Studyfromhome.com Blog content is created for Primary Education Development.

Breaking

abhyas majha इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image

abhyas majha  इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image
Click On Image

بحث هذه المدونة الإلكترونية

‏إظهار الرسائل ذات التسميات सामान्यज्ञान. إظهار كافة الرسائل
‏إظهار الرسائل ذات التسميات सामान्यज्ञान. إظهار كافة الرسائل

الاثنين، 14 أكتوبر 2024

أكتوبر 14, 2024

जागतिक हात धुणे दिन

 


जागतिक हात धुणे दिन

जागतिक हात धुणे दिन दरवर्षी 15 ऑक्टोबरला साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे आणि योग्य पद्धतीने हात धुण्याबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे. 2008 साली ग्लोबल हँडवॉशिंग पार्टनरशिपने हा दिवस सुरू केला, जो विशेषतः साबणाने हात धुण्याच्या महत्वावर जोर देतो.


योग्य पद्धतीने हात धुणे हा संसर्गजन्य आजार, जसे की अतिसार, श्वसन रोग आणि अगदी COVID-19 सारख्या महामारीपासून बचाव करण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. जगातील अनेक लोकांना अद्याप स्वच्छ पाणी आणि साबण उपलब्ध नसल्यामुळे, स्वच्छतेबाबत जनजागृती करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.


या दिवशी विविध कार्यक्रम, शिबिरे आणि प्रात्यक्षिके आयोजित केली जातात ज्याद्वारे हात धुण्याचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवले जाते. शाळा, आरोग्य केंद्रे आणि सार्वजनिक ठिकाणी हात धुण्याच्या सुविधा वाढविण्यावरही भर दिला जातो. दरवर्षीच्या विविध थीमद्वारे, या दिवसाचे उद्दिष्ट हात स्वच्छतेची सवय लागून आरोग्य सुधारणे आणि आजारांचे प्रमाण कमी करणे आहे.

الثلاثاء، 1 ديسمبر 2020

ديسمبر 01, 2020

वाक्य प्रकार - केवल ,मिश्र व संयुक्त

 वाक्य प्रकार - केवल ,मिश्र व संयुक्त 

वाक्याच्या अर्थाच्या अनुरोधाने वाक्यांचे पुढीलप्रमाणे प्रकार पडतात:

(1) विधानार्थी वाक्य : ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते. त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात

उदा., मी शाळेत जातो.

(2) प्रश्नार्थी वाक्य : ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो. त्यास प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात

उदा., तू कोठे जातोस?

(3) उद्गारार्थी वाक्य : ज्या वाक्यातून भावनेचा उद्गार व्यक्त झालेला असतो, त्यास उद्गारार्थी वाक्य

म्हणतात. उदा., अरेरे! केवढा मोठा अपघात झाला !

(4) होकारार्थी (करणरूपी) वाक्य : जेव्हा विधानात होकार असतो, तेव्हा त्या वाक्यास होकारार्थी किंवा

करणरूपी वाक्य म्हणतात. उदा., भारताचा विजय झाला.

(5) नकारार्थी (अकरणरूपी) वाक्य : जेव्हा विधानात नकार असतो, तेव्हा त्या वाक्यास नकारार्थी किंवा

अकरणरूपी वाक्य म्हणतात. उदा., भारताचा पराजय झाला नाही.

क्रियापदाच्या रूपावरून वाक्यांचे पुढीलप्रमाणे प्रकार पडतात :

(1) स्वार्थी वाक्य : वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल, तर त्यास स्वार्थी (स्व-अर्थी) वाक्य म्हणतात. उदा., सुधीर शाळेत गेला.

(2) आज्ञार्थी वाक्य : वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, विनंती, आशीर्वाद, प्रार्थना किंवा उपदेश या

गोष्टीचा बोध होतो, त्यास आज्ञार्थी वाक्य म्हणतात. उदा., चांगला अभ्यास करा.

(3) विध्यर्थी वाक्य : वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य, इच्छा, योग्यता शक्यता या

गोष्टींचा बोध होतो, त्यास विध्यर्थी वाक्य म्हणतात. उदा., चांगला अभ्यास करावा.

(4) संकेतार्थी वाक्य : वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले तर तमुक होईल अशी अट किंवा संकेत याचा अर्थ निघत असेल, तर त्यास संकितार्थी वाक्य म्हणतात. उदा., जर चांगला अभ्यास केला, तर उत्तम यश मिळेल.

एका वाक्यात किती विधाने आहेत यावरून वाक्यांचे पुढीलप्रमाणे प्रकार पडतात :

(1) केवल वाक्य : ज्या वाक्यात एकच उद्देश्य व एकच विधेय असते; त्यास केवल वाक्य म्हणतात. उदा., अजय दररोज अभ्यास करतो.

(2) मिश्र वाक्य : एक प्रधान वाक्य व एक गौण वाक्य यांना गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययाने जोड़ून जे एक

संमिश्र वाक्य तयार होते, त्यास मिश्र वाक्य म्हणतात. उदा., जर अभ्यास केला तर आपण पास होऊ.

(3) संयुक्त वाक्य : दोन केवल वाक्ये प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता जे एक

जोडवाक्य तयार होते, त्यास संयुक्त वाक्य म्हणतात. उदा., अजय पहाटे उठतो आणि तासभर अभ्यास करतो.

ديسمبر 01, 2020

साहित्यकार , टोपणनावे व सामान्यज्ञान

साहित्यकार , टोपणनावे  व सामान्यज्ञान 

टोपणनावे                                                                   Test Link

1. काही कवी, साहित्यिक व त्यांची टोपणनावे

कृष्णाजी केशव दामले      -केशवसुत

राम गणेश गडकरी-        गोविंदाग्रज, बाळकराम

वि. वा. शिरवाडकर-     कुसुमाग्रज

त्र्यंबक  बापूजी ठोमरे-    बालकवी

शंकर केशव कानेटकर        - गिरीश

यशवंत दिनकर पेंढ़ारकर - यशवंत

नारायण सूर्याजीपंत ठोसर  -रामदास

मोरोपंत रामचंद्र पराडकर   मोरोपंत

दत्तात्रय कोडो घाटे-  दत्त

प्रल्हाद केशव अत्रे -  केशवकुमार

आत्माराम रावजी देशपांडे-अनिल

दिनकर गंगाधर केळकर- अज्ञातवासी

काशिनाथ हरी मोडक-माधवानुज

विनायक जनार्दन करंदीकर -विनायक

नारायण मुरलीधर गुप्ते- बी

चिंतामण त्र्यंबक खानोलकर -आरती प्रभू

शंकर काशिनाथ गर्गे- ( नाट्यछ्टाकार) दिवाकर

गोपाळ हरी देशमुख-लोकहितवादी

माधव त्रयंबक पटवर्धन-माधव जूलियन

ना. धो, महानोर-रानकवी.


2. काही काव्यग्रंथ व त्यांचे कवी

भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) -संत ज्ञानेश्वर

अभंगगाथा       - संत तुकाराम

नलदमयंती स्वयंवराख्यान  - रघुनाथपंडित

गीत रामायण      -ग. दि. माडगूळकर

यथार्थदीपिका  -वामनपंडित

बिजली    -वसंत बापट

शीळ -ना. घ. देशपांडे

ज्वाला आणि फुले-बाबा आमटे

स्वेदगंगा- विंदा करंदीकर,

भावार्थ रामायण- संत एकनाथ

दासबोध व मनाचे श्लोक-समर्थ रामदास

केकावली-मोरोपंत


3. काही नाटके व त्यांचे नाटककार

 शारदा - गोविंद बल्लाळ देवल

साष्टांग नमस्कार, घराबाहेर, भ्रमाचा भोपळा,लग्नाची बेडी       -प्र. के. अत्रे

सौभद्र-      बळवंत पांडुरंग कि्लोस्कर

कीचकवध, भाऊबंदकी, मानापमान, विदयाहरण- कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर

प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव, एकच प्याला, भावबंधन-राम गणेश गडकरी

टिळक आणि आगरकर -विश्राम बेडेकर

नटसम्राट- वि. वा. शिरवाडकर.

4. काही पुस्तके व त्यांचे लेखक

गीताई         -विनोबा भावे

 रामायण        - वाल्मीकी

महाभारत          -व्यासमुनी

गीता          -व्यासमुनी

मुद्राराक्षस -विशाखदत्त

मृच्छकटिक    -शूद्रक

शाकुंतल,       - मेघदूत, रघुवंश - कालिदास

श्यामची आई        -साने गुरुजी

गुजगोष्टी     - ना. सी. फडके

रथचक्र, गारंबीचा बापू      - श्री. ना. पैंडसे

काळे पाणी, माझी जन्मठेप   -वि. दा. सावरकर

स्वामी, श्रीमान योगी     -रणजित देसाई

चक्र   - जयवंत दळवी

वहिनीच्या बांगड्या     -य. गो. जोशी

गीतारहस्य   -लोकमान्य टिळक

पडघवली   -गो. नी. दांडेकर

ययाति       -वि. स. खांडेकर

एरंडाचे गु्हाळ  - चि. वि. जोशी

स्मृतिचित्रे       - लक्ष्मीबाई टिळक

कर्हेचे पाणी - प्र. के. अत्रे