बोधकथा - प्रवृत्ती - Moral Story
एकदा एका साधूकडे राम आणि शाम असे दोन मित्र गेले. रामने विचारले. महाराज मोक्षासाठी घर का सोडावे लागते? घरीच राहिल्याने मोक्ष मिळणार नाही काय?' यावर साधू महाराजांनी रामकडे पाहिले आणि म्हणाले, 'कोण म्हणतो, मोक्षासाठी घर सोडायलाच पाहिजे. जनकासारख्या राजाला राजावाड्यात राहूनच मोक्ष मिळाला तर मग तुला घर सोडायची काय गरज आहे?' बाहेर थांबलेला शामही मग साधू महाराजांकडे आला आणि म्हणाला, 'घर सोडल्याशिवाय मोक्ष मिळेल का?' क्षणभर साधूंनी शामकडे पाहिले आणि म्हणाले, 'घरात राहून सुखासुखी मोक्ष मिळाला असता तर शुक्रासारख्यांनी गृहत्याग का केला असता?'
राम आणि शाम यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली. पण वाटेत जाता जाता त्यांचे भांडण लागले. राम म्हणाला, 'मोक्ष मिळवण्यासाठी घर सोडायचेच कशाला? घरात, राहूनदेखील मोक्ष मिळू शकतो. तर शाम म्हणाला, 'घर सोडल्याखेरीज मोक्ष मिळत नाही.' ते दोघे भांडू लागले.
नंतर ते साधू महाराजांकडे गेले आणि आपल्या भांडणाचे कारण सांगितले. साधू महाराज म्हणाले, 'दोन्ही गोष्टी बरोबर आहेत. फक्त फरक इतकाच की ज्याची जशी वृत्ती तसा त्याचा विचार. तुमच्या दोघांचेही जसे विचार आहेत तसाचा मोक्ष मिळणार.'
तात्पर्य : जीवनात वृत्ती आणि प्रवृत्तीला महत्त्व असते.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق