Studyfromhome.com Blog content is created for Primary Education Development.

Breaking

abhyas majha इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image

abhyas majha  इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image
Click On Image

Search This Blog

Showing posts with label भारत. Show all posts
Showing posts with label भारत. Show all posts

Friday, 2 October 2020

October 02, 2020

भारतीय उपखंड

 खालील ठळक मुद्दे काळजीपूर्वक वाचा 

◆ भारतीय उपखंडामध्ये काही ठराविक देशांचा समावेश होतो. त्यामध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूटान बांगलादेश, श्रीलंका आणि भारत  देश यांचा समावेश होतो .

या सर्व भूभागाला दक्षिण आशिया या नावाने सुद्धा ओळखले जाते.या भागांमध्ये भारत या देशाचा विस्तार खूप मोठा आहे आणि म्हणून या सर्व भागाला भारतीय उपखंड असे नाव पडले आहे.

◆ इतिहासाची रचना करताना - भुतकाळा मध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत, त्यांची सुसंगतपणे मांडणी केलेली असते त्यालाच इतिहास असे म्हणतात. मानवी समाज हा वस्ती करून राहणारा समाज आहे आणि तो एका ठिकाणी दीर्घकाळ वस्ती करून राहतो.

◆ मानवी समाज हा पूर्वी डोंगराळ प्रदेशामध्ये राहत होता. डोंगराळ प्रदेशात राहत असताना त्याचे मुख्य अन्न हे शिकार आणि जंगलातून मिळालेली वेगवेगळे पदार्थ हे होते.

● भारतामध्ये सर्वात प्राचीन नागरी संस्कृती ही हडप्पा संस्कृती आहे.



◆ इतिहास आणि भूगोल या दोघांचा खूप जवळचा संबंध आहे. स्थळ ,काळ ,व्यक्ती आणि समाज हे इतिहासाचे चार आधारस्तंभ असतात .त्यापैकी स्थळ हा घटक भूगोलाशी संबंधित असल्यामुळे इतिहासावर त्याचा खूप मोठा परिणाम होतो.

October 02, 2020

भारत ऊर्जा प्रकल्प India Power

 देशातील ऊर्जा प्रकल्प




जल व विद्युत्प्रकल्प

(१) मुचकुंद प्रकल्प : मुचकुंद नदीवरील आंध्र प्रदेश व ओरिसा

संयुक्त प्रकल्प. जलपूत येथे मुचकुंद नदीवर धरण. मुख्य उद्देश वीजनिर्मिती.

(२) श्रीशैलम प्रकल्प : आंध्र प्रदेशात. कृष्णा नदीवर धरण.

वीजनिर्मिती.


(३) बियास प्रकल्प : पंजाब, हरियाना व राजस्थान यांचा संयुक्त प्र

बियास-सतलज जोड कालवा व बियास नदीवरील पोंग येथील धरणाचा समा

(४) भाक्रा-नानगल : पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान व हरियाना

प्रकल्प. सतलज नदीवर हिमाचल प्रदेशात 'भाक्रा' व पंजाबमध्ये 'नानगल' अ

भारताची सर्वात मोठी बहुउद्देशीय योजना. भाक्रा हे देशातील सर्वांत उंच धर


२२६ मीटर.

(५) दामोदर खोरे योजना पश्चिम बंगाल व विभाजनपूर्व बिहारम

बहुउद्देशीय योजना. जलसिंचन, वीजनिर्मिती, पूरनियंत्रण इत्यादी उद्देश. या

दामोदर नदीवर तिलय्या, मैथोन, पंचेत, दुर्गापूर अशी अनेक धरणे बांधल्

प्रकल्पाचे व्यवस्थापन दामोदर खोरे महामंडळ (Damodar Valley Co

मार्फत केले जाते. अमेरिकेतील प्रसिद्ध 'टेनेसी व्हॅली'च्या धर्तीवर रचना.

(६) फराक्का योजना : ही योजना पश्चिम बंगालमध्ये राबविली

योजनेअंतर्गत गंगा नदीवर 'फराक्का' येथे व भागीरथी नदीवर 'जांगीपूर' येथे

आहेत. हुगळी नदीचा प्रवाह कायम राखणे व कोलकाता बंदराची व्यवस्था

योजनेमागचे उद्देश आहेत.

(७) हिराकूड : हा प्रकल्प ओरिसा राज्यात आहे. संबळपूरजवळ मह

तील सर्वांत जास्त लांबीचे धरण बांधले आहे. धरणाची लांबी सुमारे २५।


इतकी आहे.

(८) चंबळ योजना : ही मध्य प्रदेश व राजस्थान सरकारची संयुक्त

या योजनेअंतर्गत चंबळ नदीवर राणाप्रतापसागर व जवाहरसागर (कोटा) अ

राजस्थानात व गांधीसागर है धरण मध्य प्रदेशात बांधले आहे. मुख्य उद्देश वी

(९) उकाई प्रकल्प : तापी नदीवरील गुजरात राज्यातील बहुउद्देशीय प्रकल्प.

(१०) कोसी प्रकल्प : विभाजनपूर्व बिहार व नेपाळ सरकारची संयुक्त योजना. या

प्रकल्पामध्ये कोसी नदीवर दोन धरणे बांधण्यात आली आहेत. बहुउद्देशीय योजना.

(११) गंडक योजना : भारत व नेपाळ यांमधील संयुक्त योजना. गंडकी नदीवर

वाल्मीकिनगर येथे धरण. या योजनेचा फायदा बिहार व उत्तर प्रदेश या भारतातील राज्यांना

व नेपाळला होतो. जलसिंचन व वीजनिर्मिती हे उद्देश.

(१२) नागार्जुनसागर आंध्र प्रदेशात कृष्णा नदीवर नंदीकोना येथे(हैदराबादपासून

४४ कि. मी. अंतरावर) धरण.

(१३) तुंगभद्रा प्रकल्प : आंध्र प्रदेश व कर्नाटक सरकारची संयुक्त योजना. यामध्ये

तुंगभद्रा नदीवर मल्लामपुरम येथे धरण बांधण्यात आले आहे.

(१४) भद्रा प्रकल्प : भद्रा नदीवरील कर्नाटक राज्यातील बहुउद्देशीय योजना.

(१५) काक्रापारा : गुजरात राज्यात सुरत जिल्ह्यात काक्रापारा येथे तापी नदीवर धरण.

(१६) तवा प्रकल्प : मध्य प्रदेशात होशिंगाबाद जिल्ह्यात तवा नदीवर (नर्मदेची

उपनदी) धरण.

(१७) मही प्रकल्प : मही नदीवर गुजरात राज्यात वनाकबोरी व कडाणा येथे धरणे.

(१८) अप्पर कृष्णा प्रकल्प : या प्रकल्पामध्ये कर्नाटक राज्यात नारायणपूर व

अलमाती येथे कृष्णा नदीवर दोन धरणे बांधण्यात आली आहेत.

(१९) घटप्रभा प्रकल्प : घटप्रभा नदीवर कर्नाटक राज्यात बेळगाव व विजापूर

जिल्ह्यात धरणे.

(२०) तिहरी प्रकल्प : सध्याच्या उत्तरांचल राज्यातील गढवाल परिसरात भागीरथी

(गंगा) नदीवर विकसित होत असलेली महत्त्वाकांक्षी बहुउद्देशीय योजना. रशियन

तंत्रज्ञांच्या मदतीने विकास. ज्या प्रदेशात या प्रकल्पाखालील धरणे बांधली जात आहेत, तो

प्रदेश भू-शास्त्रीयदृष्ट्या अस्थिर असल्याचे काही तब्जांचे मत. पर्यावरणदृष्ट्या प्रकल्प

विवादास्पद.


(२१) पूर्णा प्रकल्प : पूर्णा नदीवर महाराष्ट्रात दोन धरणे.

(२२) रिहांद प्रकल्प : उत्तर प्रदेशात मिर्झापूर जिल्ह्यात धरण. वीजनिर्मिती व

जलसिंचन हे प्रमुख उद्देश.

(२३) कोयना प्रकल्प

'शिवाजीसागर' हे धरण. वीजनिर्मिती हा प्रमुख उद्देश. मुंबई पुणे व परिसरास वीजपुरवठा.

(२४) पेरियार प्रकल्प : पेरियार नदीवर. केरळ व तमिळनाडू या राज्यांना फायदा.


महाराष्ट्र राज्यात सातारा जिल्ह्यात हेळवाकजवळ


यो(२५) मयुराक्षी योजना : गंगा नदी. बिहार व बंगाल या राज्यांना लाभ.

|(२६) शरावती योजना शराबती नदी. कर्नाटक राज्यात लिंगनमक्की खेडयाजवळ

धरण. कर्नाटक व गोव्याला लाभ.

(२७) कृष्णराजसागर । कावेरी नदी. कनर्नाटक राज्यात. मुख्य उद्देश जलसिगन

(२८) मैचूर योजना कावेरी नदी. कर्नाटक व तमिळनाडू या राज्यांना लाभ

(२९) पैकारा योजना : पैकारा नदी. तमिळनाडू, केरळ व कर्नाटक या राज्यांस


(३०) नर्मदा प्रकल्प : गुजरात आणि मध्य प्रदेशात नर्मदा आणि तिच्या उपनब

'सरदार सरोवर' आणि 'नर्मदासागर' ही दोन मोठी धरणे. २९ मध्यम आणि अनेक सोध

धरणे बांधण्याची महत्वाकांक्षी योजना. देशातील सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प. अपेरिट

खर्च बारा हजार कोटी रुपयांहून अधिक. पर्यावरणदृष्ट्या विवादास्पद प्रकल्प. नरमटा

बचाव' आंदोलनामुळे प्रकाशझोतात.

(३१) कुकडी प्रकल्प : महाराष्ट्रात कुकडी नदीवर माणिकडोह, डिंभे, येडगाव

बडज व पिंपळगाव-जोगा येथे पाच स्वतंत्र धरणे. मुख्य उद्देश जलसिंचन.

(३२) जायकवाडी प्रकल्प : गोदावरी नदीवरील या प्रकल्पाचा फायदा महाराष्ट्रातील

औरंगाबाद व शेजारच्या जिल्हयांना होणार आहे. यात पैठण येथील नाथसागर जलाशयाचा

य माजलगाव येथील मातीच्या धरणाचा अंतर्भाव होतो.

(३३) सावरमती प्रकल्प : गुजरात राज्यात साबरमती नदीवर दोन धरणे एक

मेहसाणा जिल्ह्यात धारी खेडयाजवळ, तर दुसरे अहमदाबादजवळ वासना येथे. प्रमुख

उ्देश जलसिंचन.


(३४) करजन प्रकल्प : गुजरात राज्यात भडोच जिल्ह्यात जितगड गावाजयळ

करजन नदीवर धरण. मुख्य उद्देश जलसिंचन.

(३५) घनाम प्रकल्प : गुजरात राज्यात पंचमहाल जिल्ह्पात केलडेझार खेडपाजवळ

पनाम नदीवर धरण जलसिचन हा प्रमुख उद्देश.

(३६) महानदी प्रकल्प महानदीवरील मध्य प्रदेशातील प्रचंड प्रकल्प यामधे

रविशकरसागर जलाशयाचा य पैरी धरणाचा समावेश होतो. रविशंकरसागर जलाशया


देशातील चौटा राज्यांत मिळून एकूण पंचवीस राष्ट्रीय उद्याने वाघांसाठी

राखीव असून औ

भिलाई पोलाद प्रकल्पास पाणीपुरवठा केला जातो. तथापि जलसिंचन हेच या प्रकल्पाचे

प्रमुख उद्दिष्ट आहे.

(३७) बागी प्रकल्प : मध्य प्रदेशात जबलपूर जिल्ह्यात बार्गी नदीवर धरण.

बहुउद्देशीय प्रकल्प.

(३८) कृष्णा प्रकल्प : महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात कृष्णा नदीवर धोम येथे, तर

वारणा या कृष्णेच्या उपनदीवर कन्हेर येथे अशी दोन धरणे. प्रमुख उद्देश जलसिंचन.

(३९) रामगंगा प्रकल्प : सध्याच्या उत्तरांचल राज्यात गढवाल प्रदेशात रामगंगा या

गंगेच्या उपनदीवर धरण. पूरनियंत्रण व जलसिंचन हे उद्देश. दिल्ली शहरास पिण्याच्या

पाण्याचा पुरवठा.


(४०) राजस्थान कालवा : यामध्ये 'पोग' धरणातून सोडलेल्या पाण्याचा उपयोग

करून राजस्थानातील, विशेषतः थरच्या वाळवंटातील जमीन भिजविली जाणार आहे. या

प्रकल्पांतर्गत ४४५ कि. मी. लांबीचा मुख्य कालवा संपूर्णपणे राजस्थानातून जाणार असून,

इतर कालव्यांचाही बराचसा भाग राजस्थानातून जाणार आहे.

(४१) पोचमपड प्रकल्प : आंध्र प्रदेशातील गोदावरी नदीवरील प्रकल्प


मुख्य


उद्देश


जलसिंचन.


(४२) मलप्रभा प्रकल्प


मलप्रभा नदीवरील कर्नाटक राज्यातील बेळगाव


जिल्ह्यातील प्रकल्प.


October 02, 2020

भारत वने अभयारण्ये

भारतातील राष्ट्रीय उद्याने

राष्ट्रीय उद्यान                                                                   स्थान

१. कार्बेट राष्ट्रीय उद्यान (वाघांसाठी राखीव)                            नैनिताल (उत्तरांचल)

२. हजारीबाग राष्ट्रीय उद्यान                                                  हजारीबाग (झारखंड)

३. शिवपुरी राष्ट्रीय उद्यान                                                    शिवपुरी (मध्य प्रदेश) 

४. कान्हा (कृष्णा) राष्ट्रीय उद्यान (वाघांसाठी राखीव)           मांडला (मध्य प्रदेश)

५. ताडोबा राष्ट्रीय उद्यान                                                   चंद्रपूर (महाराष्ट्र)

६. पेंच राष्ट्रीय उद्यान                                                   नागपूर (महाराष्ट्र)

७. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान                                     बोरीवली (मुंबई उपनगर)

८. नवेगाव राष्ट्रीय उद्यान                             

  नवेगाव-भंडारा (महाराष्ट्र)


९. बंदिपूर राष्ट्रीय उद्यान                     

 म्हैसूर (कर्नाटक)

 

१०. बांधवगड राष्ट्रीय उद्यान            

  शहादोल (मध्य प्रदेश)


११. दुधवा राष्ट्रीय उद्यान (वाघांसाठी राखीव)    

लखीमपूर (उत्तर प्रदेश)


१२. काझिरंगा राष्ट्रीय उद्यान (एकशिंगी गेंडा)   

जोरहाट (आसाम)


१३. नागरहोल राष्ट्रीय उद्यान  कूर्ग (कर्नाटक)   


१४. रोहिया राष्ट्रीय उद्यान   कुलू (हिमाचल प्रदेश)


१५. एरावीकुलम राजमलय राष्ट्रीय उद्यान   इद्दुकी (केरळ)


१६. गिंडी राष्ट्रीय उद्यान    चेत्रई (तमिळनाडू)







१७. भरतपूर राष्ट्रीय उद्यान (पक्षी)  भरतपूर (राजस्थान)


१८. बन्नरघट्टा राष्ट्रीय उद्यान (हत्ती)   बंगळूर (कर्नाटक)


१९. खांगचेंदझोंगा राष्ट्रीय उद्यान    गंगटोक (सिक्कीम)


२०. वाल्वादार राष्ट्रीय उद्यान (लांडगे)    

भावनगर (गुजरात)


२१. बेटला राष्ट्रीय उद्यान (वाघ)    

पलामू (झारखंड)


भारतातील अभयारण्ये


अभयारण्य                                                     स्थान


१. पेरियार अभयारण्य (हत्ती)                   इद्दुकी (केरळ)


२. गीरचे अभयारण्य (सिंह)              जुनागड (गुजरात)


३. चंद्रप्रभा अभयारण्य              वाराणसी (उत्तर प्रदेश)







४. जालपाडा अभयारण्य   जलपैगुडी (प. बंगाल)



५. राधानगरी अभयारण्य (गवे) कोल्हापूर (महाराष्ट्र)

६. मेळघाट अभयारण्य (वाघ)   अमरावती (महाराष्ट्र)

७. देऊळगाव-रेहेकुरी अभयारण्य (काळवीट)     अहमदनगर (महाराष्ट्र)


८. सुंदरबन अभयारण्य (वाघ)      चोवीस परगणा (प. बंगाल)





९. मानस अभयारण्य (वाघ)            बारपेटा (आसाम)


१०. इंद्रावती अभयारण्य (वाघ)               छत्तीसगढ़

११. रणथंबोर अभयारण्य (वाघ)                सवाई माधवपूर (राजस्थान)

१२. नल सरोवर अभयारण्य (पक्षी)    अहमदाबाद (गुजरात)




१४. दाचिगम अभयारण्य (हंगूल-हरिणांची एक जात)             श्रीनगर (जम्मू-काश्मीर)



