1 लोभी कुत्रा
एकदा एका कुत्र्याला खूप भूक लागली होती. तेव्हा त्याला रस्त्यामध्ये एक पोळीचा तुकडा सापडला. तो ती पोळीचा तुकडा एकटाच खाऊ इच्छित होता. म्हणून तोसगळ्यांची नजर चुकवून आपल्या तोंडात पोळी दाबून नदीवर निघुन गेला.
नदीवरील पूल पार करताना त्याला स्वत ची सावली
दिसली. त्या सावलीला तो दुसरा कुत्रा समजून त्याच्या तोडातील पोळी हिसकावण्याचा विचार करू लागला.
कुत्र्याच्या सावलीची पोळी खेचण्याच्या नादात त्याने चूकुन नदीत उडी मारली. तोंड उघडताच त्याच्या तोडालली पोळी पाण्यात पडली. अशाप्रकारे तो लोभी कुत्रा उपाशीच राहिला.
संकलित मूल्यमापन
प्रश्न खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
(१) कुत्र्याला रस्त्यात काय सापडले ?
कुत्र्याला रस्त्यात पोळीचा तुकडा सापडला.
(२) कुत्रा कुठे निघून गेला ?
कुत्रा नदीवर निघून गेला.
(३) पाण्यात कुत्र्याला काय दिसले ?
पाण्यात कुत्र्याला स्वतःचीच सावली दिसली.
(४) कुत्र्याने नदीत उडी का मारली?
सावलीच्या तोंडातील पोळी खेचण्याच्या नादात कुत्र्याने भुंकुन नदीत उडी मारली.
No comments:
Post a Comment