बोधकथा - वाघ आणि वाटसरू - Moral Story
एका जंगलात एक वाघ राहात होता. म्हतारा झाल्यामुळे त्याला पूर्वीसारखी शिकार करता येईना. त्याला एक युक्ती सुचली. जंगलातील दर्भ गोळा करून त्याने त्याचे कडे तयार केले आणि आपल्या पुढच्या पायात घालून जंगलातील तळ्याकाठी बसला. आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना सांगू लागला, मी दानधर्म करत आहे. हे सोन्याचे कंकण मला दान करायचे आहे. ज्याला हवे असेल त्याने माझ्याजवळ येऊन घेऊन जावे.
त्याचे हे बोलणे एका वाटसरूने ऐकले. सोन्याचे कंकण हे शब्द ऐकून त्याला लोभ सुटला. तो वाघाजवळ गेला; पण थोड्या अंतरावरून त्याला म्हणाला, 'तू तर हिंस्त्र पशू आहेस, मी जवळ आल्यावर तू मला मारणार नाहीस कशावरून?' तेव्हा वाघ म्हणाला, 'अरे, आयुष्यभर तेच करत आलो ना मी! त्याचाच आता. मला पश्चात्ताप होत आहे.
माझ्या गुरूंनी पापक्षालन करण्यासाठी मला दानधर्म करायला सांगितला आहे. आता हे सोन्याचे कंकण तेवढे राहिले आहे. ते मला दान करायचे आहे. तळ्यात स्नान कर आणि या दानाचा स्वीकार कर.' वाटसरू स्नानासाठी जाताना चिखलात अडकून पडला. थांब तुला वर काढतो, असे म्हणत वाघाने त्याच्यावर झडप घातली आणि त्याला खाऊन टाकले.
तात्पर्य : लोभाच्या आहारी जाऊन कुणावरही आंधळा विश्वास, ठेवणे घातक असते "
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق