Studyfromhome.com Blog content is created for Primary Education Development.

Breaking

abhyas majha इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image

abhyas majha  इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image
Click On Image

Search This Blog

Showing posts with label बोधकथा. Show all posts
Showing posts with label बोधकथा. Show all posts

Tuesday, 16 May 2023

May 16, 2023

बडबड गीते - प्राण्यांची सहल

 प्राण्यांची सहल


एकदा काय गंमत झाली
पक्ष्यांची सहल जायची ठरली
सकाळी लवकर सारे जमले
प्राण्यांच्या बागेत जायचे ठरले
कावळ्याने आणला लाडू नि चिवडा
चिमणीने आणला गरम वडा
पोपटाने आणली पुऱ्यांची पिशवी
मोराने आणली खिरीची बशी
प्राण्यांच्या बागेत सारे जमले
फुलराणीत सारे बसायला गेले
डब्यात बसली चिमणी नि कावळा
पोपट झाला इंजिनदादा
पोपटाने शिट्टी जोरात फुंकली
फुलराणी ती ऐटीत चालली
वाटेत दिसली वाघाची स्वारी
थरथर कापायला लागली सारी
चिमणी उडाली भुर्र भुर्र भुर्र
कावळा उडाला दूर दूर दूर



उंच आभाळी पोपट उडाला
झाडामागे मोर पळाला.

 

⚛️Online Test for Practice*
*🌀 6 वी भूगोल*
https://cutt.ly/vC8q3Y6
*🌀 6 th Science*
https://cutt.ly/iC8wf99
*🌀 6 th Mathematics*
https://cutt.ly/sC8wEKT
*🌀 7 th Science*
https://mystudyfromhomes.in/http:/mystudyfromhomes.in/.html/7-th-science/
*🌀 8 th Science*
https://mystudyfromhomes.in/http:/mystudyfromhomes.in/.html/8-th-science/

Wednesday, 9 June 2021

June 09, 2021

सरल कहानी - 1. कपड़े की पूजा

 सरल कहानी - 1. कपड़े की पूजा

एक गाँव में एक गरीब स्त्री रहती थी । वह अपने पति के साथ गरीबी में जिंदगी बसर करती थी । उसके चार छोटे-छोटे बेटे थे । ज्यों-त्यों करके बेचारी अपना पेट पालती थी । उसी गाँव में उसका भाई रहता था । वह बड़ा धनी-मानी था, मगर अपनी बहन की कभी पूछ-ताछ नहीं करता था । अपने ही घमंड में चूर रहता था ।



एक दिन भाई ने भंडारा करने का इरादा किया । गाँव में सब लोगों को न्योता दिया, लेकिन बहन को नहीं बुलाया । दोपहर में भोजन शुरू होने वाला था । बहन को लगा- इतने बड़े काम में भाई न्योता देना भूल गया होगा । सब लोगों को जाते देखकर बच्चे भी हठ करने लगे, इसलिए वह बच्चों को लेकर भाई के यहाँ गई । थालियों में भोजन परोसा गया । सब लोग खाने को बैठे, तो बहन भी बच्चों को लेकर बैठ गई । इतने में भाई वहाँ पहुँचे। उनका ध्यान अपनी बहन की ओर गया, जो फटे-पुराने कपड़े पहनकर आई थी । भाईसाहेब उसके पास आए और धीरे शांती से बोले, “बहन तुम्हारे पास खुदके न तो अच्छे गहने हैं, और ना हि अच्छे कपड़े। तुम्हारी ओर देखकर लोग मेरी हँसी उड़ाते हैं । खैर ! आज आ गई, सो ठीक है । कल फिर न आना ।


" बेचारी दुखी होकर घर लौट गई । दूसरे रोज बच्चे कहने लगे " माँ, चलो न मामा के घर । देखो कितने लोग वहाँ जा रहे हैं ।"बहन ने सोचा, भाई नाराज हुआ, तो आखिर है तो अपना ही भाई । हम सब गरीब हैं । गरीब को गरीब कहने में अपमान समझनेकी क्या बात है? वह फिर गई और बच्चों के साथ खाने बैठी।भाई ने देखा, तो वह आग बबूला हो गया । गुस्से में आकार डॉटकर बोला, "कलमुंही कहीं की । एक बार कह दिया, तो भी नहीं समझी । बेशरम, चल यहाँ से ।" ऐसा कहते हुए भाई ने उसका हाथ पकड़कर बच्चों के साथ उसे निकाल दिया ।



उस बात को कई दिन हो गए । सब दिन होत न एक समान । बहनके दुखके दिन चल गए । उसकी सारी तकदीर खुल गई । उसके पति का सम्मान अब धनी-मानी लोगों में होने लगा । एक साल भाई के लड़के का जनेऊ आया । अब की बार बहन को आग्रह के साथ बुलाया । उसने कहा, "तुम न आओगी तो मुझे दुख होगा, सब समारोह फीका हो जाएगा ।" बहन ने आना कबूल किया । वह दूसरे दिन कीमती गहने और कपड़े पहनकर भाई के यहाँ गई । भाई ने बड़ी इज्जत के साथ उसे अपने पास बिठाया । भोजन परोसा गया ।


भोजन शुरू हुआ । भोजन शुरु होते ही बहन ने दुपट्टा उतारकर उसे एक तरफ रख दिया । उसने बिंदा, झुमके, नथ, सोने का हार, मोतियों की माला, अंगूठी, कंगन, करधनी, पायल आदि सब गहने उतारकर रख दिए । भाई को लगा- इसे गहनों का बोझ होता होगा । फिर बहन ने जलेबी का एक टुकड़ा दुपट्टे पर रख दिया । दूसरा कान के झुमके पर, तीसरा सोने के कंगन पर । इस तरह एक-एक गहने पर उसने मिठाई रखना शुरू किया ।



यह देखकर भाई अचंभे में आ गया । उसने पूछा, "जीजी, तुम यह क्या करती हो ? तुम खाती क्यों नहीं?" "मैं उन्हीं को खिलाती हूँ, जिन्हें तुमने आग्रह से न्योता दिया है । मेराभोजन तो उसी रोज हो चुका, जिस दिन तुमने मुझे भरी थाली पर से उठा दिया था । 

आज का भोजन मेरे गहनों के लिए है।" बहने ने हँसते-हँसते जवाब दिया। भाई शरम के मारे पानी-पानी हो गया । उसने बहन से क्षमा माँगी । वादा किया कि फिर ऐसा कभी नहीं करूंगा । दीन हो या धनी, सब से एक तरह का बरताव करुंगा।बहन उदार थी । वह समझ गई कि अब भाई की आँखें खुल गई हैं। उसे पछतावा हुआ है। उसने माफ कर दिया । फिर दोनों ने अच्छी तरह से भोजन किया ।


संदेश -हर एक को सुख दुःख की स्थिती का सामना करना पडता है। इसलीए किसीं का उसके बुरे काल मे  मजाक नही उडाना चाहीए।

Monday, 7 June 2021

June 07, 2021

बोधकथा - आत्मपरिवर्तन - Moral Story

 बोधकथा - आत्मपरिवर्तन - Moral Story

एका गावात एक लोभी राहात होता. प्रत्येक बाबतीतील त्याचा हव्यास वाढत होता; पण एके दिवस त्याला अचानक ईश्वरप्राप्तीचा ध्यास लागला होता. त्याला वाटत होते, आता आपल्याकडे साऱ्या सुविधा आहेत. नाही तो फक्त ईश्वरच नाही. सगळ्या सुविधा आपण मिळवल्या; पण ईश्वराला कधी मिळवणार? 


मग त्याने भगवी वस्त्रे परिधान करून पर्णकुटीत राहणे सुरू केले. एका रात्री तो दचकून उठला. त्याला जाणवले की, छपरावरून कोणीतरी चालत आहे. तो म्हणाला, कोण आहे? उत्तर आले, घाबरू नका, चोर नाही. तरुणाने विचारले, अहो, छतावर काय करताय? उत्तर आले, माझी शेळी हरवलीय, ती शोधतोय.... 


तरुण म्हणाला, डोकं ठिकाणावर आहे का? छतावर कधी शेळी शोधतात का? कशी असेल.ती? छतावरील व्यक्तीने उत्तर दिले, अरे मूर्खा, तू ज्या अस्वस्थ, लोभी इच्छेने आणि अतृप्त मनाने ईश्वराचा शोध घेतो आहेस, ते सुद्धा छतावरची शेळी शोधण्याइतकंच मूर्खपणाचं नाही का?



तात्पर्य :सत्याच्या आणि ईश्वराच्या प्राप्तीसाठी आत्मपरिवर्तन आवश्यक आहे.

Sunday, 6 June 2021

June 06, 2021

बोधकथा - स्वतःला जाणा - Moral Story

बोधकथा - स्वतःला जाणा - Moral Story

विवेकानंदांचे भारतभ्रमण सुरू होते. सत्याचा शोध घेत ते फिरत होते. एका रात्री नदी पोहून ते पलीकडच्या काठावरील महर्षी देवेंद्रनाथांच्या आश्रमात गेले. ध्यानस्थ बसलेल्या महर्षीना त्यांनी विचारले, ईश्वर आहे की नाही, हे मला जाणून घ्यायचे आहे. अर्ध्या रात्री येऊन हा प्रश्न विचारणारा तो युवक पाहून महर्षीसुद्धा घाबरले.



महर्षी त्या तरुणाला म्हणजे विवेकानंदांना म्हणाले, मुला तू खाली बैस. मग निवांत बोलू एवढे ऐकताच विवेकानंद त्यांना म्हणाले, आपल्याकडून काहीही मिळणार नाही. मी निघतो. दोन महिन्यानंतर हाच प्रश्न त्यांनी रामकृष्ण परमहंसांना विचारला. रामकृष्ण म्हणाले, तुला खरंच जाणून घ्यायचं असेल तर बोल. देव आहे किंवा नाही, याची चिंता सोडून दे. तुला जाणायचं आहे की नाही, एवढंच सांग. 


विवेकानंद पहिल्यांदाच विचारात पडले. आतापर्यंत मी लोकांना पकडत होतो. मी आत्तापर्यंत विचारच केला नव्हता की माझी जाणून घ्यायची तयारी आहे किंवा नाही. रामकृष्णांजवळ अनुभव होता. फक्त शब्द नव्हते. अनुभवाजवळ टाळाटाळ नसते. संदिग्धता नसते, काहीही शंका नसतात. असे ज्ञान नेहमी आतून येते.



तात्पर्य : स्वत:ला जाणून घ्यायची इच्छा हवी. असं मिळवलेले ज्ञान आतून येते. ते कोणालाही हिरावून घेता येत नाही.

June 06, 2021

बोधकथा - मृगजळ - Moral Story

 बोधकथा - मृगजळ - Moral Story

आकाशातील ढगाचा हेवा वाटून त्याच्या प्राप्तीसाठी एका चिमणीने उड्डाण केले. ती वर वर जाऊ लागली. ती ढगाजवळ पोहोचणार, इतक्यात ढगाने आपली दिशा बदलली. चिमणी त्याच्याकडे जाऊ लागली. ती जवळ येताच ढग अंतर्धान पावला. त्याच्या शोधात चिमणी पुन्हा भटकू लागली. खूप दूरवर तिला तो ढग दिसला. त्याचे वेगवेगळे भाग पडले होते. कोणता भाग पकडावा या विचारात ती भटकू लागली.



इतका वेळ उडत राहिल्याने तिचे शरीर थकले. तरीही ती प्रयत्न सोडत नव्हती. ढग मिळविण्यासाठीचा तिचा लोभ मात्र काही केल्या  सुटत नव्हता.निकराचा प्रयत्न करून तिने त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर ढगच विरून गेला आणि तिच्या हाती काहीही लागले नाही. 


या धावपळीमुळे तिची दमछाक झाली आणि ती जमिनीवर कोसळली. कोसळल्यावर म्हणाली, मी या ढगाच्या मागे लागूनमाझे आयुष्य  संपवले. मला कसे कळले नाही की ढगाच्या मागे लागले म्हणजे मृगजळाच्यामागे धावण्यासारखा प्रकार आहे.



तात्पर्य : मृगजळामागे धावणाऱ्याच्या हाती काहीही लागत नाही.

Thursday, 3 June 2021

June 03, 2021

बोधकथा - संकुचित वृत्ती - Moral Story

 बोधकथा - संकुचित वृत्ती - Moral Story

एका छोट्याशा विहिरीतच आयुष्य व्यतीत करणाऱ्या बेडकाला समुद्रात राहणारा बेडूक भेटला. विहिरीतल्या बेडकाने विचारले, कसा असतो समुद्र? यावर समुद्रातल्या त्या बेडकाने माहिती दिली. विहिरीतल्या बेडंकाने जरा लांब उडी मारून विचारले, इतका मोठा असतो का समुद्र? समुद्री बेडकाने उत्तर दिले नाही. मग पुन्हा विहिरीतील बेडकाने अजून मोठी उडी मारली आणि विचारले, इतका मोठा असतो का समुद्र? 


दुसऱ्या बेडकाने नकारार्थी मान हलवली. असे बऱ्याच वेळ झाले. विहिरीतील बेडूक विहिरीत  उड्या मारायचा आणि समुद्रातील बेडूक त्याला म्हणायचा, यापेक्षा मोठा समुद्र आहे. असा जन्मभर उड्या मारत राहिलास तरी समुद्राएवढे अंतर तू दाखवू शकणार नाहीस. हे ऐकून त्या विहिरीतील बेडकाला राग आला. तो म्हणाला, तू खोटे बोलतो आहेस. या विहिरीपेक्षा जग मोठे असूच शकत नाही.


मला अंतर मोजता येणार नाही, असा कोणताच  समुद्र या जगातच नाही...! हे उत्तर ऐकून समुद्रातील बेडूक निघाला. जाताना म्हणाला, याला कारण तुझी संकुचित वृत्ती.

तात्पर्य : विहिरीसारखी कुंपणे घालून आपण त्या विहिरीतल्या बेडकासारखेच जगत असतो. अशी बंधने झुगारून देणे आवश्यक असते.

Wednesday, 2 June 2021

June 02, 2021

बोधकथा - जीवनमूल्ये - Moral Story

 बोधकथा - जीवनमूल्ये - Moral Story

एका दरिद्री मजुराला रस्त्यावर खोदकाम करत असता एक सुंदर शिल्प सापडले. घडीव दगडात कोरलेली ती सुंदर मूर्ती पाहून त्याला गावातील प्राचीन मूर्त्यांचा संग्रह करणाऱ्या बंडोपंतांची आठवण झाली. त्याने विचार केला की, त्यांना प्राचीन मूर्त्यां जमविण्याचा छंद आहे. ही मूर्ती जर मी त्यांना देऊन टाकली तर मला याची बरीच किंमत मिळेल. 


चला आजचा दिवस भाग्याचा आहे. बंडोपंतांची आर्थिक स्थितीही उत्तम होती. त्या मजुराने ती मूर्ती त्यांना दिली. बंडोपंतांनी त्याला थोडे पैसे दिले. ते पैसे घेऊन तो घरी गेला. त्याला खूप आनंद झाला. तो म्हणाला, छंद इतका वेडा असू शकतो, हे मला माहीतच नाही. इतकी जुनी मूर्ती; पण या बंडोपंतांनी केवढे पैसे दिले त्याचे!



चला आपल्याला काय पैसे मिळाल्याशी मतलब. इकडे बंडोपंतांनी मूर्ती स्वच्छ केली. ते मनात विचार करू लागले. बरीच वर्षे मूर्ती जमिनीत पडली होती. याची किंमत लाखांच्या घरात होती. या वेड्याने काही लाखांची दुर्मिळ मूर्ती मला कवडीमोल किंमतीत दिली. मूर्ख लेकाचा. जीवनातही असेच असते. जीवनमूल्यांची किंमतही अशीच बदलत असते. काही अनमोल गोष्टी आपण कवडीमोलाच्या ठरवतो. त्याचे मोल आपल्याला नसते.



तात्पर्य : जीवनमूल्यांची किंमतही अशीच परिस्थितीनुसार, व्यक्तीनुसार बदलते.

Monday, 31 May 2021

May 31, 2021

बोधकथा - मनःशांती - Moral Story

 बोधकथा - मनःशांती - Moral Story


एका राजाने भगवान बुद्धांना विचारले, आपण कोण? मला आपल्यासारखी मनःशांती लाभेल का? यावर बुद्ध म्हणाले, अवश्य लाभेल. माझे विचार पण खुप दरिद्री होते. माझ्याजवळ खूप काही होतं; पण आत काहीच नव्हतं. जे मला जमलं ते तुला नक्कीच जमेल. 


जे एका बीजाला वृक्ष बनवने  शक्य आहे, ते दुसऱ्यालाही आहे. प्रत्येक बीजाचा वृक्ष बनू शकतो. तुझाही असाच शांतिवृक्ष बनेल. कारण मनुष्याची आंतरिक शक्ती सारखीच असते ; परंतु तुला त्यासाठी काहीतरी करावं लागेल. 


राजा म्हणाला, मी काहीही करण्यास तयार आहे. सर्वसंगपरित्यागसुद्धा करेन. बुद्ध म्हणाले, काही गमावून त्यागून शांती मिळत नाही. स्वत:जवळचे सर्व सोडायला तू सिद्ध आहेस. सोडशीलही; पण तुला शांती मिळणार नाही. जो स्वत:लाच हरवायला तयार असतो, त्यालाच शांती मिळते.



तात्पर्य : स्वत:जवळचे नव्हेतर स्वत:च समर्पित झाल्याशिवाय मन:शांती लाभत नाही.

Saturday, 29 May 2021

May 29, 2021

बोधकथा - संपत्तीचा लोभ - Moral Story

 बोधकथा - संपत्तीचा लोभ - Moral Story

एक साधू एका जंगलातून जात होता. जंगलातून जात असताना अचानक त्याला एक मस्तक आणि पोलादी पाय असणारा एक विचित्र माणूस समोर आला. त्या माणसाला बघून साधूला थोड़े आश्चर्यच वाटले. आता पर्यंत या जंगलातून साधूने खूप वेळा भ्रमंती केली होती; पण अशा प्रकारचा माणूस भेटेल, अशी त्याला शंकासुद्धा आली नव्हती. 


कुतूहल म्हणून साधूने त्या माणसाला त्याच्या आहाराविषयी विचारले. यावर तो म्हणाला, मी भूखंड खातो आणि समुद्राचे पाणी पितो. तसा मी अत्यंत सुखी आहे. सर्व भौतिक सुविधा मला उपलब्ध आहेत. माझ्या आहारासाठी मी अनेक भूखंड आरक्षित केलेले आहेत, पण तरीही मला भविष्याची चिंता छळत आहे. 


यावर साधूने विचारले, इतकी सुखं पायाशी लोळत असताना तुला भविष्याची चिंता का बरं? तो माणूस म्हणाला, आज जरी मला प्रचंड जमीन व अमर्याद पाणी उपलब्ध असले तरी हे सारे गिळंकृत केल्यानंतर काय खाऊ? हा प्रश्न मला सतत छळत असतो.



तात्पर्य : माणसाला सत्ता, संपत्ती आणि सन्मान यांचा लोभही असाच अमर्याद असतो, तो आयुष्यभर  संपत नाही.

Wednesday, 26 May 2021

May 26, 2021

बोधकथा - लोभी - Moral Story

 बोधकथा - लोभी - Moral Story

एकदा कृष्णा नदीला पूर आला होता. पूर पाहाण्यासाठी दोन्ही तिरावर लोकांनी गर्दी केली होती. त्यामध्ये चिकटपंतही उभे होते. इतक्यात कोणीतरी ओरडले, अरे ते पाहा घोंगडे चालले आहे. चिकटपंत नावाप्रमाणे चिक्कू, चिकट आणि लोभीही. त्यांनी मागचा पुढचा विचार न करता पाण्यात उडी मारली. ते घोंगडे तसे काही लांब नव्हते. चार हात पोहल्यावर ते त्यांच्या हातात आले; पण थोड्याच वेळाने  ते ओरडू लागले.  अहो कुणीतरी मला वाचवा. 


काठावरील लोक ओरडायला लागलीच. अहो ते घोंगडे तुम्हाला खेचून आणता येत नसेल, तर सोडून द्या ना. पाण्यात घोंगडे भिजल्यामुळे ते वजनदार झालेच असणार. मग कशाला हवे आहे. सोडून द्या आणि या काठावर.

यावर चिकटोपंत म्हणाले, अहो, हे घोंगड नाही तर चक्क अस्वल आहे. मी त्याला पकडले नसून, त्यानेच मला पकडले आहे. हे ऐकून काठावर असणारे पट्टीचे पोहणारे चार-पाच युवक पाण्यात उतरले आणि त्या अस्वलाच्या तावडीतून चिकटोपंतांची सुटका केली. अस्वलालाही कसेबसे तिरावर आणले. मग तेथे जमलेले लोक म्हणाले, अहो चिकटोपंत खुप जास्त लोभापायी आज तुमचा जीव जात होता. आता तरी शहाणे व्हा.



तात्पर्य ; अतिलोभ कधी कधी जीवावरही बेतू शकतो.

May 26, 2021

बोधकथा - मनाची एकाग्रता - Moral Story

 बोधकथा - मनाची एकाग्रता - Moral Story

एक तरुण साधूच्या आश्रमात गेला. त्याने त्यांना नमस्कार केला आणि म्हणाला, 'साधू महाराज, मी प्रभूच्या प्राप्ती करता पुष्कळ तपश्चर्या केली; परंतु तो मला काही भेटला नाही. असे का? देवाच्या प्राप्तीकरिता मी आणखीन किती तपश्चर्या करू?' 

साधू महाराज म्हणाले, 'देवप्राप्ती होईल; पण त्याला तुझी मनाची एकाग्रता असली पाहिजे. उदाहरणच हवे असेल तर ऐक. मी काल फिरत फिरत एका वाड्याजवळ गेलो होतो., वाड्याशेजारीच त्या मालकाची एक सुंदर अशी बाग होती. 



त्या झाडांना पाणी घालायचे म्हणून जवळच्या  विहिरीतील पाणी तेथील माळी काढत होता; पण ते दृश्य पाहून मला हसू आले. कारण तो जी  बादली विहिरीत सोडत होता, ती वर येईपर्यंत रिकामीच व्हायची. कारण विहिरीत सोडत असलेल्या बादलीस खूपशी छिद्रे होती. ती वर येईपर्यंत रिकामीच व्हायची. 

पाणी भरून घेण्यासाठी कितीही कष्ट घेतले तर ती रिकामीच येणार प्रथम बादली ठीक करून घ्यायला हवी. मनाचेही तसेच आहे. ध्यान धारणा, देवाची प्रार्थना करण्यासाठी लोक बसतात खरे; पण त्यांचे मन इकडे तिकडे भटकत असते. 

मनाची एकाग्रताच देवप्राप्ती करून देते. मन एकाग्र नसेल तर नुसतीच तपश्चर्या करून काय उपयोग?'

 

तात्पर्य : मनाच्या एकाग्रतेशिवाय फलप्राप्ती नाही.

Tuesday, 25 May 2021

May 25, 2021

बोधकथा - लांडग्याचे नशीब - Moral Story

 बोधकथा - लांडग्याचे नशीब - Moral Story

एकदा एक गाडीवान आपल्या गाडीतून मासे घेऊन चालला होता. जंगलातून भक्ष्य शोधण्यासाठी बाहेर पडलेल्या कोल्ह्याने ते पाहिले. मासे पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले. मासे मिळवायचे कसे, याचा विचार तो करू लागला. त्याला एक युक्ती सुचली. 


गाडीवान आपल्याच नादात गाडी चालवत पुढे निघाला होता. वाटेत त्याला हा कोल्हा मरून पडलेला दिसला. त्याने विचार केला की या कोल्ह्याचे कातडे विकून आपल्याला चार पैसे मिळतील, म्हणून त्याने कोल्ह्याच्या शेपटीला धरले आणि त्याला मागे टाकले. 


कोल्ह्याने गाडीवानाचे लक्ष नाही, असे पाहून मनसोक्त मासे खाल्ले आणि गाडीतून उडी मारून निघून गेला. त्याला गाडीतून उडी मारताना एका लांडग्याने पाहिले. लांडग्याने त्याला असे विचारले की तू गाडीमध्ये काय करत होता. कोल्ह्याने काय ते सांगितले. मग लांडगाही मेल्याचे सोंग घेऊन गाडीपुढे पडला.



गाडीवानाला खूप आनंद झाला. त्याला असे वाटले,की लांडग्याचेही कातडे विकून आपल्याला खूप पैसे मिळतील. तो लांडग्याला उचलायला गेला तर तो खूप जड वाटला. गाडीवानाला लांडगा उचलता येईना. म्हणून मग त्याने एक पोते आणले, त्यात लांडग्याला घातले आणि ते पोते आपल्या गाडीला घट्ट बांधले आणि गाडीबरोबर फरफटत नेले.



तात्पर्य : एका व्यक्तीसाठी फायदेशीर ठरलेली गोष्ट दुसऱ्यासाठीही तशीच ठरेल, असे नाही.

Monday, 24 May 2021

May 24, 2021

बोधकथा - पापमुक्त - Moral Story

 बोधकथा - पापमुक्त - Moral Story

एकदा एकनाथ महाराजांना एका गृहस्थांनी विचारले, 'महाराजा,आपले जीवन किती साधे, किती निष्पाप आहे. आमचे मात्र असे का?' एकनाथ महाराज थोडा वेळ थांबले आणि म्हणाले, 'माझी गोष्ट तूर्तास तरी राहू दे. तुझ्याविषयी कळलेली गोष्ट सांगतो. गोष्ट फारच वाईट आहे. अगदी तुझ्या जीव्हारी लागणारी आहे, पण सत्य ते स्वीकारावेच लागेल. तू आजपासून सात दिवसांनी मरणार आहेस.'



हे ऐकून तो गृहस्थ अस्वस्थ झाला. फक्त सात दिवसांनी मरण, अवघे एकशे अडुसष्ट तास बाकी. त्याला काही सुचेना. तो आजारी पडला. अंथरुणावरच त्याचा दिवस जाऊ लागला. सातव्या दिवशी नाथांनी विचारले, 'कसं काय?' यावर तो म्हणाला, 'कुठलं काय महाराज, जातो आता.' यावर नाथ म्हणाले, 'या सात दिवसात किती पापकर्म केलीस?' 


तो मनुष्य म्हणाला, 'पापाचा विचार करावयास वेळच मिळाला नाही. सारखं डोळ्यांसमोर मरण येत होतं.' नाथ म्हणाले, 'आमचं जीवन निष्पाप का याचं उत्तर तुला मिळालं ना?'



तात्पर्य : मरणाचे स्मरण नेहमी ठेवणे हाच पापापासून मुक्त होण्याचा मार्ग आहे.

May 24, 2021

बोधकथा - प्रवृत्ती - Moral Story

 बोधकथा - प्रवृत्ती - Moral Story

एकदा एका साधूकडे राम आणि शाम असे दोन मित्र गेले. रामने विचारले. महाराज मोक्षासाठी घर का सोडावे लागते? घरीच राहिल्याने मोक्ष मिळणार नाही काय?' यावर साधू महाराजांनी रामकडे पाहिले आणि म्हणाले, 'कोण म्हणतो, मोक्षासाठी घर सोडायलाच पाहिजे. जनकासारख्या राजाला राजावाड्यात राहूनच मोक्ष मिळाला तर मग तुला घर सोडायची काय गरज आहे?' बाहेर थांबलेला शामही मग साधू महाराजांकडे आला आणि म्हणाला, 'घर सोडल्याशिवाय मोक्ष मिळेल का?' क्षणभर साधूंनी शामकडे पाहिले आणि म्हणाले, 'घरात राहून सुखासुखी मोक्ष मिळाला असता तर शुक्रासारख्यांनी गृहत्याग का केला असता?' 


राम आणि शाम यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली. पण वाटेत जाता जाता त्यांचे भांडण लागले. राम म्हणाला, 'मोक्ष मिळवण्यासाठी घर सोडायचेच कशाला? घरात, राहूनदेखील मोक्ष मिळू शकतो. तर शाम म्हणाला, 'घर सोडल्याखेरीज मोक्ष मिळत नाही.' ते दोघे भांडू लागले. 


नंतर ते साधू महाराजांकडे गेले आणि आपल्या भांडणाचे कारण सांगितले. साधू महाराज म्हणाले, 'दोन्ही गोष्टी बरोबर आहेत. फक्त फरक इतकाच की ज्याची जशी वृत्ती तसा त्याचा विचार. तुमच्या दोघांचेही जसे विचार आहेत तसाचा मोक्ष मिळणार.'


तात्पर्य : जीवनात वृत्ती आणि प्रवृत्तीला महत्त्व असते.

Sunday, 23 May 2021

May 23, 2021

बोधकथा - वाघ आणि वाटसरू - Moral Story

 बोधकथा - वाघ आणि वाटसरू - Moral Story

एका जंगलात एक वाघ राहात होता. म्हतारा झाल्यामुळे त्याला  पूर्वीसारखी शिकार करता येईना. त्याला एक युक्ती सुचली. जंगलातील दर्भ गोळा करून त्याने त्याचे कडे तयार केले आणि आपल्या पुढच्या पायात घालून जंगलातील तळ्याकाठी बसला. आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना सांगू लागला, मी दानधर्म करत आहे. हे सोन्याचे कंकण मला दान करायचे आहे. ज्याला हवे असेल त्याने माझ्याजवळ येऊन घेऊन जावे. 


त्याचे हे बोलणे एका वाटसरूने ऐकले. सोन्याचे कंकण हे शब्द ऐकून त्याला लोभ सुटला. तो वाघाजवळ गेला; पण थोड्या अंतरावरून त्याला म्हणाला, 'तू तर हिंस्त्र पशू आहेस, मी जवळ आल्यावर तू मला मारणार नाहीस कशावरून?' तेव्हा वाघ म्हणाला, 'अरे, आयुष्यभर तेच करत आलो ना मी! त्याचाच आता. मला पश्चात्ताप होत आहे.


माझ्या गुरूंनी पापक्षालन करण्यासाठी मला दानधर्म करायला सांगितला आहे. आता हे सोन्याचे कंकण तेवढे राहिले आहे. ते मला दान करायचे आहे. तळ्यात स्नान कर आणि या दानाचा स्वीकार कर.' वाटसरू स्नानासाठी जाताना चिखलात अडकून पडला. थांब तुला वर काढतो, असे म्हणत वाघाने त्याच्यावर झडप घातली आणि त्याला खाऊन टाकले.


तात्पर्य : लोभाच्या आहारी जाऊन कुणावरही आंधळा विश्वास, ठेवणे घातक असते "

Saturday, 22 May 2021

May 22, 2021

बोधकथा - सकारात्मक दृष्टिकोन - Moral Story

 बोधकथा - सकारात्मक दृष्टिकोन - Moral Story

आपण अनेक प्रकारची कामे करत असतो. त्यातील काही कामात आपल्याला यश येते तर काही कामात अपयश येते. जे लोक अपयशातूनही शिकतात आणि पुन्हा नव्या जोमाने कामाला लागतात, ते यशस्वी होतात; पण अपयशाने खचून जाऊन, निराश होऊन बसलेल्या लोकांना काहीही मिळत नाही. 


आपला दृष्टीकोन सकारात्मक असेल तर मनातल्या वाईट शंका आपोआप दूर होतात. स्वामी विवेकानंदांनी हाच उपदेश नेहमी केला. एक तरुण विवेकानंदांजवळ आला आणि म्हणाला, 'स्वामीजी, तासन्तास बंद खोलीत बसून मी ध्यानधारणा करतो. परंतु मनाला शांती लाभत नाही.' यावर स्वामीजी म्हणाले, "सर्वात प्रथम खोलीचा दरवाजा उघडा ठेव. आपल्या जवळपास राहणाऱ्या दु:खी, रोगी व भुकेल्या माणसांचा शोध घे. त्यांना यथाशक्ती मदत कर.' यावर त्या तरुणाने आपली शंका विचारली, 'एखाद्या रोग्याची सेवा करताना मी स्वत:च आजारी पडलो तर?' विवेकानंद म्हणाले, 'तुझ्या या शंकेने मला असं वाटतं की, प्रत्येक चांगल्या कार्यात तुला काहीतरी वाईट दिसतं. म्हणून तुला शांती लाभत नाही. 

शुभकार्याला उशीर लावू नये तसेच त्यातील उणिवाही शोधू नयेत, हाच मन:शांती मिळविण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग आहे.'


तात्पर्य : कोणतेही विधायक काम करताना सकारात्मक दृष्टी हवी.

Friday, 21 May 2021

May 21, 2021

बोधकथा - लाचारपणा घातक - Moral Story

 बोधकथा - लाचारपणा घातक - Moral Story

एक राजा दररोज सायंकाळी घोडागाडीत बसून फिरायला जात असे. त्याचा हा दिनक्रम अनेक वर्षे चालू होता. असाच एकदा तो आपल्या घोडागाडीतून फिरावयास बाहेर पडला. त्या अगोदर रस्ता रिकामा करण्यासाठी त्याचे सेवक पुढे गेले होते. 


सेवक रस्ता रिकामा करीत पुढे जात, पाठीमागून राजाची घोडागाडी जाई. असे असताना रस्त्यामध्ये एक साधू पाय पसरून पडलेला दिसला. या साधूची कीर्ती त्या संपूर्ण राज्यात होती. राजाही त्या साधूचा आदर करत असे; पण राजाच्या घोडागाडीला व्यवस्थित जाता यावे म्हणून राजाच्या सेवकांनी त्या साधूला पाय मागे घेण्याबद्दल फर्मावल; पण त्या साधूने त्या सेवकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. 


सेवक त्या साधूला पाय मागे घेण्यासाठी विनवत होते; पण साधू काही हलायला तयार नव्हता. सेवक आणि साधूमधील वाद बराच वेळ सुरू होता. इतक्यात खुद्द राजाची घोडागाडी तिथे आली. सेवक आणि साधूतील वाद ऐकून राजा साधूला म्हणाला, 'महाराज, आपण इतका वाद का घालत आहात? तुम्ही पाय मागे का घेत नाही?' 

साधू म्हणाला,मी कधीही हात पसरले नाहीत, मग पाय मागे घेण्याचे काय कारण?'


तात्पर्य : ज्यांचे हात मागण्यासाठी पुढे असतात. ती माणसे नेहमी लाचार राहातात.

May 21, 2021

बोधकथा - देशभक्ती - Moral Story

बोधकथा - देशभक्ती - Moral Story

 

प्राचीन काळात मगध साम्राज्य अतिशय भरभराटीला आलेले साम्राज्य होते. चंद्रगुप्त मौर्य मगधचा सम्राट होता. अतिशय न्यायी आणि तितकाच पराक्रमी असा हा राजा होता. आचार्य चाणक्य त्याचा मार्गदर्शक आणि प्रमुख सल्लागार होता. 


चंद्रगुप्ताच्या राज्यात एकदा ऐन थंडीच्या दिवसांत घोंगड्या चोरीला जाऊ लागल्या. अनेक प्रयत्न करूनही चोर सापडत नव्हते. लोक मात्र थंडीने आजारी पडत होते. यावर उपाय म्हणून सरकारने घोंगड्या पुरवाव्यात, असे चाणक्याने सुचविले. चंद्रगुजाने ते मान्य केले आणि हजारो घोंगड्या आणल्या. त्यांच्या वितरणाची जबाबदारीही त्याने चाणक्यावरच टाकली. 


चोरांना ही गोष्ट कळली. त्यांनी एका रात्री चाणक्याच्या वाड्यात प्रवेश केला. पाहतात तर काय, हजारो घोंगड्यांचा ढीग लागलेला अन् शेजारी चाणक्य आणि त्याची वृद्ध आई मात्र भूमीवर झोपलेले. पांघरूणही नव्हते त्यांच्या अंगावर आश्चर्य वाटून चोरांनी चाणक्याला उठविले आणि विचारले की, 'वाड्यात हजारो घोंगड्या असून, तुम्ही त्यातली एखादी का वापरायला घेतली नाही?' 


चाणक्य म्हणाला, 'बाबांनो, या घोंगड्या माझ्या नाहीत. फक्त त्या वाटण्यासाठी माझ्याजवेळ दिल्या आहेत. जी वस्तू माझी नाही, तिचा उपभोग मी कसा काय घेणार? माझा त्यावर काय अधिकार आहे?'



तात्पर्य : हेच तत्त्व आचरणात आणून सार्वजनिक मालमत्तेचे आपण विश्वस्त आहोत, हे समजून घेतले तरच देशाची प्रगती होईल

May 21, 2021

बोधकथा - धैर्य - Moral Story

 बोधकथा - धैर्य - Moral Story

रामसिंग नावाचा सरदार एका गावातून दुसऱ्या गावात चालला होता. त्याला तसा त्या गावचा रस्ता माहीत नव्हता. म्हणून त्याने- एका वाटसरूला विचारले, "या गावाकडे जाणारा रस्ता.चांगला आहे काय?' 

चांगला आहे आणि अगदी रद्दड असला तरी तसा तो काही वाईट नाही.' रामसिंग घोड्यावरून चालू लागला. रस्ता तसा खराब होता; पण नंतर त्याने तो रस्ता पार करून त्या गावी पोहोचला.


लगेच काम करून आल्या वाटेने परत येताना त्याला पुन्हा तोच वाटसरू भेटला. वाटसरूने विचारले, 'कसा काय होता रस्ता?' यावर रामसिंग म्हणाला, 'रस्ता तसा खराबच होता. जाताना थोडा त्रास झाला; पण नंतर मनाने ते खाचखळगे स्वीकारले. त्यामुळे आता येताना अजिबात त्रास झाला नाही. 


एकदा मनाने अडचणींना स्वीकारले तर कठीण मार्गावरून जाताना त्याची तीव्रता कमी होते. म्हणजे एखाद्या कामाचा किंवा कष्टाचा भार आनंदाने उचलला तर तो हलका वाटतो आणि जड मनाने स्वीकारला तर तो खूपच जड वाटतो.


तात्पर्य : संकटाला धैर्याने सामोरे गेले तर त्याची तीव्रता कमीहोते.

May 21, 2021

बोधकथा - योग्य पात्रता - Moral Story

 बोधकथा - योग्य पात्रता - Moral Story 

अकबर बादशाह गुणग्राहक होता. त्याची कीर्ती ऐकून त्याच्या दरबारात एक चित्रकार आला व त्याने एक सुंदर चित्र काढले. बादशाहने त्याला बक्षीस देण्याचे ठरवले. आता त्याला बादशाहा मोठे बक्षीस देणार, हे लक्षात आल्याने दरबारातील इतर मंडळी जळफळली. बादशाह कारण नसताना एका सामान्य चित्रकाराला बक्षीस देत आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले; पण बादशाहच्याच दरबारातील काहींना हे मत मान्य नव्हते. या गुणी चित्रकाराची कदर करावी, असे त्यांना वाटले. शेवटी एकाने सुचवले की, हे चित्र दरबाराबाहेर चौकात लावावं व सर्वसामान्यांची प्रतिक्रिया आजमावावी. लोकांना ते आवडलं तर चित्रकाराला बक्षीस द्यावे. हे कसं करावं? असे बादशाहाने विचारताच सरदार म्हणाला, 'चित्रात जेथे चूक आढळेल तेथे प्रजेने फुली मारावी, असे जाहीर करावे.' 


बादशाहाला ही कल्पना पसंत पडली. त्यानंतर ज्याने त्याने येऊन चित्रावर जागोजाग फुल्या मारल्या. ते पाहून बादशाहाने त्याला बक्षीस द्यायचे नाकारले. त्याला वाईट वाटलं. तो अखेर बिरबलाकडे आला. बिरबिलाने बादशाहाकडे त्याची रदबदली केली; पण बादशाह काही ऐकायला तयार नव्हता. बिरबलाने चित्रकाराला सुचविले की, त्याने असेच दुसरे चित्र काढावे. चौकात लावावे व खाली लिहावे जो कोणी असे हुबेहुब चित्र काढू शकेल, त्यानेच फुली मारावी. यावेळी मात्र चित्रावर एकहीं फुली पडली नाही. 

अकबरालाही त्याची चूक कळली.



तात्पर्य : पात्रता नसताना दुसऱ्याच्या चुका काढणे खूप सोपे असते. स्वत:त बदल घडवणे खूप अवघड.