१३. सुलतानपूर लेक अभयारण्य (पक्षी)    गुरगाव (हरियाना)



१५. घटप्रभा अभयारण्य (पक्षी)              बेळगाव (कर्नाटक)

१६. मेलपट्ट् अभयारण्य (पक्षी)     नेल्लोर (आंध्र प्रदेश)



१७. पलामू अभयारण्य (वाघ)                   दातीनगंज (झारखंड)


१८. पुलिकत अभयारण्य (पाणपक्षी)             पुलिकत (आंध्र प्रदेश)


१९. सिमलीपाल अभयारण्य (वाघ)      मयूरभंज (ओरिसा)

  

२०. मुदुमलाई अभयारण्य  नीलगिरी (तमिळनाडू)


२१. नागार्जुनसागर श्रीशैलम अभयारण्य

२२. रंगनधिट्ट् अभयारण्य (पक्षी)

२३. आचंकमार अभयारण्य (वाघ)

२४. भद्रा अभयारण्य (हत्ती)

२५. भीमबंध अभयारण्य (वाघ)


आंध्र प्रदेश

म्हैसूर (कर्नाटक)

बिलासपूर (छत्तीसग

चिकमंगळूर (कर्नाट

मोंघीर (बिहार)

सिंगभूम (झारखंड)

ऐजवाल (सिक्कीम)

अदिलाबाद (आंध्र !

हजारीबाग (झारखंड

खामाम (आंध्र प्रदेश

शिमोगा (कर्नाटक)

मंडी (हिमाचल प्रदेश

तेजपूर (आसाम)

वारंगळ (आंध्र प्रदेश

तानसा-ठाणे (महारा

बेल्लारी (कर्नाटक)

कन्नानोर आणि कोझाई

धारवाड (कर्नाटक)

मंदसौर (मध्य प्रदेश

भरतपूर (राजस्थान)

गया (बिहार)

कोहिमा (नागालैंड)

काही अभयारण्यांच्या नावांपुढे कंसात काही विशेष प्राण्यांची नावे दि

प्राण्यांव्यतिरिक्त इतर प्राणीही त्या अभयारण्यांमध्ये आहेत. कंसात नमूद केलेल

अभयारण्यात विशेषत्वेकरून आढळतात, हे या ठिकाणी लक्षात घेणे अगत्याचे|


२६. दालमा अभयारण्य (वाघ)


२७. दामपा अभयारण्य (वाघ)


२८. कावल अभयारण्य


२९. हजारीबाग अभयारण्य

३०. किन्नेरसानी अभयारण्य

३१. शरावती खोरे अभयारण्य

३२. शिकारीदेवी अभयारण्य

३३. सोनलरूपा अभयारण्य

३४. तडवाई अभयारण्य


के


३५. तानसा अभयारण्य


कें


३६. तुंगभद्रा अभयारण्य


३७. वायनाड अभयारण्य


३८. दांडेली अभयारण्य (वाघ)

३९. गांधीसागर अभयारण्य (चितळ)


४०. घाना पक्षी अभयारण्य


४१. गौतम बुद्ध अभयारण्य (वाघ)

४२. इटांगकी अभयारण्य (हत्ती)


Tuesday, 22 September 2020

September 22, 2020

इंदिरा गांधी भाग 1

 इंदिरा गांधी (१९१७-१९८४)



१९ नोव्हेबर १९१७ रोजी अलाहाबादेत जन्म. आजोबा मोतीलाल नेहरू, बडील ।

जवाहरलाल नेहरू व आई कमला नेहरू यांच्या विचारांचे संस्कार इंदिराजीवर प्, ।

इदिराजीचे शालेय शिक्षण अलाहाबाद, पुणे, मुंवई येथे पूर्ण झाले. २६ मार्च १९४२ रई


त्यांचा फिरोज गांधी यांच्याशी विवाह झाला.

लहानपणापासूनच स्वातंत्र्यलद्धाकडे त्यांची ओढ होती. १९२८ मध्ये गांधीजोर

स्थापन केलेल्या बालचरखा संघात त्या सहभागी झाल्या होत्या. १९३० मध्ये त्यांनी कोर।

स्वयंसेवकांच्या साहाय्यासाठी 'मुलांची वानरसेना' स्थापन करून असहकार चळ्रव

सहभाग घेतला. १९४२ मधील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अलाशाबाद

अधिवेशनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. १९४२च्या आंदोलनात त्यांना तुरुंगवासा्थ


शिक्षा झाली.

१९४७ साली भारत स्वतंत्र झाला. परंतु सीमाभागातील जातीय दग्यामुळे ।

स्वातंत्र्याच्या या आनंदावर विरजण पडले. इंदिराजींनी या वेळी जातीय दंग्यातील आपटार

निर्वासित यांच्यासाठी महात्माजींनी सुरू केलेल्या मदतकार्यात मोलाचा सहभाग पेतला,

सन १९५५ मध्ये इंदिराजी काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्या झाल्या. १९५९ मधे

त्याची काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून निवड झाली. काँग्रेसच्या त्या चौथ्या महिला अघकष

होत. महाराष्ट्रात चालू असलेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीवावतची त्यांची भूमिका

अतिशय समजूतदारपणाची होती. संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात येण्यास त्यांचे प्रयत्ते

कारणीभूत होते.

सन १९६२ मधील भारत-चीन युद्धाच्या वेळी तेजपुर येथील लष्करी छावण्यान

भेटी देऊन जवानांना नैतिक धैर्य देण्याचे धाडसी कार्य त्यांनी पार पाडले.

नेहरूच्या निधनानंतर शास्त्रीजी भारताचे पंतप्रधान झाले. शास्त्रीजींच्या मंत्रिमंडळात

इंदिराजींकडे माहिती व नभोवाणी खाते सोपविले गेले. शास्त्रीजींच्या कारकीर्दीत १९६५

मध्ये पाकने काश्मीरवर आक्रमण केले. या युद्धात पाकचा सपाटून पराभव झाली. १०

जानेवारी १९६६ रोजी शास्त्रीजींनी पाकबरोबर तत्कालिन सोव्हिएत युनियनमधील तार्कद

येथे झालेल्या शांतता करारावर स्वाक्षरी केली. त्या दिवशीच मध्यरात्री ताश्कंद पे

शास्त्रीजींचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

शास्त्रीजींच्या निधनानंतर १९ जानेवारी १९६६ रोजी इंदिराजींची कॉग्रेस संसरन

पक्षाच्या नेतेपदी बहुमताने निबड झाली. २४ जानेवारी १९६६ रोजी त्या वेळचे राष्ट्रपण

डॉ. राधाकृष्णन यांनी त्यांना पंतप्रधानपदाची शपथ देवविली. त्यांच्या कारकीदस


Saturday, 29 August 2020

August 29, 2020

भारत नदी प्रणाली Indian River System

भारत नदी प्रणाली 

उगमस्थान व त्यानुसार येणारी इतर वैशिष्ट्ये यांचा विचार करता भारतातील नद्यांचे हिमालयीन नद्या व द्वीपकल्पीय नद्या, असे मुख्यतः दोन प्रकार पडतात.

हिमालयीन नद्या

हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांचे गंगा नदीप्रणाली, सिंधू नदीप्रणाली आणि ब्रह्मपुत्रा नदीप्रणाली, अशा प्रकारे वर्गीकरण केले जाते.गंगा नदीप्रणाली : अलकनंदाभागीरथी  यांच्या एकत्रित प्रवाहासच पुढ़े गंगा  नदी म्हणून ओळखले जाते. यांपैकी अलकनंदा ही नदी उत्तर प्रदेश व तिबेट यां सीमाभागात 'अलकापुरी' येथे उगम पावते, तर भागीरथी 'गंगोत्री'जवळ उगम पावते 



अलकनंदा व भागीरथी हे दोन प्रवाह 'देवप्रयाग' येथे एकत्र येतात. एकत्रीकरणानंतर गंगा म्हणून नामाभिधान पावलेली ही नदी हरिद्वाराजवळ मैदानात उतरते. यमुना, शोण व दामोदर या तिच्या उजव्या किनार्यावरील उपनद्या आहेत; तर रामगंगा, गोमती, घाघ्रा, गंडक कोसी आणि महानंदा या तिच्या डाव्या किनाऱ्यावरील  उपनद्या आहेत 

यमुना ही गंगेची प्रमुख उपनदी तिला अलाहाबादजवळ मिळते. सरस्वतीचा प्रवाहही येथेच गंगेत विलीन होतो. गंगा नदी भारतात उत्तरांचल, उत्तर प्रदेश बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमधून वाहते. फराक्काच्या पुढे गंगेचा मुख्य प्रवाह आग्नेयेकडे वळून बांगलादेशात प्रवेश करतो. हा प्रवाह बांगलादेशात 'पद्मा' नावाने ओळखला जातो. या 'पद्मे'ला म्हणजेच मूळच्या गंगेस बांगलादेशात ब्रह्मपुत्रा नदी येऊन मिळते. हा एकत्रित प्रवाह पुढे बांगलादेशात 'चंदिपूरजवळ बंगालच्या उपसागरास मिळतो.

ब्रह्मपुत्रा नदीप्रणाली : 

ब्रह्मपुत्रेचा मूळ प्रवाह किंवा ओघ तिबेटमध्ये मानस सरोवराजवळ उगम पावतो. तिबेटमधून वाहताना या प्रवाहास 'त्सांगपो' नावाने ओळखले जाते. अरुणाचल प्रदेशात भारतीय हद्दीत प्रवेश करताना या मूळ प्रवाहास दिबांग व लोहित या नद्या मिळतात. यांच्या एकत्रित प्रवाहासच 'ब्रह्मपुत्रा' असे म्हटले जाते.ब्रह्मपुत्रा प्रामुख्याने अरुणाचल, आसाम यांसारख्या देशाच्या ईशान्य भागातील प्रदेशांत पूर्व-पश्चिम अशी वाहत जाऊन पुढे बांगलादेशात गंगेस मिळते. 

ब्रह्मपुत्रा ही तीन वेगवेगळ्या देशांतून वाहत जाणारी अशी आंतरराष्ट्रीय स्वरूपाची नदी आहे. तथापि, तिचे खोरे भारतापुरते तरी स्वतंत्र आहे. आसाममध्ये तिचे स्वरूप प्रचंड झालेले दिसून येते.तिला आसाममध्ये फार मोठे पूर येत असल्याने तिला 'आसामचे दुःखाश्रू' असे म्हटल जाते. सुबानशिरी, कामेंग, धानाशिरी, जयभोरेली, मानस व तिस्ता या तिच्या उजव्या किनार्यावरील नद्या होत; तर भूरी, दिहिंग, दिसांग व कोपोली या तिच्या डाव्या किनार्यावरील नद्या होत. गोलपारा, गुवाहाटी, दिब्रुगड व सादिया ही ब्रह्मपु्रेच्या काठा वसलेली महत्त्वाची शहरे होत.

सिंधू नदीप्रणाली :

सिंधू नदी तिबेटमध्ये हिमालयात मानस सरोवराजवळ कैलास पर्वतावर ५,१८० मीटर उंचीवर उगम पावते व जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय हर्दींत प्रवेश  करते. काश्मीरमधून ती लडाख आणि गिलगिट भागातून वाहत जाऊन पाकिस्तानात प्रवेश करते. काश्मीरमध्ये तिला श्योक, शिगार आणि गिलगिट या नद्या येऊन मिळतात. पाकिस्तानात ती नैऋत्य दिशेकडे वाहत जाऊन कराचीच्या पूर्वेस अरबी समुद्रास मिळते.

झेलम, चिनाब, रावी, सतलज व बियास या सिंधूच्या प्रमुख उपनद्या होत.

द्वीपकल्पीय नद्या

या नद्या मुख्यतः दक्षिणेच्या पठारावरील पर्वतरांगांमधून, जसे- सह्य, सातपुडा, अरवली- उगम पावतात. या मुख्यतः मोसमी पावसावर अवलंबून असतात; त्यामुळे त्यांना उन्हाळ्यात कमी पाणी असते. या नद्यांचे प्रामुख्याने पूर्ववाहिनी नद्या व पश्चिमवाहिनी नद्या, असे दोन गट पडतात.

पूर्ववाहिनी नद्या : 

बहुतेक पूर्ववाहिनी नद्या द्वीपकल्पाच्या पठारी भागातून वाहत जाऊन बंगालच्या उपसागरास मिळतात. या नद्यांनी त्यांच्या मुखाजवळ विस्तृत असे त्रिभुज प्रदेश निर्माण केले आहेत.

गोदावरी प्रणाली : 



गोदावरीची लांबी सुमारे १,४५० कि. मी. असून, द्वीपकल्पीय पठारी प्रदेशातील ती सर्वांत महत्त्वाची नदी होय. तिचे खोरे भारतातील दुसऱ्या व द्वीपकल्पीय पठारी प्रदेशातील पहिल्या क्रमांकाचे मोठे खोरे असून, देशाच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे १० टक्के भाग या खोऱ्याने व्यापला आहे. महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वरजवळ 'ब्रह्मगिरी' येथे उगम पावणारी ही नदी प्रामुख्याने महाराष्ट्र व आंध्र प्रदेश या राज्यांतून वाहते व आंध्र प्रदेशात राजमहेंद्रीजवळ पूर्व किनाऱ्यावर बंगालच्या उपसागरास मिळते. तिचे व तिच्या उपनद्यांचे खोरे महाराष्ट्र, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, कर्नाटक, ओरिसा व आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये पसरले आहे. तिची लांबी व महत्त्व लक्षात घेता तिला 'दक्षिणेची गंगा' म्हणून संबोधले जाते. मांजरा, पैनगंगा, वर्धा, वैनगंगा, प्राणहिता व इंद्रावती या गोदावरीच्या प्रमुख उपनद्या होत. प्राणहिता व इंद्रावती यांच्या खोऱ्यांत पावसाचे प्रमाण अधिक असल्याने पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने त्या अधिक महत्त्वाच्या आहेत.

कृष्णाप्रणाली : 

कृष्णा नदी महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात 'महाबळेश्वर' येथे उगम पावते. १,२९० कि. मी. लांबीची ही नदी महाराष्ट्र तसेच कर्नाटक व आंध्र प्रदेशांतून वाहत जाते. कृष्णेचे खोरे हे गोदावरी खालोखाल द्वीपकल्पीय पठारी प्रदेशातील दुसरे महत्त्वाचे व मोठे खोरे गणले जाते. द्वीपकल्पीय भारतातील या दुसऱ्या क्रमांकाच्या नदीस एकूण २२२ उपनद्या मिळत असून त्यांपेकी २१ उपनद्या एकाहून अधिक राज्यातून वाहणार्या आहेत. कोयना, वेरळा, वारणा, पंचगंगा, वेण्णा, घटप्रभा, मलप्रभा, भीमा, तुंगभद्रा या कृष्णेच्या महत्त्वाच्या उपनद्या होत.

कावेरी नदीप्रणाली : कर्नाटक राज्यात कुर्ग जिल्ह्यात पश्चिम घाटात 'ब्रह्मगिरी' येथे उगम पावते. ७६० कि. मी. लांबीची ही नदी कर्नाटक, तामिळनाडूमधून वाहात जाऊन तामिळनाडूमध्ये कावेरीपट्टणमजवळ बंगालच्या उपसागरास मिळते. हेमवती, लोकपावनी, शिमसा व अर्कावती या कावेरीच्या डाव्या किनाऱ्यावरील उपनद्या होत; तर लक्ष्मणतीर्थ, काविनी, सुवर्णगावती, भवानी व अमरावती या तिच्या उजव्या किनार्यावरील उपनद्या होत. कर्नाटकच्या पठारी भागातून तामिळनाडूच्या मैदानी प्रदेशात प्रवेशताना कावेरीच्या मार्गात 'शिवसमुद्रम्' हा प्रसिद्ध धबधबा निर्माण झाला आहे. जलसिचन व विद्युतनिर्मिती यासाठी हिची सुमारे ९० टक्के क्षमता वापरली जाते, हे येथे लक्षात घेणे आवश्यक आहे. कावेरीचे खोरे द्वीपकल्पीय पठारी प्रदेशातील चौथ्या क्रमांकाचे मोठे खोरे आहे.

महानदीप्रणाली :

 ८९० कि. मी. लांबीची ही महत्त्वाची नदी मध्य प्रदेशातील छत्तीसगड विभागात उगम पावते व ओरिसामध्ये कटकच्या दक्षिणेस बंगालच्या उपसागरास मिळते. कृष्णेच्या खालोखाल महानदीचे खोरे द्वीपकल्पीय पठारी प्रदेशातील तिसर्या क्रमांकाचे खोरे गणले जाते.

पश्चिमवाहिनी नद्या

पश्चिमवाहिनी नद्या तीव्र उतारावरून वाहाणाऱ्या कमी लांबीच्या, उथळ व खळखळणार्या आहेत. पश्चिमवाहिनी नद्यांमध्ये नर्मदा, तापी, सरस्वती, नेत्रावती, पेरियार इत्यादी महत्त्वाच्या नद्यांचा समावेश होतो. नर्मदा व तापी या विशेष महत्त्वाच्या पश्चिमवाहिनी नद्या होत.

नर्मदा नदी : 

नर्मदा नदी मध्य प्रदेशात अमरकंटकजवळ उगम पावून नैऋत्येकड वाहात जाते. शेवटी गुजरातमध्ये भडोचजवळ ती अरबी समुद्रास मिळते. नर्मदेचे खोरे  मुख्यत्वे मध्य प्रदेशातच पसरलेले असून त्या खोऱ्याचा फक्त दहावा हिस्सा गुजरातमध्ये आहे. सर्वसाधारणपणे आकारमानाने कावेरी खोऱ्याइतकेच असलेले हे खोरे कावेरीप्रमाणेच द्वीपकल्पीय पठारी प्रदेशातील चौथ्या क्रमांकाचे खोरे गणले जाते. बऱ्हनेर, बंजार, शार, शक्कर, दुधी व तवा या नर्मदेच्या डाव्या किनाऱ्यावरील उपनद्या होत; तर हिरण, ओरसांग, बारणा व कोलार या तिच्या उजव्या किनाऱ्यावरील उपनद्या होत.

तापी नदी : 

तापी नदी मध्य प्रदेशात बेतुल जिल्ह्यात मुलताईजवळ उगम पावते. कमीअधिक प्रमाणात नर्मदेस समांतर अशीच वाहात जाऊन ती सुरतजवळ अरबी समुद्रास मिळते. तापी नदीचे खोरे मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या राज्यांतील काही प्रदेशांत पसरलेले आहे. तापी नदीच्या मुखाजवळील काही भागाचा वाहतुकीसाठी उपयोग होतो. पूर्णा ही तापीची एक महत्त्वाची उपनदी आहे. याशिवाय बेतुल, पातकी, गंजाल, अणेर, अरुणावती, गोगाई इत्यादी तिच्या उजव्या किनाऱ्यावरील उपनद्या असून अंभोरा, खुरसी, वाघुर, गिरणा, बोरी, पांझरा या तिच्या डाव्या किनाऱ्यावरील उपनद्या होत.

साबरमती नदी :

 ही नदी राजस्थानात अरवली पर्वतात उगम पावून राजस्थान व गुजरात राज्यातून नैऋत्येकडे वाहात जाते व शेवटी खंबायतच्या आखातात अरबी समुद्रास मिळते. अहमदाबाद हे तिच्या काठचे महत्त्वाचे शहर होय.

मही  नदी : 

विंध्य पर्वतात उदयपूरच्या पूर्वेस उगम पावणारी ही नदी राजस्थान, मध्य प्रदेश व गुजरातमधून वाहात जाऊन अरबी समुद्रास मिळते.


Friday, 28 August 2020

August 28, 2020

भारत मृदा प्रणाली Indian Soil System

 भारत- मृदा

ज्यामध्ये वनस्पतीजीवन समृद्ध होते अशा भूपूष्ठाच्या सर्वांत वरच्या भुसभुशीत थरास मृदा' असे म्हणतात. मृदा मुख्यतः तळखडकांपासून बनते. मृदा बनण्याची प्रक्रिया दीर्घकाळ चालू असते. या प्रक्रियेत खडकांचे बारीक-बारीक कणांत रूपांतर होऊन मृदा तयार होत असते. स्थानिक परिस्थितीनुसार या प्रक्रियेत बदल होत असतात. त्या-त्या प्रदेशातील हवामान, तळखडकाचा प्रकार, जमिनीतील पाण्याचा अंश, जमिनीतील वनस्पतीजन्य आणि प्राणिजन्य पदार्थांचे प्रमाण, जमिनीचा उतार इत्यादी बाबींचा मृदेच्या निर्मितीवर व तिच्यातील घटकद्रव्यांच्या प्रमाणावर परिणाम घडून येतो. 

भौगोलिक स्थानानुसार वरील घटकांमध्ये बदल होत असल्याने वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशात वेगवेगळे मृदा प्रकार आढळतात.

भारतासारख्या महाकाय देशात वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या भौगोलिक परिस्थितीत फार मोठ्या प्रमाणावर फरक आढळून येतो. परिणामी देशातील वेगवेगळी भोगोलिक परिस्थिती असलेल्या ठिकाणी आढळणार्या मृदेच्या स्वरूपात व गुणधर्मातही मोठ्या प्रमाणावर विविधता आढळते. 

भारत देशात आढळणारे काही मृदाप्रकार पुढीलप्रमाणे-

गाळाची मृदा : 

नदीच्या जोरदार प्रवाहामुळे व तीव्र अशा उतारावरून वाहाण्यामुळे खडकांचे बारीक-बारीक तुकडे होतात; खडकांची मोठ्या प्रमाणावर झीज होते. ठिसूळ खडकांचे छोटे-छोटे तुकडे होतात. प्रदीर्घ काळ चालणाऱ्या या प्रक्रियेतून निर्माण झालेली मृदा नदीच्या मुख्य प्रवाहाबरोबर वाहत येऊन संचयित केली जाते. सखल मैदानी प्रदेशात एकावर एक या प्रकारे या मृदेचे थर साचतात. देशातील उत्तरेकडील मैदानी प्रदेश हा अशा प्रकारे डोंगर भागाची झीज घडवून वाहून आलेल्या गाळाच्या मातीने बनलेला आहे. 

या गाळमातीचे 'भांगर' आणि 'खादर' असे दोन मुख्य प्रकार पडतात. 

'भांगर' म्हणजे पूर्वी केव्हातरी वाहून येऊन संचयित झालेली माती होय. ही माती मैदानातीलच उंचवट्याच्या भागात नद्यांपासून दूर आढळते. ही माती राखट रंगाची असून तिच्या थरांची जाडी बरीच असते. नव्यानेच वाहून येऊन संचयित झालेल्या गाळमातीस 'खादर' असे म्हणतात. नदीखोर्यातील सखल व कमी उंचीच्या भागात ही माती आढळते. दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे खादर मातीच्या पृष्ठभागावर गाळाच्या नव्या थरांची भर पडते. साहजिकच ही माती शेतीसाठी अधिक उपयुक्त ठरते. त्यामुळे आर्थिक दृष्टीकोनातून या मृदा प्रकारास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. 

गहू, तांदूळ यांसारखी तृणधान्ये व कापूस, ताग, ऊस यांसारखी पैसे मिळवून देणारी पिके (Cash Crops) या मातीत घेतली जातात.


वाळवंटी मृदा

गुजरात, राजस्थान, पंजाब आणि हरियानाच्या काही भागांतील मृदा या प्रकारच्या आहेत. साहजिकच ही मृदा वाळूमिश्रित असून तिच्यातील सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण बरेच कमी आहे. ही मृदा सच्छिद्र असून पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्यास या मातीत विविध कृषि उत्पादने घेता येतात. वाळवंटी मृदेने व्यापलेल्या प्रदेशात अधूनमधून काटेरी, खुरट्या वनस्पती आढळतात. 

रेगूर किवा काळी मृदा

या प्रकारची मृदा प्रामुख्याने दख्खनच्या पठारी प्रदेशात आढळते. दख्खनच्या पठाराचा फार मोठा भूभाग असिताष्म (बेसॉल्ट) या अग्निजन्य म्हणजेच लाव्हा रसापासून निर्माण झालेल्या खडकाने व्यापलेला आहे. प्रदीर्घकालीन प्रक्रिया होऊन या खडकांपासून रेगूर मृदेची निर्मिती झालेली आहे. या मृदेत मुख्यतः चिकणमाती, वाळू आणि काही प्रमाणात सेंद्रिय द्रव्ये असतात. त्यामुळेच या मृदेस काळपट रंग आलेला आहे. या मृदेचा काळपट रंग आणि तीमध्ये मोठ्या प्रमाणावर पिकवला जाणारा कापूस यामुळे या मृदेस 'ब्लॅक-कॉटनसॉईल' असेही म्हणतात. 

कापसाशिवाय ज्वारी, बाजरी यांसारखी अन्नधान्ये आणि ऊस व तेलबिया यांच्या उत्पादनासाठीही काळी मृदा उपयोगी आहे. या मृदेच्या थरांची सर्वाधिक जाडी नदीकाठावरील प्रदेशात आढळून येते; तर डोंगराळ भागात तिची जाडी कमी झालेली दिसते. महाराष्ट्रापुरता विचार करता 'रेगूर' हा राज्यातील सर्वांत महत्त्वाचा मृदा प्रकार ठरतो. राज्याच्या पठारी भागातील बराचसा भूभाग या मृदेने व्यापलेला आहे. गोदावरी, कृष्णा, भीमा, तापी, वर्धा आणि वैनगंगा नद्यांच्या खोन्यात रेगूरचे मोठे थर आढळून येतात.

तांबडी मृदा


ही मृदा प्रामुख्याने दक्षिण भारतात पूर्व घाटालगतच्या प्रदेशात आढळते. आंध्र प्रदेश व तामिळनाडू येथील मृदा बहुतांशी याच प्रकारची आहे. ईशान्य भारतातील आसामसारख्या भागात या मृदेचे विरळ पुंजके आढळतात. लोहाच्या अतिरिक्त प्रमाणामुळे या मृदेच्या तपकिरी वा पिवळसर छटाही आढळतात. ही मृदा म्हणजे चिकणमाती आणि वाळू यांचेच एक प्रकारचे मिश्रण असल्याने ती पुरेशी सच्छिद्र आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा लवकर होतो. शेतीच्या दृष्टीने ही मृदा मध्यम दर्जाची मानली जाते. नद्यांच्या खोऱ्यात तांबडया मृदेचे जाड थर असल्याने तेथे ती अधिक सुपीक आहे. अशा सुपीक मृदेत भात, तेलबिया आणि ऊस यांसारखी पिके घेतली जातात. डोंगराळ भागात या मृदेचे थर पातळ असल्याने त्या ठिकाणी ज्वारी, बाजरी यांसारखी भरड पि्क घेतली जातात. खासकरून उष्ण कटिबंधात सापडणाऱ्या मृदाप्रकारांपेकी हा एक आहे. मृदा : देशातील पश्चिम व वायव्य भागातील रुक्ष व कोरडया प्रदेशात ही आढळते

क्षारयुक्त अल्कली मृदा

उत्तर भारतातील वाळवंटी अर्ध  वाळवंटी प्रदेशातील रुक्ष आणि कोरड्या भागात क्षारयुक्त मृदा आढळते. या मृदेतप्रमाण बरेच असते. कॅल्शियम आणि सोडियम या मूलद्रव्यांचे प्रमाण आढळते.

किनारी भागातील खारटान जमिनीत छोट्या-छोट्या पुंजक्यांच्या स्वरूपात खारी मृदा आढळते. हीही एक प्रकारची अल्कली मृदाच होय.

डोंगराळ आणि वन्य प्रदेशातील मृदा

हिमालय, ईशान्येकडील आणि कर्नाटकातील कूर्गसारख्या भागात डोंगरी मृदा आढळते. हा भाग वनांखाली असल्याने या मृदेत पालापाचोळा, झाडाच्या फांद्या, प्राण्यांचे निर्माण झालेल्या सेंद्रिय द्रव्यांचे तसेच नायट्रोजनसारख्या घटक द्रव्यांचे असते. ही माती डोंगरउतारावर असल्याने तिचे वहन सतत चालू अ सुपीकताही कमी असते. मात्र ज्या ठिकाणी डोंगरउतारावरील माती पावस डोंगरतळाशी संचयित होण्याचे कार्य प्रदीर्घ काळ घडत आले आहे, डोंगरतळाशी या मातीचे जाड थर तयार झालेले दिसून येतात. अशा तुलनात्मकदृष्ट्या अधिक असते.

जांभळी मृदा

पश्चिम घाट प्रदेशात भीमाशंकरच्या दक्षिणेला लालसर रंगाची मृदा अधूनमधून आढळून येते. ही मृदा जांभा नावाच्या ल खडकांपासून बनलेली असल्याने तिला जांभी मृदा असे संबोधले जाते. दगडाची निर्मिती ही बेसॉल्ट या अग्निजन्य खडकांपासून झाली आहे. या प्रक्रियेसाठी भरपूर पाऊस आणि उष्णता यांची गरज असते. त्यामुळे जांभा आणि जांभी मृदा पश्चिम घाट आणि कोकणपट्टीतील जास्त पावसाच्या भा मृदेत चिकणमातीचे प्रमाण कमी असून जाड्या भरड मातीचे प्रमाण अधिक फारशी सुपीक नसल्याने तिच्यामध्ये भात, वरई, नाचणी यांसारखी भर जातात. आंबा, काजू, फणस यांसारखी फळेही या मातीत पिकवली जातात.


Thursday, 27 August 2020

August 27, 2020

भारत प्राकृतिक २ Lets Know India

भारत प्राकृतिक 2

गंगा, सिंधू व ब्रह्मपुत्रा यांच्या खोऱ्यांचा सपाट मैदानी प्रदेश या मैदानी प्रदेशाने उत्तरेकडे हिमालय आणि दक्षिणेकडे द्वीपकल्पीय पठार एकमेकांपासून वेगळे केले आहेत. असे म्हणता येईल की, उत्तरेकडे हिमालय पर्वतरांगा व दक्षिणेकडे द्वीपकल्पीय पठार यांच्यामध्ये गंगा, सिंधु, ब्रह्मपुत्रा व त्यांच्या उपनद्यांनी बनविलेला सपाट गाळाचा प्रदेश पसरलेला आहे. या सपाट मैदानी प्रदेशाने जवळजवळ ७ लक्ष चौ. कि. मी. इतके क्षेत्रफळ व्यापलेले आहे. गंगेचे मैदान मुख्यतः उत्तरांचल, उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार व पश्चिम बंगाल या राज्यांत येते.यमुना नदीच्या पश्चिम काठावर असलेल्या २०० ते ३०० मीटर इतक्या कमी उंचीच्या डोंगराळ प्रदेशाने गंगेचे मैदान सतलज मैदानापासून वेगळे केले आहे. सतलज मैदानात प्रामुख्याने पंजाब व हरियानातील मैदानी प्रदेश तसेच 'मरुस्थळी' व 'भांगर' हे राजस्थानमधील सखल प्रदेश येतात. पश्चिमेस हे मैदान राजस्थानच्या वाळवंटात विलीन होते. 

गंगेच्या मैदानाच्या पूर्वेस आसाम राज्यात ब्रह्मपुत्रा नदीचा चिंचोळा मैदानी प्रदेश आहे.नदीप्रवाहापासून दूर असलेले प्रदेश पुराच्या गाळाने व्यापलेले आहेत. हा गाळ भांगर' म्हणून ओळखला जातो, तर नदीप्रवाहाच्या जवळच्या प्रदेशातील गाळ तुलनेने नवीन असून त्याला 'खादर' असे म्हटले जाते. खादर प्रकारच्या गाळास पंजाबमध्ये 'बेत' असे नामाभिधान आहे. मैदानी भागाच्या दक्षिण सीमेवर चंबळ व शोण नद्यांच्या दरम्यान अतिरिक्त खननातून निर्माण झालेला 'दुर्भूमी' म्हणून ओळखला जाणारा प्रदेश आहे. या प्रकारचे भूरूप पंजाब व हरियानातील 'भाबर' प्रदेशातही आढळते. या मैदानातील गाळाचे भरण इतके प्रचंड आहे की, १५० ते ३५० मीटर खोलीपर्यंत तळखडक लागत नाही. गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा व त्यांच्या उपनद्यांनी निर्माण केलेले हे विस्तृत मैदान इतके सखल आहे की, कित्येक किलो मीटरपर्यंत कोणताही भू-उठाव नजरेस येत नाही. या मैदानाचा मंद उतार बंगालच्या उपसागराकडे आहे. गंगा व ब्रह्मपुत्रा यांच्या मुखाजवळ ५१,३०६ चौ. कि. मी. इतका विस्तृत असा त्रिभुज प्रदेश निर्माण झाला आहे. पश्चिम बंगाल व बांगला देशमध्ये पसरलेला हा त्रिभुज प्रदेश 'सुंदरबन' म्हणून ओळखला जातो.

द्वीपकल्पीय पठारी प्रदेश

हा प्रदेश भूकवचाच्या पुरातन भागांपैकी एक असून ही भूमी देशातील सर्वांत प्राचीन म्हणजे ३८० कोटी वर्षापूर्वीची आहे. अनेक प्रकारचे उंचसखल भाग, लहान-मोठ्पया पर्वतरांगा, नद्यांनी तुलनेने अलौकडील काळात निर्माण केलेली खोरी व भरणाची अरुंद मैदाने या सर्वांचा अंतर्भाव या पठारी प्रदेशात होतो. या पठारी प्रदेशात पश्चिम घाट, पूर्व घाट, विध्य, सातपुडा, अरवली यांसारख्या पर्वतरांगा; तसेच छोटा नागपूर, माळवा यांसारखा पठारी प्रदेश समाविष्ट आहे. तापी नर्मदा, कृष्णा, गोदावरी, कावेरी, महानदी यांनी तयार केलेल्या गाळाच्या मैदानांचा व त्रिभुज प्रदेशांचाही यात अंतर्भाव होतो. या द्वीपकल्पीय पठाराचा सर्वसामान्य उतार पूर्वेकडे आहे. सुमारे १६ लक्ष चौ. कि. मी. विस्ताराच्या या पठाराच्या वायव्य सीमेवर अरवली पर्वत आहे. उत्तरेकडे बुंदेलखंडाचे उंचीचे भाग आहेत. कैमूर व राजमहल टेकड्यांनी या पठाराची उत्तर व ईशान्य सीमा व्यापली आहे. पश्चिम घाट व पूर्व घाट यांनी जणू या पठाराच्या पश्चिम व पूर्व सीमा निश्चित केल्या आहेत. या पठाराचा बराचसा भाग ४०० मीटरपेक्षा अधिक उंचीवर आहे. नर्मदा नदीच्या प्रस्तरभंगामुळे या पठाराचे दोन भाग पडले आहेत. यमुना नदी व विंध्य पर्वत यांच्या दरम्यान येणार्या झिजेच्या मैदानाला 'बुदेलखंड' म्हणून ओळखले जाते. नरमदेच्या उत्तरेकडील पठारास 'माळव्याचे पठार' व दक्षिणेकडील पठारास 'दख्खनचे पठार' असे सामान्यतः संबोधले जाते. केरळ राज्यातील 'अनाईमडी' (२,६९५ मीटर) हे द्वीपकल्पीय भारतातील सर्वोच्च शिखर आहे.

अरवली पर्वत :

 अरवली पर्वतरांगा या भारतातील सर्वांत प्राचीन पर्वतरांगा असून या नैरऋत्य-ईशान्य अशा पसरलेल्या आहेत. उत्तरेकडे या पर्वतरांगांची उंची ४०० मीटरपेक्षाही कमी आहे. गुरुशिखर १,७२२ मीटर हे या पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर होय. मही, लूनी व वनास यांसारख्या नद्या अरवली पर्वतात उगम पावतात. यांपैकी मही व लूनी या नद्या अरबी समुद्रास जाऊन मिळतात, तर वनास नदी चंबळ नदीला जाऊन मिळते.

विध्य पर्वत : 

या पूर्व-पश्चिम अशा पसरलेल्या महत्त्वाच्या पर्वतरांगा आहेत. या रांगांद्वारे उत्तरेस असलेले शोण नदीचे खोरे व दक्षिणेस असलेले नर्मदा नदीचे खोरे एकमेकांपासून वेगळे झाले आहे. वरीलपैकी शोण ही नदी पूर्ववाहिनी आहे, तर नर्मदा ही नदी पश्चिमवाहिनी आहे, हेही येथे लक्षात घेण्याजोगे आहे.

सातपुडा पर्वतरांगा : 

या रांगा विंध्य पर्वताला समांतर पूर्व-पश्चिम अशा जातात. या रांगांच्या उत्तरेला नर्मदा-खोरे व दक्षिणेला तापी-खोरे आहे. महादेव डोंगररांगा व गावीलगड टेकडया या सातपुडा रांगेच्याच उपरांगा होत. पंचमढी १,३५० मीटर हे सातपुडा पर्वतातील सर्वाधिक उंचीचे ठिकाण होय. सातपुडा पर्वतरांगेचा पूर्वेकडील भाग पुढे 'मैकल रांग' म्हणून ओळखला जातो.

छोटा नागपूर पठार : 

या पठाराने बिहार राज्याचा दक्षिण भाग व्यापलेला आहे. दगडी कोळशाच्या साठ्यांकरिता प्रसिद्ध असलेल्या या पठाराची सरासरी उंची ७०० मीटरइतकी आहे. दामोदर नदी या पठारावरील महत्त्वाची नदी होय. या पठाराच्या पूर्वेकडील प्रदेशात राजमहल टेकडया येतात.

पश्चिम घाट : 

पश्चिम घाटाला 'सह्याद्री' म्हणूनही ओळखले जाते. पश्चिम घाट किंवा सहा पर्वतरांगा या पश्चिम किनाऱ्याला समांतर अशा पसरलेल्या आहेत. कळसुबाई १,६४६ मीटर व साल्हेर १,५६७ मीटर ही सह्या पर्वताच्या उत्तर रांगांमधील उंच शिखरे होत. थळघाट व बोरघाट हया या रांगांमधील कोकण व देश यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या खिंडी आहेत. सह्याद्रीचा दक्षिण भूभाग ग्रॅनाइट व पट्टीताष्म (Gneiss) या प्रकारच्या खडकांचा बनलेला आहे. सहयाद्रीच्या दक्षिणेकडील रांगांमध्ये कुद्रेमुख १,८९२ मीटर व पुष्पगिरी १,७९४ मीटर ही उंच शिखरे आहेत. गुडलूरजवळ सह्याद्री व निलगिरीपर्वत एकत्र येतात. 'दोड्डाबेट्टा' २,६३७ मीटर हे निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर होय. निलगिरीच्या दक्षिणेस पालघाटची खिंड आहे. या खिंडीमुळे पश्चिम घाटाची सलगता नष्ट झाली आहे. पालघाट खिंडीच्या दक्षिणेला पर्वतरांगा विभागल्या गेल्या आहेत. विभागल्या गेलेल्या या रांगांपैकी उत्तरेकडील रांगेला 'अन्नमलाई', ईशान्येकडील रांगेला 'पलनी टेकडया' व दक्षिणेकडील रांगेस 'कार्डमम' या नावांनी ओळखले जाते.

दख्खनचे पठार : 

सातपुडा पर्वत, महादेव डोंगररांगा, पश्चिम घाट व पूर्व घाट यांच्या दरम्यान पसरलेला प्रदेश दख्खनचे पठार म्हणून ओळखला जातो. काही भागांत या पठाराची उंची ४६० मीटर तर काही भागांत कमाल १,२२० मीटर इतकी आहे. लाव्हारसाचे भूपृष्ठावर एकावर एक असे समांतर थर साचून हे पठार बनले आहे. सहय पर्वताच्या काही उपरांगा या पठारी भागात पसरलेल्या आहेत. गोदावरी-खोऱ्याच्या दरम्यान सातमाळा व अजिंठा डोंगररांगा, गोदावरी व भीमा-खोऱ्यादरम्यान हरिश्चंद्रगड व बालाघाट रांगा तर भीमा व कृष्णा यांच्या खोऱ्यांच्या दरम्यान महादेवाचे डोंगर या उपरांगा किनारपट्टीचा प्रदेश

पश्चिमेकडे कच्छच्या रणापासून पूर्वेकडे गंगा-ब्रह्मपुत्रा यांच्या त्रिभुज प्रदेशापर्यंत

भारताच्या मुख्य भूमीस एकूण ६,१०० कि. मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आे. अंदमान, निकोबार व लक्षद्वीप या बेटसमूहांच्या किनाऱ्याचा विचार करता भारतास एकूण ७,५१७ कि. मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. भारताच्या पश्चिमेस असलेला किनारा अरबी समुद्रालगत आहे; तर पूर्वेकडे बंगालच्या उपसागराचा किनारा आहे. मुख्य भूमीच्या दक्षिणेकडे हिंदी महासागराला लागून फारच थोडा असा किनारा आहे.

पूर्व किनारपट्टी : 



पश्चिमेकडील किनाऱ्यापेक्षा पूर्वेकडील किनारपट्टीचे मैदान अधिक रुंद आहे. गंगा, ब्रह्मपुत्रा, महानदी, कृष्णा, गोदावरी, कावेरी यांच्या त्रिभुज प्रदेशांमुळे काही ठिकाणी समुद्राच्या दिशेने किनारपट्टीचा विस्तार वाढला आहे. तसेच झीज होऊन पूर्वघाट पाठीमागे जाण्याची क्रिया घडत गेल्यामुळे या किनारपट्टीची रुंदी वाढली आहे. सागरातील वाळूच्या दांड्यांचे भरणाद्वारे पक्क्या जमिनीत रूपांतर झाल्याने मूळात सागराचा भाग असलेली पुलीकत, चिल्का व कोलेरू यांसारखी खाऱ्या पाण्याची सरोवरे या किनाऱ्यावर निर्माण झाली आहेत. तामिळनाडू व श्रीलंका यांचे दरम्यान या किनारपट्टीच्या जवळपास प्रवाळबेटे तयार झाली आहेत.

पश्चिम किनारपट्टी :

 पूर्व किनारपट्टीच्या तुलनेत पश्चिम किनारपट्टीचे मैदान बरेचसे अरुंद आहे. मध्य भागात ते विशेष अरुंद असून उत्तरेकडे त्याची रुंदी वाढलेली आहे. दक्षिणेकडे केरळच्या किनाऱ्यावर वाळूच्या भरणातून तयार झालेले दाड व त्यांच्यामागे तयार झालेली खाऱ्या पाण्याची सरोवरे (Back waters) हे या किनारपट्टार एक वैशिष्ट्य आहे. कर्नाटक व महाराष्ट्रात पश्चिम घाटातून लहान-मोठे प्रवाह समुद्राला ।

Wednesday, 26 August 2020

August 26, 2020

भारत प्राकृतिक 1- Lets Know India

भारत प्राकृतिक रचना 

भूस्वरूप यांचा विचार करून भारताचे हिमालयीन पर्वत-प्रदेश, गंगा- सतलज मैदानी प्रदेश, द्वीपकल्पीय पठारी प्रदेश, किनारपट्टीचा प्रदेश असे चार प्रमुख प्राकृतिक विभाग पाडले जातात.

हिमालयीन पर्वत-प्रदेश

हिमालय हा तरुण 'वली' पर्वत आहे. सागरतळावरून उचलल्या गेलेल्या वळयांपासून निर्माण झाल्यामुळे यातील खडक प्रामुख्याने स्तरित व रूपांतरित स्वरूपाचे आहेत. 

हिमालयाच्या प्रमुख रांगा वायव्येकडील पामीरच्या पठारापासून आग्नेयेकडील सरहद्द प्रदेशापर्यंत अशा २,४१४ कि. मी. लांबीच्या प्रदेशात पसरलल्या आहेत. माऊंटएव्हरेस्ट ८,८४८ मीटर, कांचन-गंगा ८,५९८ मीटर व धवलगिरी ८,१७२ मीटर यांसारखी उंच शिखरे या भागात आहेत.

 हिमालय पर्वतरांगांमुळे मुख्य आशिया खंडापासून भारतीय उपखंड भौगोलिकदृष्ट्या वेगळे झाले आहे. हिमालयाच्या २,४८६ मीटर उंचीपासून ४,३७७ मीटर उंचीदरम्यानच्या भागात झोझीला, नथुला, रोहतांग व लापचा यांसारख्या काही खिंडी आहेत. त्यातून हिमालयाच्या अंतर्गत भागातील दुर्गम प्रदेशांशी संपर्क साधणे शक्य होते. हिवाळ्यात या खिंडी बंद होत असल्याने पर्वतांतर्गत अशा बऱ्याचश्या भागाचा इतर जगाशी असलेला संबंध तुटला जातो. हिमालयाच्या प्रमुख रांगा पूर्वेकडे ब्रह्मपुत्रेपासून पश्चिमेकडे सिंधुनदीपर्यंत पसरलेल्या आहेत. 

मुख्य रांगांपासून वळयांच्या स्वरूपात काही उंच रांगा वेगळ्या झालेल्या दिसतात. हिमालयाचा फार मोठा परिसर उंच पर्वतरांगा व खोल दऱ्या यांनी व्यापलेला असून तीव्र उतारांचे पर्वतभाग व इंग्रजी व्ही (V) आकाराच्या दऱ्या ही या प्रदेशातील भू-वैशिष्ट्ये सांगता येतील.

                                    हिमालयाच्या उंचीवरच्या काही भागात हिमनद्या असून या हिमनद्यांच्या कार्यामुळे इंग्रजी (U) आकाराच्या दऱ्या, गिरिशृंगे व हिमानी सरोवरे निर्माण झाली आहेत. हिमालय पर्वताच्या एकमेकीना समांतर असणाऱ्या चार प्रमुख रांगा स्पष्ट दिसून येतात. या प्रमुख रांगांच्या उपरांगा एकमेकीत मिसळून काही ठिकाणी क्लिष्ट अशी भूरचना निर्माण झाली आहेत 

ट्रान्स  हिमालयाज :

 हा पर्वतभाग काही पर्वतरांगा व अतिउंचीवरील पठारी प्रदेश यांचा मिळून बनलेला आहे. याची सरासरी उंची ६,००० मीटर इतकी आहे. भारताच्या संदर्भात विचार करता हा भाग सर्वांत उत्तरेकडील अंतर्गत भाग गणला जातो. या प्रदेशाची रुंदी सरासरी ४० कि. मी. इतकी आहे. पामीर पठार हा उंचीवरील पठारीप्रदेश याच भागात येतो. पामीरचे पठार भौगोलिकदृष्ट्या आशिया खंडाचा मध्य मानला जातो. या पठारीभागापासून पूर्वेस, आग्नेयेस, ईशान्येस व नैॠत्येस पर्वतरांगा पसरलेल्या आहेत.

 काराकोरम व कुनलुन या पर्वतरांगा हा पठारी भाग छेदून जातात. हाच पर्वतभाग  उत्तरेकडे झास्कर रांग म्हणून ओळखला जातो. 'K-2 ' किंवा 'गॉडविन ऑस्टीन 8611. मीटर है काराकोरम, रांगांतील सर्वोच्च पर्वतशिखर होय. हे शिखर भारतातील सर्वोच्च, जगातील क्रमांक दोनचे उच्च शिखर म्हणून गणले जाते

ट्रान्स हिमालयीन पर्वत प्रदेशात ईशान्य काश्मीरमध्ये लडाखचा पठारी प्रदेश येतो. लडाखच्या पठाराची सरासरी उंदी ५,३०० मीटर असून वास्तविक पाहाता त्यामध्ये तुटक स्वरूपाच्या अनेक पठारी प्रदेशांचा (जसे- लिंग-झी-तांग मैदान, अक्साई चीन आणि सौदा मैदान) यांचा अंतर्भाव होतो.

(२) ग्रेटर  हिमालयाज : 

हा प्रदेश 'हिमाद्री' म्हणून ओळखला जातो. इतर रांगांच्या तुलनेत हा सर्वांत सलग व उंच पर्वतप्रदेश आहे. याचा वायव्येकडील भाग नंगा पर्वत (८,१२६ मीटर) म्हणून ओळखला जातो. पूर्वेकडे अरुणाचल प्रदेशात हा भाग नामचा बरवा (७,७५६ मीटर) म्हणून संबोधला जातो. ग्रेटर हिमालयाची सरासरी उंची ६,१००मीटर असली तरी ८,००० मीटरहून अधिक उंचीची अनेक पर्वतशिखरे यात आहेत.माऊंट एव्हरेस्ट (८,८४८ मीटर) या जगातील सर्वोच्च शिखराबरोबरच कांचनगंगा (८,५९८ मीटर), नंदादेवी (७,८१७ मीटर) ही उंच शिखरे ग्रेटर हिमालयीन रांगांत मोडतात. हा पर्वतभाग बाराही महिने हिमाच्छादितच असतो. काश्मीर परिसरात या रांगांमध्ये २,४४० मीटर उंचीपर्यंत, तर मध्य भागात ३,९६० मीटर उंचीपर्यंत खाली येणार्या हिमनद्या आहेत.


(३) लेसर हिमालयाज :

 हा भाग 'हिमाचल' म्हणूनही ओळखला जातो. या पर्वतप्रदेशाची रुंदी ६४ ते ८० कि. मी. असून सरासरी उंची ३,००० मीटर इतकी आहे. असे जरी असले तरी ५,००० मीटरपेक्षा अधिक उंचीचीही काही पर्वतशिखरे या रांगांमध्ये आहेत. लेसर हिमालयीन रांगेचा दक्षिणाभिमुख उतार तीव्र असून उत्तराभिमुख उतार तुलनेने द स्वरूपाचा व घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. या रांगांमध्ये १.५०० ते १,६०० मीटर उंचीवर ओक वृक्षांची जंगले; १,६०० ते २,१०० मीटर उंचीच्या दरम्यान चीर,देवदार, ब्ल्यू-पाइन या वृक्षांची जंगले तर २,४०० मीटरपेक्षा जास्त उंचीवर बर्च, स्मूस सिल्व्हर फर या वृक्षांची जंगले आदळतात. काश्मीरमधील 'पीर पांजाल' ही लेसर हिमालयातील सर्वाधिक लांबीची पर्वतरांग असून ही रांग झेलम व बियास या नद्याचा दरम्यान येते. आग्नेयेकडे धोलाधार नावाने ओळखली जाणारी रांगही लेसर हिमालयाचा एक भाग असून सिमला (२,२०५ मीटर) हे थंड हवेचे ठिकाण याच रांगेत येते. १५० कि. मी. लांबीचे व ८० कि. मी. रुंदीचे जगपसिद्ध काश्मीर खोरेही लेसर हिमालयातय समुद्रसपाटीपासून १,७०० मीटर उंचीवर वसले आहे. या खोऱ्यातुन झेलम नदी वाहते