बोधकथा - धैर्य - Moral Story
रामसिंग नावाचा सरदार एका गावातून दुसऱ्या गावात चालला होता. त्याला तसा त्या गावचा रस्ता माहीत नव्हता. म्हणून त्याने- एका वाटसरूला विचारले, "या गावाकडे जाणारा रस्ता.चांगला आहे काय?'
चांगला आहे आणि अगदी रद्दड असला तरी तसा तो काही वाईट नाही.' रामसिंग घोड्यावरून चालू लागला. रस्ता तसा खराब होता; पण नंतर त्याने तो रस्ता पार करून त्या गावी पोहोचला.
लगेच काम करून आल्या वाटेने परत येताना त्याला पुन्हा तोच वाटसरू भेटला. वाटसरूने विचारले, 'कसा काय होता रस्ता?' यावर रामसिंग म्हणाला, 'रस्ता तसा खराबच होता. जाताना थोडा त्रास झाला; पण नंतर मनाने ते खाचखळगे स्वीकारले. त्यामुळे आता येताना अजिबात त्रास झाला नाही.
एकदा मनाने अडचणींना स्वीकारले तर कठीण मार्गावरून जाताना त्याची तीव्रता कमी होते. म्हणजे एखाद्या कामाचा किंवा कष्टाचा भार आनंदाने उचलला तर तो हलका वाटतो आणि जड मनाने स्वीकारला तर तो खूपच जड वाटतो.
तात्पर्य : संकटाला धैर्याने सामोरे गेले तर त्याची तीव्रता कमीहोते.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق