बोधकथा - दृष्टिकोन - Moral Story
प्रख्यात ग्रीक तत्त्वज्ञ सॉक्रेटिस हा दिसायला कुरूप होता; पण त्याचा शिष्यगण मोठा होता. प्लेटो हा त्याचा प्रसिद्ध शिष्य, अर्वाचीन युरोपमधील तत्त्वज्ञानाचा पाया सॉक्रेटिसच्या तत्त्वज्ञानात शोधला जातो. एकदा प्लेटोने सॉक्रेटिसला आपल्या खोलीत फेऱ्या मारताना पाहिले. फेऱ्या मारताना तो सारखा आरशात आपला चेहरा निरखून पाही. प्लेटोला आश्चर्य वाटले. त्याच्या मनात आले, गुरुजी काही दिसायला देखणे नाहीत, मग ते वारंवार आरशात का पाहताहेत?
धाडस करून त्याने सॉक्रेटिसला त्याबाबत विचारले. तेव्हा सॉक्रेटिस म्हणाला, मला माहीत आहे की, माझा चेहरा कुरूप आहे. म्हणूनच मी वारंवार आरशात पाहतो. मग ती कुरुपता लपविण्यासाठी सुंदर सामाजिक काम करण्याची मला प्रेरणा होत. माझ्या हातून एखादे सत्कर्म घडते.
'सॉक्रेटिसचे हे बोलणे ऐकून अवाक झालेला तो शिष्य म्हणाला, 'मग सुंदर माणसाने का आरशात पाहावं? सॉक्रेटिस म्हणाला, 'आपल्या सुंदरतेला साजेसं काम करण्यासाठी. तशी प्रेरणा होण्यासाठी,
तात्पर्य : आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, यावरच जीवन अवलंबून असते.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق