Studyfromhome.com Blog content is created for Primary Education Development.

Breaking

abhyas majha इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image

abhyas majha  इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image
Click On Image

بحث هذه المدونة الإلكترونية

الأحد، 8 نوفمبر 2020

School Games Part 1 - शालेय खेळ - बैठे खेळ - भाग 1

School Games Part 1  - शालेय खेळ भाग 1 






१. बैठे खेळ

१. खेळाचे नाव - उलटे अंक म्हणा.

वर्गरचना  - वर्गात बसल्याप्रमाणेच करावी. सभागृहात  असल्यास गोलात बसवावे किंवा सोईनुसार दोन-तीन गटात विभागणी करावी.

 खेळाचे वर्णन-      आपल्या वर्गाची शिक्षकाने सोईनुसार दोन किंवा तीन गटात विभागणी करावी. प्रथम पहिल्या गटातील विद्यार्थ्यांनी  १००-९९-९८ या उलट क्रमाने अंक मोजन्यास प्रारंभ करावा. मधेच चुकला तर दुसर्या गटाने  त्याच्या पुढील अंक मोजण्यास प्रारंभ करावा. ज्या गटातील विद्यार्थी बिनचूक अंक मोजतील तो गट विजयी घोषित करावा 

निर्णय- बिनचूक अंक मोजणारा गट विजयी.

२. खेळाचे नाव-राम म्हणा कुणी कृष्ण म्हणा.

वर्गरचना-       वर्गात बसल्या जागेवर किंवा  सभागृहात मोठा गोल करून.

खेळाचे वर्णन-  वर्गातील विद्यार्थ्यांना सोईनुसार वर्तुळात एक ते शंभर अंक एकापूढे एक याप्रमाणे विद्यार्थ्यांनी म्हणावेत. या वेळी तीन आणि पाच या संख्येने भाग जाणारी संख्या  (उदा. १. २. राम ४. ५. राम ) पुढील संख्या म्हणावी, तर पाच संख्येने भाग जाणारी संख्या आल्यास त्यावेळी त्या बिद्यार्थ्यानेही कृष्ण म्हणावे ( उदा- १. २. राम ४ कृष्ण ५. राम ७. ८. ९. राम ११ कृष्ण ). पुढील विद्यार्थ्याने पुढील संख्या म्हणावी.जो विद्यार्थी राम किंवा कृष्ण म्हणणार नाही तो बिद्यार्थी खेळातून बाद होईल.

निर्णय - शेवटपर्यंत अचूक अंक म्हणणारा विद्यार्थी विजयी होईल.

३. खेळाचे नाव- नेता ओळखा.

वर्गरचना- मोठया गोलात वर्गात किंवा सभागूहात बसवावे.

खेळाचे वर्णन- वर्गातील एका विद्यार्थ्याला नेता करावा. किंवा त्याच वेळी

विद्यार्थ्याला लांब पाठवून तो आल्यावर सर्वानी प्रथम टाळया वाजविन्यास सुरुवात करावी. त्यानंतर नेता झालेल्या विद्यार्थ्याने सहजपणे कृती बदलावी त्याप्रमाणे सर्वांनी कृती करावी ओळखण्याचे काम

ज्याला  करावयाचे आहे त्याने तीन संधीत नेता शोधून काढावा. तसे न झाल्यास त्याला छोटीशी कृती करण्यास सांगावी 

निर्णय = अचूक नेता ओळखणार्याच्या नावाचा जयजयकार करावा.

४. खेळाचे नाव- प्रश्न विचारा, नेता ओळखा.

वर्गरचना - गोलात किंवा वर्गात बसल्या ठिकाणी.

खेळाचे वर्णन- सर्वाच्या सम्मतीने एका महान राष्ट्रीय नेत्याचे नाव निश्चित करावे. शक्यतो पाठ्यक्रमावर आधारित हे नाव असावे. एका विद्यार्थ्याने बोलावल्यावर यावे व प्रत्येकाला नेता ओळखण्याच्या दृष्टीने प्रश्न विचारावा   उत्तर देताना " हो किंवा नाही " एवढेच यावे. त्याच्या आधारावर प्रश्नकर्त्या  विद्यार्थ्याने कमीत-कमी प्रश्नात नेता' ओळखण्याचा प्रयत्न  करावा.

निर्णय नेता - ओळखणार्या विद्यार्थ्याला वर्गाने शाबासकी द्यावी

५. खेळाचे नाव- शिवाजी म्हणतो.

वर्गरचना - मैदानात वर्ग गोलात किवा चार ओळीत  उभे करावे. शिक्षकांनीच आज्ञा देण्याचे काम करावे.

खेळाचे वर्णन- शिक्षक ज्या  आज्ञापूर्वी " शिवाजी म्हणतो" शब्द म्हणतील त्यानंतरच्या आज्ञेचे पालन करावे नुसत्या आज्ञेचे पालन करू नये. जो विद्यार्थी चूक करील तो विद्यार्थी खेळातून बाद होईल. शेवटपर्यंत राहणारा विद्यार्थी विजयी ठरविला जाईल.

निर्णय- शिवाजी म्हणतो ' नंतर येणारी आज्ञा शेवटपर्यंत पालन करणारा विद्यार्थी विजयी घोषित करावा.

६. खेळाचे नाव- मी ओळखतो.

साहित्य - डोळे बांधण्यासाठी २-४ रुमाल.

वर्गरचना- वर्गात बसल्या ठिकाणी, सभागृहात गोलात किंवा मेंदानात ४ ओळीत.

खेळाचे वर्णन - एका विद्यार्यांचे रुमालाने डोळे बांधाबेत. त्याला थोडेसे फिरवून नंतर एखाद्या विद्यार्थ्यासमोर उभे करावे. डोळे बांधलेला विद्यार्थी त्याला ५-६ प्रश्न विचारील आणि त्याच्या उत्तराच्या आवाजावरून तो कोण आहे त्याचे नाव सांगून ओळखेल. नांव सांगण्याची डोळे बांध-लेल्या विद्यार्थ्याला तीन वेळा तरी संधी द्यावी. 

निर्णय-  तीन संधीत ओळखल्यास त्याचा जयजयकार करा. न ओळखता आल्यास त्याला छोटीशी कृती सांगावी  


هناك تعليق واحد:

  1. Very nice blog and best wishes from Kranti Stores, chiplun." www.krantistores.com

    ♂We are the number 1 Stationary dealer of School and office supply, Green & White Boards, Scientific Apparatus and Models, e-Learning software, Sports Material, Books and much more in our city. It will be honour to suppy you best quality teaching aids!
    https://krantistores.com

    ردحذف