बोधकथा - गमावलेला आत्मविश्वास
एकदा एका सर्कशीच्या तंबूजवळ एक हत्तीचे पिल्लू बांधून ठेवलेले असते. ते पिल्लू आपले साखळदंड तोडण्याचा प्रयत्न करत असते, पण ते साखळदंड काही तुटत नाही. शेजारी हे दृश्य त्याची आई शांतपणे पाहात असते.
बंटी आपल्या बाबांना सहज कुतूहल म्हणून विचारतो, बाबा हत्ती फार ताकदवान प्राणी आहे ना हो? मग ते हत्तीचे पिल्लू स्वतः साखळदंड तोडण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याला ते शक्य नाही; पण त्याच्या आईला तर ते शक्य आहे ना? मग ती इतकी शांत कशी?
यावर बाबा म्हणतात, हे बघ बंटी, त्या पिलाच्या आईलाही लहानपणी असेच साखळदंडाने बांधलेले असते. ती सुद्धा या पिलाप्रमाणेच साखळदंड तोडण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असते; पण ते तिला शक्य होत नाही. आता ती हत्तीण मोठी झालीय, तिची शक्तीही खूप आहे; पण लहान असताना तिच्या मनात आपल्याला साखळदंड तोडता येत नाहीत, ही सल आहे ती अजूनही आहे. तिची ताकद साखळदंड तोडण्याइतकी आहे. तिच्याकडे आत्मविश्वास नाही. जो तिने लहानपणीच गमावला आहे.
तात्पर्य : आत्मविश्वास गमावला की शक्य गोष्टीही अशक्य होतात.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق