Studyfromhome.com Blog content is created for Primary Education Development.

Breaking

abhyas majha इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image

abhyas majha  इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image
Click On Image

بحث هذه المدونة الإلكترونية

السبت، 31 أكتوبر 2020

स्वाध्याय Homework वर्ग 5 वा मराठी - 2 - बंडूची इजार

स्वाध्याय Homework वर्ग 5 वा मराठी - 2 - बंडूची इजार 

प्रश्न १ चर्चा करून उत्तरे लिहा.

(अ) बंडूची इजार लांब झाली होती म्हणून तिला कापून कमी केली. जर ती आखूड झाली असती, तर ती लांब करण्यासाठी काय करावे लागले असते ? शक्य तेवढे सगळे मार्ग सूचवा.

उत्तर : जर इजार आखूड झाली असती तर, (१) शक्य असेल तेथील शिलाई उधडून ती लांब करण्याचा प्रयत्न केला असता. (२) त्याच रंगाचा दुसरा कपडा आणून त्याला शिलाई मारून ती इजार लांब केली असती.

(आ) इजारीची चड्डी झाली, यात चूक कोणाची ?

उत्तर - इजारीची चड्डी झाली, यात कोणाचीही चूक नाही कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती प्रेमापोटी बंडूने सांगितलेले काम तत्परतेने करतात. यातूनच इजारीची चड्डी होते.

(इ) बंडूच्या इजारीचे पाय चार बोटे कापले, म्हणजे 'पाय' असणारी इजार सजीव आहे, असे आपण म्हणत नाही; पण बोलताना आपण असेच बोलतो. इजारीसारख्या कितीतरी वस्तूंना वेगवेगळ्या अवयवांची नावे वापरतात. त्यांची नावे सांगा.

उत्तर : सदर्याचा हात, चपलेचा अंगठा, फोनचा कान, रेडिओचे तोंड, कपाचा कान, बाटलीचे तोंड,

खालील वाक्यांमध्ये कंसातील शब्दापैकी योग्य शब्द वापरून वाक्ये पूर्ण करा. त्या वाक्यांचा अर्थ लिहा.

(कान, नाक, पाय, हात, डोळा, केस, पाठ, पोट, गळा तोंड)

उत्तर:

(अ) चुलीवरच्या तव्याची  पाठ काळीभोर झाली होती.

(आ) कपाचा कान तुटला होता, म्हणून दिलावरने चहा ग्लासात ओतला.

(इ) 'हा नारळ नासका निघणार,' नारळाचा डोळा बघून धनव्वा म्हणाली,

(ई) मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे  पोट फुगले होते.

(उ) कितीही जोर लावला तरी बाटलीचे तोंड  उघडेना.

(ऊ) चरवीतले दूध गंजात ओतले, तर ते गंजाच्या गळा पर्यंत आले.

(ए) सुईच्या नाकातून दोरा ओवून धोंडूमामांनी शिलाई मशीन सुरू केली.

(ऐ) आंब्याच्या कोईचे केस पांढरे होईपर्यंत गणू कोय चोखत राहिला.

(ओ) आपले शेकडो हात पसरून उभे असलेले   वडाचे झाड वर्षांनुवर्षे सगळ्यांना सावली देते.

(औ) खोलीतल्या एकमेव खुर्चींचा  पाय मोडला होता, म्हणून मी जमिनीवर बसलो.


प्रश्न:  'भिंतीला कान असतात ही म्हण आपण वापरतो. 'भिंतीला' कपांप्रमाणे कान नसतात. भिंतीला कान' असतात. हे कोणत्या अर्थाने वापरले आहे, ते शिक्षक, पालक यांच्याशी चर्चा करून सांगा.

उत्तर:   भिंतीला कान असतात याचा अर्थ एखादी गुप्त ठेवण्यासारखी गोष्ट असेल व ती हळू आवाजात बोलली तरी ती कोणाच्याही कानावर पडून ती गुप्त राहू शकत नाही. म्हणून ती गोष्ट गुप्त ठेवण्यासाठी तिची चर्चा करू नये कारण ती सर्वांना माहीत होऊ शकते. म्हणून भिंतीला कान असतात असे म्हटले जाते.

तोंडी प्रश्न

प्रश्न १ - खालील प्रश्नांची तोडी उत्तरे दया.

उत्तर

(१) बंडूचा स्वभाव कसा होता ? -      शांत व कष्टाळू 

(२) बंडू कोणत्या गावी राहात होता ?      -   बावची

(३) कोणी कपडे शिवले ?  -      धोंडूमामांनी

(४) बंडूने घरच्यांना काय दुरूस्त करायला दिले ? -     इजार

(५) 'इजार' शब्दांचा अर्थ सांगा ?  - विजार, पॅन्ट

(६) 'टाके' या शब्दांचे एकवचन सांगा.      टाका.

विभाग (ब)

प्रश्न १ - (अ) गाळलेल्या जागी कंसातील योग्य शब्द निवडून लिहा.

उत्तर

(१) अर्र,    इजार  जरा लांब झालीय.             (बाग/इजार/टोपी)

(२) आता  कॉलेजची  वेळ होईल.                  (शाळेची/जेवणाची/कॉलेजची)

(३) हितं  वैरण कापून कापून माज्या हाताचं तुकडं पडल्यात!                  (वैरण/लाकडे/कापडं)

(ब) खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

(१) बंडू कसा होता ?

उत्तर - बंडू शांत व कष्टाळू शेतकरी होता.

(२) बंडूने कुटुंबासाठी नवे कपडे का घेतले ?

उत्तर :     पीकपाणी चांगले झाल्यामुळे बंडूने कुटुंबासाठी नवे कपडे घेतले.

३)  बंडू हिरमुसला होऊन शेताकडे का गेला ?

उत्तर - आईने इजार एका कोनाड्यात फेकली म्हणून बंडू हिरमुसला होऊन शेताकडे गेला.

प्रश्न २ - खालील प्रश्नांची तीन ते चार वाक्यांत उत्तरे लिहा.

(१) बंडूचा दिनक्रम काय होता ?

उत्तर : सकाळी लवकर शेतात जायचे. दिवसभराचं काम आटोपून संध्याकाळी घराकडे यायचे. घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायच. कट्ट्यावर चक्कर मारायची अन जेवायच्या वेळी घरी यायचं. हा बंडूचा दिनक्रम होता.

هناك 7 تعليقات:

  1. You make so many great points here that I read your article a couple of times. Your views are in accordance with my own for the most part. This is great content for your readers. Wohnaccessoires

    ردحذف
  2. I definitely enjoying every little bit of it. It is a great website and nice share. I want to thank you. Good job! You guys do a great blog, and have some great contents. Keep up the good work. kanadské vízum zo Slovenska

    ردحذف
  3. This is such a great resource that you are providing and you give it away for free. I love seeing blog that understand the value of providing a quality resource for free. בקשת ויזה מקוונת לקנדה

    ردحذف
  4. A very excellent blog post. I am thankful for your blog post. I have found a lot of approaches after visiting your post. aplikasyon sa india visa

    ردحذف
  5. When you use a genuine service, you will be able to provide instructions, share materials and choose the formatting style. evaluate homework and practice

    ردحذف
  6. This is very appealing, however , it is very important that will mouse click on the connection: Best Assignment Help UK

    ردحذف
  7. I agree that homework can be a valuable tool for reinforcing classroom learning and building essential skills like time management and self-discipline. I particularly like the idea of assigning "real-world" homework that encourages students to apply what they've learned in meaningful ways. Some Top Dissertation Writing Services like The Academic Papers UK are helping studnets in their tough writing tasks.

    ردحذف