बोधकथा - मनाची निर्मळता
बुद्धांच्या वृध्दापकाळची कथा.
एका दुपारी एका झाडाखाली ते विश्रांती घेत होते. त्यांना खूप तहान लागलेली होती. आनंद हा त्यांचा लाडका शिष्य त्यांना पाणी आणण्यासाठी ओढ्यावर गेला होता. परंतु त्या ओढ्याच्या प्रवाहातून बैलगाड्या गेल्यामुळे सर्व पाणी गढूळ झाले होते. चिखल आणि कुजलेली पाने वर आली होती. ते पाहून पाणी न घेताच आनंद परतला.
बुद्धांना म्हणाला, ओढ्यातील पाणी गढूळ झाल्याने मी परत आलो. आता नदीवरून पाणी घेऊन येतो. नदी खूपच लांब असल्याने बुध्दांनी त्याला ओढ्याचेच पाणी आणावयास सांगितले.
आनंद परत गेला पण पुन्हा रिकाम्या हातांनीच परतला. बुध्दांनी त्याला परत पाठविले. यावेळी आनंद ओढ्यावर गेला. पाहतो तर काय, सर्व चिखल पाण्याच्या तळाशी गेला होता. पाणी नितळ झाले होते.
तात्पर्य : मनाची अवस्था अशीच असते. शांती आणि धीर धरला तर गोंधळाचा चिखल तळाशी बसतो.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق