बोधकथा - सत्कृत्य - Moral Story
अमेरिका स्वतंत्र झाल्यानंतरची घटना. रस्त्याच्या कडेने जात असताना एक लष्कराची गाडी अडचणीच्या जागेत अडकली. आतील शिपाई उतरून तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांच्यावरचा अंमलदार अधिकारी त्याना फक्त हुकूम देत होता. त्याने गाड़ी काढायला मदत केली असती तर गाडी नक्की निघाली असती; पण तो होता साहेब. फक्त त्याने हुकूम देत उभे राहणे पसंत केले.
तेवढ्यात तिकडून एक गाडी आली. त्या गाडीतून एक सज्जन उतरला. त्याने सैनिकांना गाड़ी काढण्यास हातभार लावला. गाडी अडचणीतून बाहेर पडली. दुसऱ्या गाडीतून आलेला तो सज्जन त्या अंमलदार साहेबाला म्हणाला,'पुन्हा गरज पडली तर मला बोलवत जा' आणि त्याने आपल्या कोटाच्या खिशात हात घातला.
आपला पत्ता असलेले कार्ड बाहेर काढले व त्या अंमलदाराला दिले. त्याने ते सहज म्हणून वाचले. त्याला दरदरून घाम फुटला. कारण मदतीला आलेला तो सज्जन अमेरिकेचा सर्वेसर्वा अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन होता.
तात्पर्य : सत्कृत्यासाठी कष्टताना पद, प्रतिष्ठा बाजूस ठेवावी.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق