बोधकथा - सवयीचा गुलाम - Moral Story
लालबहादूर शास्त्री प्रधानमंत्री झाल्यानंतरची गोष्ट.शास्त्रीजींच्या काटकसरीपणाबद्दल आपण अनेकदा ऐकलेय, वाचलेय; पण राजकारणातल्या या मर्यादा पुरुषोत्तमाची एक छोटीशी नोंद त्यांच्या मुलाने, सुनील शास्त्रीने लिहून ठेवली आहे. ती अशी, शास्त्रींना घरातून कार्यालयात न्यायला गाडी येई. त्याचवेळी सुनील टांग्यातून शाळेत जाई. एकदा त्याने गाडीतून शाळेत जाण्याचा हट्ट केला.
तेव्हा शास्त्रीजी म्हणाले, 'अरे ही शासकीय गाडी. हिचे पेट्रोल भारत सरकार भरते. माझे पद गेले की ही गाडी जाईल; पण तुला तिची सवय लागेल. अशा गोष्टींची सवय ही वाईटच. कारण गाडीतून जाण्याचा आनंद खूप मोठा असतो; पण नंतर पुन्हा टांग्यातून जाण्याची वेळ आली तर मात्र तुला निराश वाटू लागेल. मग ही सवयच लावून घेतली नाही तर?
आता दररोज माझ्या गाडीतून येशील, पण माझे पद गेले तर पुन्हा टांगा वापरशील का?
तात्पर्य : माणसाने श्रीमंतीचा गुलाम होऊ नये. तसेच गरिबीचाही गुलाम होऊ नये,
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق