदांची।

स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची।

परवशतेच्या नभात तूची आकाशी होशी।

स्वतंत्रते भगवती चांदणी चमचम लखलखशी ।।।।


गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली।

स्वतंत्रते भगवती तूच जी विलसतसे लाली।

तू सूर्याचे तेज उदधिचे गांभीर्यहि तूची।

स्वतंत्रते भगवती अन्यथा ग्रहण नष्टतेची  ।।।।


मोक्षमुक्ति ही तुझीच रूपे तुलाच वेदांती।

स्वतंत्रते भगवती योगिजन परब्रह्म वदती।

जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते।

स्वतंत्रते भगवती सर्व तव सहचारी होते ।।।।

हे अधम रक्त  रंजिते सुजन  पूजिते।

श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते।

तुजसाठि मरण ते जनन मरण ते जनन।

तुजवीण जनन ते मरण जनन ते मरण।

तुज सकल चराचर शरण चराचर शरण।

श्री स्वतंते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते।

                  -स्वातंत्र्यवीर सावरकर

الخميس، 27 مايو 2021

مايو 27, 2021

देशभक्तीपर गीत-आचंद्रसूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे

 

देशभक्तीपर गीत-आचंद्रसूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे


हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे

आचंद्रसूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे।।धृ.।।


कर्तव्यदक्ष भूमी, सीतारघूत्तमाची

रामायणे घडावी, येथे पराक्रमाची

शिर उंच उच व्हावळे, हिमवंत पर्वताचे

आचंद्रसूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे  ।।१।।


येथे नसो निराशा, थोड्या पराभवाने

पार्थास बोध केला, येथेच माधवाने

हा देश स्तन्य प्याला, गीतख्य अमृताचे

आचंद्र नांदो, स्वातंत्र्य भारताचे ।।२।।


येथेच मेळ झाला, सामर्थ्य संयमाचा

येथेच जन्म झाला, सिद्धार्थ गौतमाचा

हे क्षेत्र पुण्यदायी, भगवान् तथागताचे

आचंद्रसूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे ।।३।।


हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे

सत्यार्थ झुंड घ्यावी, या जागत्या प्रथेचे

येथे शिव-प्रतापी, नरसिंह योग्यतेचे

आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे ।।४।।

            - ग. दि. माडगूळकर 

الأربعاء، 26 مايو 2021

مايو 26, 2021

देशभक्तीपर गीत- या भारतात बंधुभाव नित्य वसू दे

देशभक्तीपर गीत- या भारतात बंधुभाव नित्य वसू दे

या भारतात बंधुभाव नित्य वसू दे। 

दे वरचि असा दे ।।धृ।।


हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसूदे

नांदोत सुखे गरीब अमीर एकमंतानी

संग हिंदू असो, ख्रिश्चन वा हो इस्लामी

स्वातंत्र्य-सुखा या सकलामाजी वसू दे। 

दे वरचि असा दे ।।१।।


सकळास कळो मानवता, राष्ट्रभावना।

हो सर्व स्थळी मिळूनी समुदाय प्रार्थना।

उद्योगी तरुण शीलवान येथे असू दे। 

दे वरचि असा दे ।।२।।

जातीभाव विसरुनिया एक हो आम्ही

अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी

खळ-निंदका मनीही सत्य न्याय वसू दे। 

दे वरचि असा दे ।।३।।


सौंदर्य रमो घरघरांत स्वर्गियापरी

ही नष्ट होऊ दे विपती भीती बावरी

तुकडयादास सदा या सेवेमाजी वसू दे।

दे वरचि असा दे ।।४।।

            -श्री संत तुकडोजी महाराज

مايو 26, 2021

देशभक्तीपर गीत- झेंडा आमचा

देशभक्तीपर गीत - झेंडा आमचा

झेंडा आमचा प्रिय देशाचा, फडकत वरी महान

करितो आम्ही प्रणाम याला, करितो आम्ही प्रणाम  ।।धृ।।



लढले गांधी याच्याकरिता, टिळक, नेहरु, लढली जनता

समर धुरंधर वीर खरोखर, अर्पूनि गेले प्राण...

करितो आम्ही प्रणाम याला, करितो आम्ही प्रणाम ।।१।।



भारतमाता आमची माता, आम्ही गातो या जयगीता

हिमालयाच्या उंच शिखरावर, फडकत राही निशाण...

करितो आम्ही प्रणाम याला, करितो आम्ही प्रणाम।।२।।



या देशाची पवित्र माती, जुळवी आमच्या मधली नाती

एक नाद गर्जतो भारता, तुझा आम्हा अभिमान...

करितो आम्ही प्रणाम याला, करितो आम्ही प्रणाम ।।३।।



गगनावरि अन् सागरतीरी, सळसळ करिती लाटालहरी

जय भारत जय, जय भारत जय, गाताती जयगान...

करितो आम्ही प्रणाम याला, करितो आम्ही प्रणाम ।।४।।

                                         -वि.म. कुलकर्णी


مايو 26, 2021

बोधकथा - लोभी - Moral Story

 बोधकथा - लोभी - Moral Story

एकदा कृष्णा नदीला पूर आला होता. पूर पाहाण्यासाठी दोन्ही तिरावर लोकांनी गर्दी केली होती. त्यामध्ये चिकटपंतही उभे होते. इतक्यात कोणीतरी ओरडले, अरे ते पाहा घोंगडे चालले आहे. चिकटपंत नावाप्रमाणे चिक्कू, चिकट आणि लोभीही. त्यांनी मागचा पुढचा विचार न करता पाण्यात उडी मारली. ते घोंगडे तसे काही लांब नव्हते. चार हात पोहल्यावर ते त्यांच्या हातात आले; पण थोड्याच वेळाने  ते ओरडू लागले.  अहो कुणीतरी मला वाचवा. 


काठावरील लोक ओरडायला लागलीच. अहो ते घोंगडे तुम्हाला खेचून आणता येत नसेल, तर सोडून द्या ना. पाण्यात घोंगडे भिजल्यामुळे ते वजनदार झालेच असणार. मग कशाला हवे आहे. सोडून द्या आणि या काठावर.

यावर चिकटोपंत म्हणाले, अहो, हे घोंगड नाही तर चक्क अस्वल आहे. मी त्याला पकडले नसून, त्यानेच मला पकडले आहे. हे ऐकून काठावर असणारे पट्टीचे पोहणारे चार-पाच युवक पाण्यात उतरले आणि त्या अस्वलाच्या तावडीतून चिकटोपंतांची सुटका केली. अस्वलालाही कसेबसे तिरावर आणले. मग तेथे जमलेले लोक म्हणाले, अहो चिकटोपंत खुप जास्त लोभापायी आज तुमचा जीव जात होता. आता तरी शहाणे व्हा.



तात्पर्य ; अतिलोभ कधी कधी जीवावरही बेतू शकतो.

مايو 26, 2021

बोधकथा - मनाची एकाग्रता - Moral Story

 बोधकथा - मनाची एकाग्रता - Moral Story

एक तरुण साधूच्या आश्रमात गेला. त्याने त्यांना नमस्कार केला आणि म्हणाला, 'साधू महाराज, मी प्रभूच्या प्राप्ती करता पुष्कळ तपश्चर्या केली; परंतु तो मला काही भेटला नाही. असे का? देवाच्या प्राप्तीकरिता मी आणखीन किती तपश्चर्या करू?' 

साधू महाराज म्हणाले, 'देवप्राप्ती होईल; पण त्याला तुझी मनाची एकाग्रता असली पाहिजे. उदाहरणच हवे असेल तर ऐक. मी काल फिरत फिरत एका वाड्याजवळ गेलो होतो., वाड्याशेजारीच त्या मालकाची एक सुंदर अशी बाग होती. 



त्या झाडांना पाणी घालायचे म्हणून जवळच्या  विहिरीतील पाणी तेथील माळी काढत होता; पण ते दृश्य पाहून मला हसू आले. कारण तो जी  बादली विहिरीत सोडत होता, ती वर येईपर्यंत रिकामीच व्हायची. कारण विहिरीत सोडत असलेल्या बादलीस खूपशी छिद्रे होती. ती वर येईपर्यंत रिकामीच व्हायची. 

पाणी भरून घेण्यासाठी कितीही कष्ट घेतले तर ती रिकामीच येणार प्रथम बादली ठीक करून घ्यायला हवी. मनाचेही तसेच आहे. ध्यान धारणा, देवाची प्रार्थना करण्यासाठी लोक बसतात खरे; पण त्यांचे मन इकडे तिकडे भटकत असते. 

मनाची एकाग्रताच देवप्राप्ती करून देते. मन एकाग्र नसेल तर नुसतीच तपश्चर्या करून काय उपयोग?'

 

तात्पर्य : मनाच्या एकाग्रतेशिवाय फलप्राप्ती नाही.

الثلاثاء، 25 مايو 2021

مايو 25, 2021

बोधकथा - लांडग्याचे नशीब - Moral Story

 बोधकथा - लांडग्याचे नशीब - Moral Story

एकदा एक गाडीवान आपल्या गाडीतून मासे घेऊन चालला होता. जंगलातून भक्ष्य शोधण्यासाठी बाहेर पडलेल्या कोल्ह्याने ते पाहिले. मासे पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले. मासे मिळवायचे कसे, याचा विचार तो करू लागला. त्याला एक युक्ती सुचली. 


गाडीवान आपल्याच नादात गाडी चालवत पुढे निघाला होता. वाटेत त्याला हा कोल्हा मरून पडलेला दिसला. त्याने विचार केला की या कोल्ह्याचे कातडे विकून आपल्याला चार पैसे मिळतील, म्हणून त्याने कोल्ह्याच्या शेपटीला धरले आणि त्याला मागे टाकले. 


कोल्ह्याने गाडीवानाचे लक्ष नाही, असे पाहून मनसोक्त मासे खाल्ले आणि गाडीतून उडी मारून निघून गेला. त्याला गाडीतून उडी मारताना एका लांडग्याने पाहिले. लांडग्याने त्याला असे विचारले की तू गाडीमध्ये काय करत होता. कोल्ह्याने काय ते सांगितले. मग लांडगाही मेल्याचे सोंग घेऊन गाडीपुढे पडला.



गाडीवानाला खूप आनंद झाला. त्याला असे वाटले,की लांडग्याचेही कातडे विकून आपल्याला खूप पैसे मिळतील. तो लांडग्याला उचलायला गेला तर तो खूप जड वाटला. गाडीवानाला लांडगा उचलता येईना. म्हणून मग त्याने एक पोते आणले, त्यात लांडग्याला घातले आणि ते पोते आपल्या गाडीला घट्ट बांधले आणि गाडीबरोबर फरफटत नेले.



तात्पर्य : एका व्यक्तीसाठी फायदेशीर ठरलेली गोष्ट दुसऱ्यासाठीही तशीच ठरेल, असे नाही.

الاثنين، 24 مايو 2021

مايو 24, 2021

बोधकथा - पापमुक्त - Moral Story

 बोधकथा - पापमुक्त - Moral Story

एकदा एकनाथ महाराजांना एका गृहस्थांनी विचारले, 'महाराजा,आपले जीवन किती साधे, किती निष्पाप आहे. आमचे मात्र असे का?' एकनाथ महाराज थोडा वेळ थांबले आणि म्हणाले, 'माझी गोष्ट तूर्तास तरी राहू दे. तुझ्याविषयी कळलेली गोष्ट सांगतो. गोष्ट फारच वाईट आहे. अगदी तुझ्या जीव्हारी लागणारी आहे, पण सत्य ते स्वीकारावेच लागेल. तू आजपासून सात दिवसांनी मरणार आहेस.'



हे ऐकून तो गृहस्थ अस्वस्थ झाला. फक्त सात दिवसांनी मरण, अवघे एकशे अडुसष्ट तास बाकी. त्याला काही सुचेना. तो आजारी पडला. अंथरुणावरच त्याचा दिवस जाऊ लागला. सातव्या दिवशी नाथांनी विचारले, 'कसं काय?' यावर तो म्हणाला, 'कुठलं काय महाराज, जातो आता.' यावर नाथ म्हणाले, 'या सात दिवसात किती पापकर्म केलीस?' 


तो मनुष्य म्हणाला, 'पापाचा विचार करावयास वेळच मिळाला नाही. सारखं डोळ्यांसमोर मरण येत होतं.' नाथ म्हणाले, 'आमचं जीवन निष्पाप का याचं उत्तर तुला मिळालं ना?'



तात्पर्य : मरणाचे स्मरण नेहमी ठेवणे हाच पापापासून मुक्त होण्याचा मार्ग आहे.

مايو 24, 2021

बोधकथा - प्रवृत्ती - Moral Story

 बोधकथा - प्रवृत्ती - Moral Story

एकदा एका साधूकडे राम आणि शाम असे दोन मित्र गेले. रामने विचारले. महाराज मोक्षासाठी घर का सोडावे लागते? घरीच राहिल्याने मोक्ष मिळणार नाही काय?' यावर साधू महाराजांनी रामकडे पाहिले आणि म्हणाले, 'कोण म्हणतो, मोक्षासाठी घर सोडायलाच पाहिजे. जनकासारख्या राजाला राजावाड्यात राहूनच मोक्ष मिळाला तर मग तुला घर सोडायची काय गरज आहे?' बाहेर थांबलेला शामही मग साधू महाराजांकडे आला आणि म्हणाला, 'घर सोडल्याशिवाय मोक्ष मिळेल का?' क्षणभर साधूंनी शामकडे पाहिले आणि म्हणाले, 'घरात राहून सुखासुखी मोक्ष मिळाला असता तर शुक्रासारख्यांनी गृहत्याग का केला असता?' 


राम आणि शाम यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली. पण वाटेत जाता जाता त्यांचे भांडण लागले. राम म्हणाला, 'मोक्ष मिळवण्यासाठी घर सोडायचेच कशाला? घरात, राहूनदेखील मोक्ष मिळू शकतो. तर शाम म्हणाला, 'घर सोडल्याखेरीज मोक्ष मिळत नाही.' ते दोघे भांडू लागले. 


नंतर ते साधू महाराजांकडे गेले आणि आपल्या भांडणाचे कारण सांगितले. साधू महाराज म्हणाले, 'दोन्ही गोष्टी बरोबर आहेत. फक्त फरक इतकाच की ज्याची जशी वृत्ती तसा त्याचा विचार. तुमच्या दोघांचेही जसे विचार आहेत तसाचा मोक्ष मिळणार.'


तात्पर्य : जीवनात वृत्ती आणि प्रवृत्तीला महत्त्व असते.

الأحد، 23 مايو 2021

مايو 23, 2021

बोधकथा - वाघ आणि वाटसरू - Moral Story

 बोधकथा - वाघ आणि वाटसरू - Moral Story

एका जंगलात एक वाघ राहात होता. म्हतारा झाल्यामुळे त्याला  पूर्वीसारखी शिकार करता येईना. त्याला एक युक्ती सुचली. जंगलातील दर्भ गोळा करून त्याने त्याचे कडे तयार केले आणि आपल्या पुढच्या पायात घालून जंगलातील तळ्याकाठी बसला. आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना सांगू लागला, मी दानधर्म करत आहे. हे सोन्याचे कंकण मला दान करायचे आहे. ज्याला हवे असेल त्याने माझ्याजवळ येऊन घेऊन जावे. 


त्याचे हे बोलणे एका वाटसरूने ऐकले. सोन्याचे कंकण हे शब्द ऐकून त्याला लोभ सुटला. तो वाघाजवळ गेला; पण थोड्या अंतरावरून त्याला म्हणाला, 'तू तर हिंस्त्र पशू आहेस, मी जवळ आल्यावर तू मला मारणार नाहीस कशावरून?' तेव्हा वाघ म्हणाला, 'अरे, आयुष्यभर तेच करत आलो ना मी! त्याचाच आता. मला पश्चात्ताप होत आहे.


माझ्या गुरूंनी पापक्षालन करण्यासाठी मला दानधर्म करायला सांगितला आहे. आता हे सोन्याचे कंकण तेवढे राहिले आहे. ते मला दान करायचे आहे. तळ्यात स्नान कर आणि या दानाचा स्वीकार कर.' वाटसरू स्नानासाठी जाताना चिखलात अडकून पडला. थांब तुला वर काढतो, असे म्हणत वाघाने त्याच्यावर झडप घातली आणि त्याला खाऊन टाकले.


तात्पर्य : लोभाच्या आहारी जाऊन कुणावरही आंधळा विश्वास, ठेवणे घातक असते "

السبت، 22 مايو 2021

مايو 22, 2021

बोधकथा - सकारात्मक दृष्टिकोन - Moral Story

 बोधकथा - सकारात्मक दृष्टिकोन - Moral Story

आपण अनेक प्रकारची कामे करत असतो. त्यातील काही कामात आपल्याला यश येते तर काही कामात अपयश येते. जे लोक अपयशातूनही शिकतात आणि पुन्हा नव्या जोमाने कामाला लागतात, ते यशस्वी होतात; पण अपयशाने खचून जाऊन, निराश होऊन बसलेल्या लोकांना काहीही मिळत नाही. 


आपला दृष्टीकोन सकारात्मक असेल तर मनातल्या वाईट शंका आपोआप दूर होतात. स्वामी विवेकानंदांनी हाच उपदेश नेहमी केला. एक तरुण विवेकानंदांजवळ आला आणि म्हणाला, 'स्वामीजी, तासन्तास बंद खोलीत बसून मी ध्यानधारणा करतो. परंतु मनाला शांती लाभत नाही.' यावर स्वामीजी म्हणाले, "सर्वात प्रथम खोलीचा दरवाजा उघडा ठेव. आपल्या जवळपास राहणाऱ्या दु:खी, रोगी व भुकेल्या माणसांचा शोध घे. त्यांना यथाशक्ती मदत कर.' यावर त्या तरुणाने आपली शंका विचारली, 'एखाद्या रोग्याची सेवा करताना मी स्वत:च आजारी पडलो तर?' विवेकानंद म्हणाले, 'तुझ्या या शंकेने मला असं वाटतं की, प्रत्येक चांगल्या कार्यात तुला काहीतरी वाईट दिसतं. म्हणून तुला शांती लाभत नाही. 

शुभकार्याला उशीर लावू नये तसेच त्यातील उणिवाही शोधू नयेत, हाच मन:शांती मिळविण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग आहे.'


तात्पर्य : कोणतेही विधायक काम करताना सकारात्मक दृष्टी हवी.

الجمعة، 21 مايو 2021

مايو 21, 2021

बोधकथा - लाचारपणा घातक - Moral Story

 बोधकथा - लाचारपणा घातक - Moral Story

एक राजा दररोज सायंकाळी घोडागाडीत बसून फिरायला जात असे. त्याचा हा दिनक्रम अनेक वर्षे चालू होता. असाच एकदा तो आपल्या घोडागाडीतून फिरावयास बाहेर पडला. त्या अगोदर रस्ता रिकामा करण्यासाठी त्याचे सेवक पुढे गेले होते. 


सेवक रस्ता रिकामा करीत पुढे जात, पाठीमागून राजाची घोडागाडी जाई. असे असताना रस्त्यामध्ये एक साधू पाय पसरून पडलेला दिसला. या साधूची कीर्ती त्या संपूर्ण राज्यात होती. राजाही त्या साधूचा आदर करत असे; पण राजाच्या घोडागाडीला व्यवस्थित जाता यावे म्हणून राजाच्या सेवकांनी त्या साधूला पाय मागे घेण्याबद्दल फर्मावल; पण त्या साधूने त्या सेवकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. 


सेवक त्या साधूला पाय मागे घेण्यासाठी विनवत होते; पण साधू काही हलायला तयार नव्हता. सेवक आणि साधूमधील वाद बराच वेळ सुरू होता. इतक्यात खुद्द राजाची घोडागाडी तिथे आली. सेवक आणि साधूतील वाद ऐकून राजा साधूला म्हणाला, 'महाराज, आपण इतका वाद का घालत आहात? तुम्ही पाय मागे का घेत नाही?' 

साधू म्हणाला,मी कधीही हात पसरले नाहीत, मग पाय मागे घेण्याचे काय कारण?'


तात्पर्य : ज्यांचे हात मागण्यासाठी पुढे असतात. ती माणसे नेहमी लाचार राहातात.

مايو 21, 2021

बोधकथा - देशभक्ती - Moral Story

बोधकथा - देशभक्ती - Moral Story

 

प्राचीन काळात मगध साम्राज्य अतिशय भरभराटीला आलेले साम्राज्य होते. चंद्रगुप्त मौर्य मगधचा सम्राट होता. अतिशय न्यायी आणि तितकाच पराक्रमी असा हा राजा होता. आचार्य चाणक्य त्याचा मार्गदर्शक आणि प्रमुख सल्लागार होता. 


चंद्रगुप्ताच्या राज्यात एकदा ऐन थंडीच्या दिवसांत घोंगड्या चोरीला जाऊ लागल्या. अनेक प्रयत्न करूनही चोर सापडत नव्हते. लोक मात्र थंडीने आजारी पडत होते. यावर उपाय म्हणून सरकारने घोंगड्या पुरवाव्यात, असे चाणक्याने सुचविले. चंद्रगुजाने ते मान्य केले आणि हजारो घोंगड्या आणल्या. त्यांच्या वितरणाची जबाबदारीही त्याने चाणक्यावरच टाकली. 


चोरांना ही गोष्ट कळली. त्यांनी एका रात्री चाणक्याच्या वाड्यात प्रवेश केला. पाहतात तर काय, हजारो घोंगड्यांचा ढीग लागलेला अन् शेजारी चाणक्य आणि त्याची वृद्ध आई मात्र भूमीवर झोपलेले. पांघरूणही नव्हते त्यांच्या अंगावर आश्चर्य वाटून चोरांनी चाणक्याला उठविले आणि विचारले की, 'वाड्यात हजारो घोंगड्या असून, तुम्ही त्यातली एखादी का वापरायला घेतली नाही?' 


चाणक्य म्हणाला, 'बाबांनो, या घोंगड्या माझ्या नाहीत. फक्त त्या वाटण्यासाठी माझ्याजवेळ दिल्या आहेत. जी वस्तू माझी नाही, तिचा उपभोग मी कसा काय घेणार? माझा त्यावर काय अधिकार आहे?'



तात्पर्य : हेच तत्त्व आचरणात आणून सार्वजनिक मालमत्तेचे आपण विश्वस्त आहोत, हे समजून घेतले तरच देशाची प्रगती होईल

مايو 21, 2021

बोधकथा - धैर्य - Moral Story

 बोधकथा - धैर्य - Moral Story

रामसिंग नावाचा सरदार एका गावातून दुसऱ्या गावात चालला होता. त्याला तसा त्या गावचा रस्ता माहीत नव्हता. म्हणून त्याने- एका वाटसरूला विचारले, "या गावाकडे जाणारा रस्ता.चांगला आहे काय?' 

चांगला आहे आणि अगदी रद्दड असला तरी तसा तो काही वाईट नाही.' रामसिंग घोड्यावरून चालू लागला. रस्ता तसा खराब होता; पण नंतर त्याने तो रस्ता पार करून त्या गावी पोहोचला.


लगेच काम करून आल्या वाटेने परत येताना त्याला पुन्हा तोच वाटसरू भेटला. वाटसरूने विचारले, 'कसा काय होता रस्ता?' यावर रामसिंग म्हणाला, 'रस्ता तसा खराबच होता. जाताना थोडा त्रास झाला; पण नंतर मनाने ते खाचखळगे स्वीकारले. त्यामुळे आता येताना अजिबात त्रास झाला नाही. 


एकदा मनाने अडचणींना स्वीकारले तर कठीण मार्गावरून जाताना त्याची तीव्रता कमी होते. म्हणजे एखाद्या कामाचा किंवा कष्टाचा भार आनंदाने उचलला तर तो हलका वाटतो आणि जड मनाने स्वीकारला तर तो खूपच जड वाटतो.


तात्पर्य : संकटाला धैर्याने सामोरे गेले तर त्याची तीव्रता कमीहोते.

مايو 21, 2021

बोधकथा - योग्य पात्रता - Moral Story

 बोधकथा - योग्य पात्रता - Moral Story 

अकबर बादशाह गुणग्राहक होता. त्याची कीर्ती ऐकून त्याच्या दरबारात एक चित्रकार आला व त्याने एक सुंदर चित्र काढले. बादशाहने त्याला बक्षीस देण्याचे ठरवले. आता त्याला बादशाहा मोठे बक्षीस देणार, हे लक्षात आल्याने दरबारातील इतर मंडळी जळफळली. बादशाह कारण नसताना एका सामान्य चित्रकाराला बक्षीस देत आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले; पण बादशाहच्याच दरबारातील काहींना हे मत मान्य नव्हते. या गुणी चित्रकाराची कदर करावी, असे त्यांना वाटले. शेवटी एकाने सुचवले की, हे चित्र दरबाराबाहेर चौकात लावावं व सर्वसामान्यांची प्रतिक्रिया आजमावावी. लोकांना ते आवडलं तर चित्रकाराला बक्षीस द्यावे. हे कसं करावं? असे बादशाहाने विचारताच सरदार म्हणाला, 'चित्रात जेथे चूक आढळेल तेथे प्रजेने फुली मारावी, असे जाहीर करावे.' 


बादशाहाला ही कल्पना पसंत पडली. त्यानंतर ज्याने त्याने येऊन चित्रावर जागोजाग फुल्या मारल्या. ते पाहून बादशाहाने त्याला बक्षीस द्यायचे नाकारले. त्याला वाईट वाटलं. तो अखेर बिरबलाकडे आला. बिरबिलाने बादशाहाकडे त्याची रदबदली केली; पण बादशाह काही ऐकायला तयार नव्हता. बिरबलाने चित्रकाराला सुचविले की, त्याने असेच दुसरे चित्र काढावे. चौकात लावावे व खाली लिहावे जो कोणी असे हुबेहुब चित्र काढू शकेल, त्यानेच फुली मारावी. यावेळी मात्र चित्रावर एकहीं फुली पडली नाही. 

अकबरालाही त्याची चूक कळली.



तात्पर्य : पात्रता नसताना दुसऱ्याच्या चुका काढणे खूप सोपे असते. स्वत:त बदल घडवणे खूप अवघड.

مايو 21, 2021

बोधकथा -फाजील आत्मविश्वास - Moral Story

बोधकथा -फाजील आत्मविश्वास - Moral Story

एक चिलटे एकदा सिंहासमोर गेले आणि म्हणाले, माझ्यापेक्षा तुझ्यात असे काय जास्त आहे रे?'तुला जर तसं वाटत असेल तर सांग काय जास्त आहे? तू आपल्या पंज्यांनी ओरबाडतोस आणि दातांनी चावतोस. एवढेच ना? मग त्यात काय आहे? एखादी बाई भांडायला लागली की ती सुद्धा असंच करते.


खरा मीच तुझ्यापेक्षा जास्त बलवान आहे. होऊन जाऊ दे आपली लढाई. आहे तुझी तयारी? मी तुला मुळीसुद्धा घाबरत नाही. एवढे म्हणून चिलटाने गुंगुं करून आपले रणशिंग फुकले आणि सिंहाच्या नाकावर जाऊन बसले. त्याबरोबर सिंह आपल्या पंजाने कातडी ओरबाडू लागला.


शेवटी दमून शरण आल्यासारखा तो स्वस्थ बसला. त्याबरोबर आपला विजय झाला असे समजून चिलटाने गुंगुं करीत पुन्हा एकदा विजयाचे रणशिंग फुकले आणि उडून गेले; पण थोड्याच वेळात ते एका कोळ्याच्या जाळ्यात सापडले. कोळ्याच्या भक्ष्यस्थानी पडताना ते स्वत:च म्हणाले, काय नशीब आहे पहा. सर्वात मोठ्या प्राण्याला नामोहरम करणाऱ्या माझ्यासारख्याला शेवटी या क्षुद्र कोळ्याच्या हातून मरण यावे लागतेय.


तात्पर्य : फाजील आत्मविश्वास नडतो.

الثلاثاء، 18 مايو 2021

مايو 18, 2021

बोधकथा - सत्कृत्य - Moral Story

बोधकथा - सत्कृत्य - Moral Story

 

अमेरिका स्वतंत्र झाल्यानंतरची घटना. रस्त्याच्या कडेने जात असताना एक लष्कराची गाडी अडचणीच्या जागेत अडकली. आतील शिपाई उतरून तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांच्यावरचा अंमलदार अधिकारी त्याना फक्त हुकूम देत होता. त्याने गाड़ी काढायला  मदत केली असती तर गाडी नक्की निघाली असती; पण तो होता साहेब. फक्त त्याने  हुकूम देत उभे राहणे  पसंत केले. 


तेवढ्यात तिकडून एक गाडी आली. त्या गाडीतून एक सज्जन उतरला. त्याने सैनिकांना गाड़ी काढण्यास हातभार लावला. गाडी अडचणीतून बाहेर पडली. दुसऱ्या गाडीतून आलेला तो सज्जन त्या अंमलदार साहेबाला म्हणाला,'पुन्हा गरज पडली तर मला बोलवत जा' आणि त्याने आपल्या कोटाच्या खिशात हात घातला. 


आपला पत्ता असलेले कार्ड बाहेर काढले व त्या अंमलदाराला दिले. त्याने ते सहज म्हणून वाचले. त्याला दरदरून घाम फुटला. कारण मदतीला आलेला तो सज्जन अमेरिकेचा सर्वेसर्वा अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन होता.



तात्पर्य : सत्कृत्यासाठी कष्टताना पद, प्रतिष्ठा बाजूस ठेवावी.

مايو 18, 2021

बोधकथा -परमेश्वराचा दृष्टीक्षेप- Moral Story

बोधकथा -परमेश्वराचा दृष्टीक्षेप- Moral Story

रामपूर नावाचे गाव होते. त्या गावावर कर्मकांड आणि अंधश्रद्धेचा खूपच पगडा होता. सगळे गाव धर्ममार्तडांच्या अधिपत्याखाली होते. या सनातनी लोकांनी गावावर अनेक निर्बंध लादले होते. लोकांना कोणताही मनोरंजनाचा कार्यक्रम पाहण्याची, अगर त्यात भाग घेण्याची बंदी होती. 


एकदा एक नाटकमंडळी त्या गावात आली. गावातील निर्बंधमुळे त्या लोकांना गावकऱ्यांनी गावाच्या वेशीवरच अडवले;पण नाटकाचा निर्माता हुशार होता. त्याने कुणालाही न जुमानता नाटकाचा प्रयोग गावात करायचाच असा निश्चय केला. त्याने गावात तळ ठोकला. 


नाटक पाहायचे नाही, असा निर्बंध असल्यामुळे भीतीने लोक नाटक पाहायलाच जात नव्हते; पण तरीही नाटकाची जाहीरात रोज त्या गावात केली जात होती. त्याचा परिणाम एके दिवशी दिसून आला. एक दिवस खुद्द तेथील धर्ममार्तंडालाच नाटक पाहावेसे वाटले; पण आपणचा काढलेला आदेश कसा मोडायचा? शिवाय लोक काय म्हणतील? हाही प्रश्न त्याच्यासमोर होता. म्हणून त्याने त्या नाट्यगृहाच्या व्यवस्थापकाकडे एक चिठ्ठी पाठविली. 


'मला कोणीही पाहणार नाही, अशा दरवाजातून आत घ्याल का?' यावर व्यवस्थापकाने त्यांना उत्तर दिले, 'परमेश्वराच्या दृष्टीला पडणार नाही, असा एकही दरवाजा या नाट्यगृहाला नाही.'


तात्पर्य : सत्याचा वाटा, पळवाटा, आडवाटा नसतात. सत्य ते सत्यच, ते कधीही चुकविता येत नाही.

السبت، 15 مايو 2021

مايو 15, 2021

बोधकथा - दृष्टिकोन - Moral Story

बोधकथा - दृष्टिकोन - Moral Story

प्रख्यात ग्रीक तत्त्वज्ञ सॉक्रेटिस हा दिसायला कुरूप होता; पण त्याचा शिष्यगण मोठा होता. प्लेटो हा त्याचा प्रसिद्ध शिष्य, अर्वाचीन युरोपमधील तत्त्वज्ञानाचा पाया सॉक्रेटिसच्या तत्त्वज्ञानात शोधला जातो. एकदा प्लेटोने सॉक्रेटिसला आपल्या खोलीत फेऱ्या मारताना पाहिले. फेऱ्या मारताना तो सारखा आरशात आपला चेहरा निरखून पाही. प्लेटोला आश्चर्य वाटले. त्याच्या मनात आले, गुरुजी काही दिसायला देखणे नाहीत, मग ते वारंवार आरशात का पाहताहेत? 


धाडस करून त्याने सॉक्रेटिसला त्याबाबत विचारले. तेव्हा सॉक्रेटिस म्हणाला, मला माहीत आहे की, माझा चेहरा कुरूप आहे. म्हणूनच मी वारंवार आरशात पाहतो. मग ती कुरुपता लपविण्यासाठी सुंदर सामाजिक काम करण्याची मला प्रेरणा होत. माझ्या हातून एखादे सत्कर्म घडते.


'सॉक्रेटिसचे हे बोलणे ऐकून अवाक झालेला तो शिष्य म्हणाला, 'मग सुंदर माणसाने का आरशात पाहावं? सॉक्रेटिस म्हणाला, 'आपल्या सुंदरतेला साजेसं काम करण्यासाठी. तशी प्रेरणा होण्यासाठी,


तात्पर्य : आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, यावरच जीवन अवलंबून असते.

مايو 15, 2021

बोधकथा - सवयीचा गुलाम - Moral Story

बोधकथा - सवयीचा गुलाम - Moral Story

लालबहादूर शास्त्री प्रधानमंत्री झाल्यानंतरची गोष्ट.शास्त्रीजींच्या काटकसरीपणाबद्दल आपण अनेकदा ऐकलेय, वाचलेय; पण राजकारणातल्या या मर्यादा पुरुषोत्तमाची एक छोटीशी नोंद त्यांच्या मुलाने, सुनील शास्त्रीने लिहून ठेवली आहे. ती अशी, शास्त्रींना घरातून कार्यालयात न्यायला गाडी येई. त्याचवेळी सुनील टांग्यातून शाळेत जाई. एकदा त्याने गाडीतून शाळेत जाण्याचा हट्ट केला. 


तेव्हा शास्त्रीजी म्हणाले, 'अरे ही शासकीय गाडी. हिचे पेट्रोल भारत सरकार भरते. माझे पद गेले की ही गाडी जाईल; पण तुला तिची सवय लागेल. अशा गोष्टींची सवय ही वाईटच. कारण गाडीतून जाण्याचा आनंद खूप मोठा असतो; पण नंतर पुन्हा टांग्यातून जाण्याची वेळ आली तर मात्र तुला निराश वाटू लागेल. मग ही सवयच लावून घेतली नाही तर? 


आता दररोज माझ्या गाडीतून येशील, पण माझे पद गेले तर पुन्हा टांगा वापरशील का?


तात्पर्य : माणसाने श्रीमंतीचा गुलाम होऊ नये. तसेच गरिबीचाही गुलाम होऊ नये,

مايو 15, 2021

बोधकथा - संकल्प

बोधकथा - संकल्प

जनरल रोमेल म्हणजे साक्षात निर्भयतेची प्रतिकृती. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीचा तो फिल्ड मार्शल होता. एक कट्टर योद्धा असूनही मानवतावादी आणि दयाळू अशी त्याची ख्याती होती. 


त्याच्या नेतृत्वाखाली झालेल्या युद्धात शत्रूवर नाहक अत्याचार कधी झाले नाहीत. तो अतिशय धाडसी होता. कोणतेही आव्हान स्वीकारायला तो नेहमी तयार असे. त्यांच्याच जीवनातील ही कथा. 


लहानगा रोमेल एका डोंगरासमोर उभा होता. त्याचा मित्र त्याला म्हणाला, 'तू एका तासात या डोंगरावर जाऊन परत येशील तर मी तुला माझी सायकल बक्षीस देईन.' रोमेलला सायकलीपेक्षाही ते आव्हान आवडले. तो भराभर डोंगर चढायला लागला. परतला तेव्हा हातावर जखमा होत्या.


घड्याळात ५२ मिनिटे झाली होती. त्याचे सारे हात-पाय काट्यांनी रक्तबंबाळ झाले होते. मित्राने त्याचे अभिनंदन करून म्हटले, 'धाडसाने एखादे काम तडीला कसं न्यावं हे मी आज तुझ्याकडून "शिकलो.' रोमेल म्हणाला, 'कोणतीही गोष्ट कबूल करण्यापूर्वी त्याचा आधी विचार करावा, हे मी आज शिकलो.'


तात्पर्य : संकल्प केला की कितीही अडचणी आल्या तरी तो शेवटास नेणे महत्त्वाचे.

الأربعاء، 12 مايو 2021

مايو 12, 2021

बोधकथा - तीन तत्त्वे

 बोधकथा - तीन तत्त्वे

एकदा एका शेतकऱ्याने रात्री बुलबुल पक्ष्यांचे गाणे ऐकले. त्याला ते फार आवडल्यामुळे दुसऱ्या दिवशी फासा लावून त्याने बुलबुलला पकडले. त्याला हातात धरून तो म्हणाला, 'बरा चांगला सापडलास. आता पिंजऱ्यात राहून रोज माझ्यासाठी गाणे म्हण. 


'बुलबुल म्हणाला, 'पण आम्ही पिंजऱ्यात राहून कधीच गाऊ शकत नाही आणि मला पिंजऱ्यात टाकलंस तर मी झुरून झुरून मरून जाईन. मग तुला माझे गाणेच ऐकायला मिळणार नाही. 


शेतकऱ्याने थोडा वेळ विचार करून म्हटले, 'मग मी तुझा आज खिमाच करतो. असं म्हणतात की, बुलबुलचा खिमा फार चवीला असतो.' यावर बुलबुल गयावया करून म्हणतो, 'तू जर मला सोडून दिलेस तर मी तुला तीन महत्त्वाची तत्त्वे सांगतो, जी मला एका ऋषींनी सांगितली आहेस.' हे ऐकून कुतूहल वाटून शेतकऱ्याने त्या बुलबुल पक्षाला सोडून दिले. तोही आनंदाने शेजारच्या झाडावर बसला आणि त्या शेतकऱ्याला म्हणाला, 'आता ऐक. 


पहिलं तत्त्व म्हणजे बंदिवानाच्या वचनावर कधीही विश्वास ठेवू नये. दुसरं तत्त्व म्हणजे जे आपल्या, हातात असेल ते चांगलं सांभाळून ठेवावे आणि तिसरं म्हणजे जे आपल्या हातून गेलं असेल त्याबद्दल उगीच शोक करीत बसू नये.


तात्पर्य : गेलेल्या वाईट संधीबद्दल शोक करत बसू नये.

مايو 12, 2021

बोधकथा - मनाची निर्मळता

 बोधकथा - मनाची निर्मळता

बुद्धांच्या वृध्दापकाळची कथा. 

एका दुपारी एका झाडाखाली ते विश्रांती घेत होते. त्यांना खूप तहान लागलेली होती. आनंद हा त्यांचा लाडका शिष्य त्यांना पाणी आणण्यासाठी ओढ्यावर गेला होता. परंतु त्या ओढ्याच्या प्रवाहातून बैलगाड्या गेल्यामुळे सर्व पाणी गढूळ झाले होते. चिखल आणि कुजलेली पाने वर आली होती. ते पाहून पाणी न घेताच आनंद परतला. 

बुद्धांना म्हणाला, ओढ्यातील पाणी गढूळ झाल्याने मी परत आलो. आता नदीवरून पाणी घेऊन येतो. नदी खूपच लांब असल्याने बुध्दांनी त्याला ओढ्याचेच पाणी आणावयास सांगितले. 


आनंद परत गेला पण पुन्हा रिकाम्या हातांनीच परतला. बुध्दांनी त्याला परत पाठविले. यावेळी आनंद ओढ्यावर गेला. पाहतो तर काय, सर्व चिखल पाण्याच्या तळाशी गेला होता. पाणी नितळ झाले होते.


तात्पर्य : मनाची अवस्था अशीच असते. शांती आणि धीर धरला तर गोंधळाचा चिखल तळाशी बसतो.

مايو 12, 2021

बोधकथा - आंधळा सूड

बोधकथा - आंधळा सूड

एका जंगलामध्ये एक साप आणि एक गांधीलमाशी यांचे नेहमी भांडण होत असे. नेहमी गांधीलमाशी सापाच्या डोक्याला चावा घेऊन पळून जायची. सापाला नेहमी आपल्या विषाबद्दल गर्व असायचा. मी माझ्या विषाने शत्रूचा एका मिनिटात नि:पात करू शकतो, असा त्याच्यात अहंकार झाला होता. पण गांधीलमाशीच्या पुढ्यात मात्र तो काही करु शकत नव्हता. गांधीलमाशी जेव्हा त्याच्या डोक्याचा चाव घेऊन पळून जायची तेव्हा तीसुद्धा आपल्या जंगलच्या प्राण्यांमध्ये फुशारक्या मारायची बघा, मी त्या सापाला चावून चावून हैराण करते; पण तो माझं काही वाकडं करू शकत नाही. 

आहे की नाही मजा?

त्या सापाचे मित्र या गांधीलमाशीच्या फुशारकीबद्दल जेव्हा त्याला सांगत तेव्हा मात्र तो खूप संतापे; पण तो काही करु शकत नव्हता.असेच एके दिवशी पुन्हा गांधीलमाशी त्याच्या डोक्याचा चावा घ्यायला आली. आता मात्र तिचे धाडस वाढले होते. ती क्षणाक्षणाला त्याचा चावा घेऊ लागली. साप दु:खाने आणि संतापाने वेडा झाला. त्याचवेळी एक बैलगाडी तेथून जात होती. संतापाच्या भरात सापाने आपले डोकें त्या बैलगाडीच्या चाकाखाली घातले त्याचक्षणी साप आणि गांधीलमाशी दोघेही मरण पावले.


तात्पर्य : आंधळ्या सूडाचा मार्ग मृत्यूच्या दारापर्यंत जातो.

مايو 12, 2021

बोधकथा - गमावलेला आत्मविश्वास

 बोधकथा - गमावलेला आत्मविश्वास

एकदा एका सर्कशीच्या तंबूजवळ एक हत्तीचे पिल्लू बांधून ठेवलेले असते. ते पिल्लू आपले साखळदंड तोडण्याचा प्रयत्न करत असते, पण ते साखळदंड काही तुटत नाही. शेजारी हे दृश्य त्याची आई शांतपणे पाहात असते. 


बंटी आपल्या बाबांना सहज कुतूहल म्हणून विचारतो, बाबा हत्ती फार ताकदवान प्राणी आहे ना हो? मग ते हत्तीचे पिल्लू स्वतः साखळदंड तोडण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याला ते शक्य नाही; पण त्याच्या आईला तर ते शक्य आहे ना? मग ती इतकी शांत कशी?

यावर बाबा म्हणतात, हे बघ बंटी, त्या पिलाच्या आईलाही लहानपणी असेच साखळदंडाने बांधलेले असते. ती सुद्धा या पिलाप्रमाणेच साखळदंड तोडण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असते; पण ते तिला शक्य होत नाही. आता ती हत्तीण मोठी झालीय, तिची शक्तीही खूप आहे; पण लहान असताना तिच्या मनात आपल्याला साखळदंड तोडता येत नाहीत, ही सल आहे ती अजूनही आहे. तिची ताकद साखळदंड तोडण्याइतकी आहे. तिच्याकडे आत्मविश्वास नाही. जो तिने लहानपणीच गमावला आहे.


तात्पर्य : आत्मविश्वास गमावला की शक्य गोष्टीही अशक्य होतात.

مايو 12, 2021

बोधकथा - प्रयत्नांती परमेश्वर

 

 बोधकथा - प्रयत्नांती परमेश्वर

शांतिदूत मदर तेरेसा या ईश्वरालाच आपली संपत्ती मानत असत. इतर कुठलीही संपत्ती भरवसा ठेवण्यालायक नाही, कारण ती विपत्तीलाच कारणीभूत ठरते. असे त्या म्हणत. त्यांना एक मोठे अनाथलय काढायचे होते; परंतु त्यांच्याजवळ फक्त तीन शिलिंग एवढीच रक्कम होती. तेवढ्या अल्पश: पुंजीवर त्या एवढे मोठे कार्य सुरू करणार होत्या. 


त्यांच्या चाहत्यांनी असा सल्ला दिला की, फक्त तीन शिलिंगात काय होणार आहे? अगोदर भरपूर पैसा गोळा करावयास हवा; परंतु मदर तेरेसांना ते पटत नव्हते, त्या म्हणाल्या, खरं आहे. केवळ तीन शिलिंगात काहीही करणं या तेरेसाला शक्य नाही; परंतु तीन शिलिंग आणि प्रत्यक्ष ईश्वर माझ्याजवळ आहे. मी या तीन शिलिंगशिवाय अजून पैसे मिळवायचा आतापासून प्रयत्न करीन. 


प्रयत्न करणाऱ्याला केव्हाही ईश्वर यश देतोच; पण मी पैसेच नाही म्हणून हातावर हात ठेवून बसले तर मला माझ्या ध्येयापर्यंत जाताच येणार नाही. त्यामुळे प्रयत्न तर करायलाच हवा आणि बघता बघता त्यांच्या प्रयत्नांना यश आले. शेवटी एकदाचे मोठे अनाथालय काढण्यासाठी त्यांनी जो प्रयत्न केला त्याला यश आलेच.


तात्पर्य : प्रयत्न करणाऱ्याला यश मिळतेच. फक्त कष्ट करण्याची तयारी दर्शवली पाहिजे.