Studyfromhome.com Blog content is created for Primary Education Development.

Breaking

abhyas majha इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image

abhyas majha  इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image
Click On Image

Search This Blog

Saturday 22 May 2021

बोधकथा - सकारात्मक दृष्टिकोन - Moral Story

 बोधकथा - सकारात्मक दृष्टिकोन - Moral Story

आपण अनेक प्रकारची कामे करत असतो. त्यातील काही कामात आपल्याला यश येते तर काही कामात अपयश येते. जे लोक अपयशातूनही शिकतात आणि पुन्हा नव्या जोमाने कामाला लागतात, ते यशस्वी होतात; पण अपयशाने खचून जाऊन, निराश होऊन बसलेल्या लोकांना काहीही मिळत नाही. 


आपला दृष्टीकोन सकारात्मक असेल तर मनातल्या वाईट शंका आपोआप दूर होतात. स्वामी विवेकानंदांनी हाच उपदेश नेहमी केला. एक तरुण विवेकानंदांजवळ आला आणि म्हणाला, 'स्वामीजी, तासन्तास बंद खोलीत बसून मी ध्यानधारणा करतो. परंतु मनाला शांती लाभत नाही.' यावर स्वामीजी म्हणाले, "सर्वात प्रथम खोलीचा दरवाजा उघडा ठेव. आपल्या जवळपास राहणाऱ्या दु:खी, रोगी व भुकेल्या माणसांचा शोध घे. त्यांना यथाशक्ती मदत कर.' यावर त्या तरुणाने आपली शंका विचारली, 'एखाद्या रोग्याची सेवा करताना मी स्वत:च आजारी पडलो तर?' विवेकानंद म्हणाले, 'तुझ्या या शंकेने मला असं वाटतं की, प्रत्येक चांगल्या कार्यात तुला काहीतरी वाईट दिसतं. म्हणून तुला शांती लाभत नाही. 

शुभकार्याला उशीर लावू नये तसेच त्यातील उणिवाही शोधू नयेत, हाच मन:शांती मिळविण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग आहे.'


तात्पर्य : कोणतेही विधायक काम करताना सकारात्मक दृष्टी हवी.

No comments:

Post a Comment