बोधकथा - प्रयत्नांती परमेश्वर
शांतिदूत मदर तेरेसा या ईश्वरालाच आपली संपत्ती मानत असत. इतर कुठलीही संपत्ती भरवसा ठेवण्यालायक नाही, कारण ती विपत्तीलाच कारणीभूत ठरते. असे त्या म्हणत. त्यांना एक मोठे अनाथलय काढायचे होते; परंतु त्यांच्याजवळ फक्त तीन शिलिंग एवढीच रक्कम होती. तेवढ्या अल्पश: पुंजीवर त्या एवढे मोठे कार्य सुरू करणार होत्या.
त्यांच्या चाहत्यांनी असा सल्ला दिला की, फक्त तीन शिलिंगात काय होणार आहे? अगोदर भरपूर पैसा गोळा करावयास हवा; परंतु मदर तेरेसांना ते पटत नव्हते, त्या म्हणाल्या, खरं आहे. केवळ तीन शिलिंगात काहीही करणं या तेरेसाला शक्य नाही; परंतु तीन शिलिंग आणि प्रत्यक्ष ईश्वर माझ्याजवळ आहे. मी या तीन शिलिंगशिवाय अजून पैसे मिळवायचा आतापासून प्रयत्न करीन.
प्रयत्न करणाऱ्याला केव्हाही ईश्वर यश देतोच; पण मी पैसेच नाही म्हणून हातावर हात ठेवून बसले तर मला माझ्या ध्येयापर्यंत जाताच येणार नाही. त्यामुळे प्रयत्न तर करायलाच हवा आणि बघता बघता त्यांच्या प्रयत्नांना यश आले. शेवटी एकदाचे मोठे अनाथालय काढण्यासाठी त्यांनी जो प्रयत्न केला त्याला यश आलेच.
तात्पर्य : प्रयत्न करणाऱ्याला यश मिळतेच. फक्त कष्ट करण्याची तयारी दर्शवली पाहिजे.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق