बोधकथा -फाजील आत्मविश्वास - Moral Story
एक चिलटे एकदा सिंहासमोर गेले आणि म्हणाले, माझ्यापेक्षा तुझ्यात असे काय जास्त आहे रे?'तुला जर तसं वाटत असेल तर सांग काय जास्त आहे? तू आपल्या पंज्यांनी ओरबाडतोस आणि दातांनी चावतोस. एवढेच ना? मग त्यात काय आहे? एखादी बाई भांडायला लागली की ती सुद्धा असंच करते.
खरा मीच तुझ्यापेक्षा जास्त बलवान आहे. होऊन जाऊ दे आपली लढाई. आहे तुझी तयारी? मी तुला मुळीसुद्धा घाबरत नाही. एवढे म्हणून चिलटाने गुंगुं करून आपले रणशिंग फुकले आणि सिंहाच्या नाकावर जाऊन बसले. त्याबरोबर सिंह आपल्या पंजाने कातडी ओरबाडू लागला.
शेवटी दमून शरण आल्यासारखा तो स्वस्थ बसला. त्याबरोबर आपला विजय झाला असे समजून चिलटाने गुंगुं करीत पुन्हा एकदा विजयाचे रणशिंग फुकले आणि उडून गेले; पण थोड्याच वेळात ते एका कोळ्याच्या जाळ्यात सापडले. कोळ्याच्या भक्ष्यस्थानी पडताना ते स्वत:च म्हणाले, काय नशीब आहे पहा. सर्वात मोठ्या प्राण्याला नामोहरम करणाऱ्या माझ्यासारख्याला शेवटी या क्षुद्र कोळ्याच्या हातून मरण यावे लागतेय.
तात्पर्य : फाजील आत्मविश्वास नडतो.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق