बोधकथा - देशभक्ती - Moral Story
प्राचीन काळात मगध साम्राज्य अतिशय भरभराटीला आलेले साम्राज्य होते. चंद्रगुप्त मौर्य मगधचा सम्राट होता. अतिशय न्यायी आणि तितकाच पराक्रमी असा हा राजा होता. आचार्य चाणक्य त्याचा मार्गदर्शक आणि प्रमुख सल्लागार होता.
चंद्रगुप्ताच्या राज्यात एकदा ऐन थंडीच्या दिवसांत घोंगड्या चोरीला जाऊ लागल्या. अनेक प्रयत्न करूनही चोर सापडत नव्हते. लोक मात्र थंडीने आजारी पडत होते. यावर उपाय म्हणून सरकारने घोंगड्या पुरवाव्यात, असे चाणक्याने सुचविले. चंद्रगुजाने ते मान्य केले आणि हजारो घोंगड्या आणल्या. त्यांच्या वितरणाची जबाबदारीही त्याने चाणक्यावरच टाकली.
चोरांना ही गोष्ट कळली. त्यांनी एका रात्री चाणक्याच्या वाड्यात प्रवेश केला. पाहतात तर काय, हजारो घोंगड्यांचा ढीग लागलेला अन् शेजारी चाणक्य आणि त्याची वृद्ध आई मात्र भूमीवर झोपलेले. पांघरूणही नव्हते त्यांच्या अंगावर आश्चर्य वाटून चोरांनी चाणक्याला उठविले आणि विचारले की, 'वाड्यात हजारो घोंगड्या असून, तुम्ही त्यातली एखादी का वापरायला घेतली नाही?'
चाणक्य म्हणाला, 'बाबांनो, या घोंगड्या माझ्या नाहीत. फक्त त्या वाटण्यासाठी माझ्याजवेळ दिल्या आहेत. जी वस्तू माझी नाही, तिचा उपभोग मी कसा काय घेणार? माझा त्यावर काय अधिकार आहे?'
तात्पर्य : हेच तत्त्व आचरणात आणून सार्वजनिक मालमत्तेचे आपण विश्वस्त आहोत, हे समजून घेतले तरच देशाची प्रगती होईल
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق