Studyfromhome.com Blog content is created for Primary Education Development.

Breaking

abhyas majha इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image

abhyas majha  इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image
Click On Image

Search This Blog

Showing posts with label विज्ञान. Show all posts
Showing posts with label विज्ञान. Show all posts

Friday, 2 October 2020

October 02, 2020

Part of Plant वनस्पती अवयव

◆ वनस्पतीचे अवयव 

मूळ, खोड ,पान, फुले ,फळे हे वनस्पती चे अवयव आहे.

यांच्या गुणधर्माचा अभ्यास करून वनस्पतीचीओळख करून घेता येते. 



◆ मूळ. ( Root)


जमिनीखाली आधारासाठी वाढणारा वनस्पतीचा अवयव म्हणजे मूळ होय .

मुळे दोन प्रकारची असतात- सोटमूळ, तंतुमय मुळे सोटमूळ हे द्विदल वनस्पती मध्ये तर तंतुमय मूळ हे एकदल वनस्पती मध्ये असते .


● आदिमूळ 

बीच्या आतून जमिनीच्या दिशेने वाढणारा भाग म्हणजे आदीमुळ होय. याचेच पुढे मूळ होते. मुळाची वाढ जमिनीखाली होते .

● अंकुर 

जमिनीच्या वर वाढणारा भाग म्हणजे अंकुर होय. अंकुराचे पुढे खोड होते.

खोडाची वाढ जमिनीच्या वर होते.

● सोटमूळ

या प्रकारचे मूळ जमिनीलगत जाडसर असते.मात्र पुढे ते निमुळते होत जाऊन टोकदार होते .काही वनस्पतीत मुळाना उप मुळे सुद्धा फुटतात.

उपमुळे तिरपी वाढून जमिनीत दूरवर पसरतात. त्या मुळे झाडाला आधार देण्याचे कार्य सोटमूळ करते.

● मूलरोम

मूलरोम म्हणजे मुळांच्या टोकांच्या भागावर असणारे केसासारखे धागे.

● मूलटोपी 

मुळांच्या टोकाच्या भागात मूलटोपीची वाढ होत असते. आणि मुळाचा टोकाचा भाग हा नाजूक असल्याने हा भाग संरक्षित करण्यासाठी असणाऱ्या टोपीसारखा आवरणाला मूलटोपी असे म्हणतात .

● तंतुमय मुळे 

खोडापासून फुटणारी तंतुसारखी मुळे म्हणजे तंतुमय मुळे. 

तंतुमय मुळे ही द्विदल वनस्पती मध्ये दिसतात.

● आगंतुक मुळे

जमिनीच्या वरील खोडापासून वाढणारी मुळे म्हणजे आगंतुक मुळे.

उदाहरण- मका, ऊस, ज्वारी यांना दोन प्रकारची मुळे असतात. आगंतुक आणि जमिनी खाली असणारी मुळे.


● मुळांची कार्य 

मुळांचे नियमित कार्य माती घट्ट धरून ठेवणे.

पाणी ,खनिजे व क्षार शोषून घेणे व झाडाला पुरवणे. झाडाला आधार देणे.

● रूपांतरित मुळे, हवाई मुळे, आधार मुळे ,धावती मुळे, श्वसन मुळे 


● रूपांतरित मुळांची कार्य 

हवाई मुळे वातावरणातील बाष्प शोषण करतात. आधारमुळे जमिनीबाहेर झाडाला आधार देतात.

धावती मुळे प्रजननाचे कार्य करतात. तर श्वसन मुळे श्वसनाचे काम करतात.


◆ खोड (stem)

खोडाची वाढ ही जमिनीच्या वर होत असते.

 बी रूजल्यावर त्याच्या अंकुरा पासून जमिनीचा वर खोड तयार होते.

अंकुर जसजसा वाढतो तसतशी खोडाची लांबी सुद्धा वाढते. 

खोडावरच्या ज्या ठिकाणाहून पाने फूटतात त्याला पेरे म्हणतात.

दोन क्रमवार पेरा मध्ये जे अंतर असते त्याला कांडे म्हणतात.

खोडाच्या अग्र भागाला मुकुल असे म्हणतात.


◆ पान (leaf)

पेराच्या जागी खोडातून पाने फुटतात .

पाने सामान्यतः हिरव्या रंगाची पातळ आणि पसरट

असतात.


पानाचे भाग

●पर्णपत्र 

पर्णपत्र हा पानाचा पसरट भाग असतो .

● पर्णधारा

पर्णपत्राची कडा म्हणजे पर्णधारा

कर्णधाराचे प्रकार- सलग, खंडित किंवा दंतेरी

●पर्णाग्र 

पर्णपत्राचे पुढचे टोक म्हणजे पर्णाग्र.

पर्णाग्रचे प्रकार निमुळते, टोकदार व गोलाकार असे आहेत.

● देठ 

काही पानांना देठ असतात तर काही पानांना देठ नसतात.

●पर्णतल 

पर्णपत्राचा खोडाशी जोडलेला भाग म्हणजे पर्णतल होय.

● उपपर्ण

पानाच्या तळाशी असणारा छोटासा पानासारखा भाग म्हणजे उपपर्ण होय.


● पानांचे प्रकार दोन प्रकार पडतात

मुख्य प्रकार -साधे पान व संयुक्त पान


★ साधेपान 

या पानांमध्ये एकच पर्णपत्र असून एकच मध्यशीर असते. 

★ संयुक्त पान 

या पानांमध्ये मुख्य शिरे भोवती पर्णपत्र अनेक लहान-लहान परीक्षांमध्ये विभागलेले असते.


◆ पानांची मांडणी 

खोडावरील पानांच्या मांडणीनुसार पानांचे एकांतरित, आवर्ती ,संमुख, वर्तुळाकार असे प्रकार पडतात.

पर्णपत्राच्या आकारानुसार गोलाकार ,तरफदार, लंबाकार असे प्रकार पडतात.


◆ शिराविन्यास 

शिराविन्यास दोन प्रकारचा असतो.

● जाळीदार शिराविन्यास

पर्णपत्राच्या मध्यभागी एक जाड शीर असल्यामुळे मुख्य पर्णपत्र दोन भागांमध्ये विभागले सारखे दिसते.

या मुख्य शिरेला उपशिरा फुटलेल्या असतात आणि त्यांची जाळी तयार होते.

उदाहरणार्थ -द्विदल वनस्पतीची पाने -पिंपळ


● समांतर शिराविन्यास 

पर्णपत्राच्या सर्व शिरा या पर्णपत्राच्या सुरुवातीपासून ते थेट टोकापर्यंत एकमेकांना समांतर असतात.

उदाहरण -एकदल वनस्पतीची पाने -मका


◆ फुल (flower)

जास्वंद फुलांचे अवयव

●देठ 

फुलांचा देठ हे लांब किंवा आखूड असते. देठाचे एक टोक खोडाला जोडलेले असते. 

●पुष्पाधार 

सामान्यतः पसरट व फुगीर भाग जेथे फुल देठाला चिकटलेले असते.

फुलांचे सर्व भाग पुष्पा दारावर रचलेले असतात. 

● निदलपुंज 

निदलपुंज हा फुलांचा सर्वात बाहेरचा भाग असतो. हिरव्या रंगाचा संरक्षक असतो. कळी अवस्थेत पाकळ्यांना झाकून ठेवणारा हा अवयव आहे.


●दलपुंज

रंगीत किंवा रंग पाकळ्यांनी बनलेला दलपुंज असतो.

●पूमंग 

हा पुंकेसराचा बनलेला फुलाचा पुल्लिंगी भाग असतो. त्यात परागकोश व वृंत असतात.


●जायांग 

जायांग हा स्त्रि केसराचा बनलेला फुलाचा स्त्रीलिंगी भाग असतो. त्यात कुक्षीवृंत  व अंडाशय असते.


●परागीभवन

परागकण कुक्षी वर जाऊन पडण्याच्या क्रियेला परागीभवन म्हणतात.

यासाठी परागकोश पक्व होऊन फुटतो आणि त्यातील परागकण बाहेर पाठवले जातात.


● फलन 

अंडाशयातील बीजांडाचे फलन होऊन त्याचे रूपांतर बी मध्ये होण्याच्या क्रियेला फलन म्हणतात.

बीजांडाची बी होते आणि अंडाशयाचे रूपांतर फळांमध्ये होते.


◆ फळ (fruit)

★ प्रत्येक फळांमध्ये काही ठराविक वैशिष्ट्ये असतात. 

★फळांचा आकार, रंग, चव, कवचाची गराची व बियांची रचना, बियांची संख्या यामध्ये विविधता आढळून येते. 

★काही फळांमध्ये बी थोडेसे बाहेरच्या बाजूस दिसते. उदाहरण -काजू ,


● द्विदल वनस्पतीची बी 

ज्या बीचे दोन समान भाग होतात तिला द्विदल बी म्हणतात.

● एकदल बी 

ज्या बीचे दोन समान भाग होत नाही तिला एकदल बी म्हणतात.

Saturday, 29 August 2020

August 29, 2020

वनस्पती आणि प्राणी विविधता

सजीवातील विविधता आणि वर्गीकरण 

पृथ्वीवरील सर्व सजीव म्हणजेच वनस्पती आणि प्राणी हे एकसारखे नसतात. 

पृथ्वीवरील भौगोलिक परिस्थितीनुसार त्यांच्यामध्ये विविधता असते. 

भिन्न ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीमध्ये  सजीवांचे अस्तित्व टिकवून ठेवण्याची जी क्षमता सजीवांमध्ये असते त्यामुळे सजीवांमध्ये विविधता आढळून येते.


 वनस्पतीमध्ये

 स्वयंपोषी वनस्पती- स्वतःचे अन्न स्वतः तयार करणाऱ्या,

परपोषी वनस्पती- अन्नासाठी इतर सजीवावर अवलंबून असणाऱ्या 

आणि कीटक पक्षी- अन्न म्हणून कीटक खाणार्‍या वनस्पती  अशा प्रकारच्या वनस्पती आढळतात .


वनस्पतीची रचना यामध्ये वनस्पतीचे जमिनीच्या खाली असणारे भाग आणि जमिनीच्या वर असणारे भाग यांचा समावेश होतो.


 वनस्पती चे अवयव हे मूळ, खोड, पान, फुल आणि फळ हे आहेत.

◆ मूळ

मूळ वनस्पतीला आधार देण्याचे काम करते.

 माती घट्ट धरून ठेवते .

त्याचबरोबर वनस्पतीला पाणी आणि पोषण तत्वाचा शोषण करून पुरवठा सुद्धा करते.

 गाजर आणि मुळा यामध्ये वनस्पतीचे अन्नसाठा करण्याचे काम सुद्धा मूळ करतात.

 मुळांचे दोन प्रकार आहेत- सोटमूळ आणि तंतुमय

मूळ.



◆खोड

खोट हा जमीनीच्या वर वाढणारा भाग आहे. वनस्पतीची उंची ही खोडावर अवलंबून असते.

 खोड हे अन्ननिर्मिती ,अन्नाचा वहन करणे, अन्नाचा साठा करणे आणि काही वनस्पतींमध्ये पुनरुत्पादनाचे कार्य करते.

 याशिवाय वनस्पतीच्या इतर भागांना आधार देण्याचे सुद्धा काम करते.


◆पान 

वनस्पतीचे अन्न तयार करण्याचे काम पान करते. पानाचे त्याच्या रचनेनुसार साधे पान आणि संयुक्त पान हे प्रकार पडतात. प्रकाश संश्लेषण क्रिया पानांमध्ये होते.



◆फुल

 फुल हा वनस्पतीचा आकर्षक भाग आहे.

 फुलांना रंग आणि वास असतो.

 फुल पुनरुत्पादनाचे कार्य सुद्धा करतात.


फळ 

फळे ही वेगवेगळ्या आकाराची असतात.

काही फळांमध्ये एक तर काहींमध्ये अनेक बिया असतात.

 घेवडा ,वाटाणा यांच्या शेंगा म्हणजेच फळे आहे.


वनस्पतींचे वर्गीकरण 

वनस्पतीचे वर्गीकरण खोड जीवन क्रम फुले आणि अधिवास यानुसार होते.


खोड

खोडांचा आकार आणि उंचीनुसार वनस्पतीचे वृक्ष झुडूप, रोपटे आणि वेली असे वर्गीकरण होते.

 वृक्षांचे खोड टणक असते आणि ते उंच वाढतात आंबा, वड ,चिंच.


झुडूप

 हे दोन ते तीन मीटर पर्यंत वाढते.

 याचे खोड टणक असते.

 उदाहरण कन्हेर ,जास्वंद, घाणेरी.


रोपटे 

रोपट्यांची उंची एक ते दीड मीटर पर्यंत असते.

 त्याचे खोड लवचिक व हिरवे असते.

 उदाहरण .मेथी ,सदाफुली


वेली 

वेलींना वाढ होण्यासाठी आधाराची गरज असते. उदाहरण .भोपळा, कलिंगड, द्राक्ष, मनीप्लांट.


वनस्पतींचा जीवनक्रम 

यावरून वनस्पतीचे 

वार्षिक वनस्पती - केवळ एकच वर्ष जिवंत राहणाऱ्या,

द्विवार्षिक वनस्पती -दोन वर्षे जिवंत राहणाऱ्या आणि बहुवार्षिक वनस्पती -वर्षानुवर्षे जिवंत राहणाऱ्या असे प्रकार पडतात.

ज्वारी बाजरी गहू मका झेंडू या वार्षिक वनस्पती आहे .

गाजर बीट या द्विवार्षिक वनस्पती आहे .

विविध वृक्ष हे बहुवार्षिक वनस्पती आहे.


फुलांवरून 

वनस्पतीचे सपुष्प वनस्पती म्हणजे फुले येणाऱ्या वनस्पती व अपुष्प वनस्पती म्हणजे फुले न येणाऱ्या वनस्पती असे प्रकार पडतात.



प्राण्यांचे वर्गीकरण 

अधिवासा नुसार प्राण्यांचे जमिनीवर राहणारे भूचर. उदाहरण. हरिण ,वाघ ,ससा, मानव.


 पाण्यात राहणारे जलचर . उदाहरण मासे 


जमीन आणि पाणी या दोन्ही ठिकाणी राहू शकणारे उभयचर. उदाहरण बेडूक ,सॅलॅमॅनडर

 व आकाशात उडू शकणारे खेचर . उदाहरण आकाशात उडणारे पक्षी

असे वर्गीकरण होते.


पेशी रचनेनुसार एकपेशीय व बहुपेशीय सजीव असे वर्गीकरण होते .


पाठीच्या कण्यावरून पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय प्राणी असे वर्गीकरण होते .


प्रजननाच्या पद्धतीवरून अंडज आणि जरायुज असे दोन प्रकार पडतात.

अंडज म्हणजे अंडी घालून पिलांना जन्म देणारे उदाहरण .साप ,पक्षी ,मासे .

जरायुज म्हणजे पिलांना जन्म देणारे 

उदाहरण .सस्तन प्राणी


सजीव सृष्टी मधील वनस्पती आणि प्राणी यांच्या मध्ये खूप मोठी विविधता आढळून येते.

 प्रत्येक वनस्पती आणि प्राणी हे महत्त्वपूर्ण आहेत म्हणून सजीव सृष्टीतील विविधता जपण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

August 29, 2020

नैसर्गिक संकटे


आपत्ती म्हणजे अचानक आलेले एखादे संकट होय.

 आपत्ती आल्यानंतर राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित आर्थिक आणि सामाजिक हानी होत असते .

आपत्ती या नैसर्गिक आणि मानवनिर्मित असतात.


प्रमुख आपत्ती मध्ये अतिवृष्टी महापूर भूकंप ज्वालामुखी वीज कोसळणे जंगलातील वणवा वाढत्या लोकसंख्येमुळे झालेली गर्दी अविवेकी बांधकाम या सर्व गोष्टी येतात.


काही  भयंकर आपत्ती 

●महाराष्ट्र मध्ये लातूर जिल्ह्यात किल्लारी या गावी 30 सप्टेंबर 1993 रोजी तीव्र भूकंप झाला होता.

● 26 जुलै 2005 रोजी मुंबई व उपनगरे या ठिकाणी अतिवृष्टीमुळे हजारो लोकांचा बळी गेला होता.

● 30 जुलै 2014 रोजी पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुक्यात माळीन गावात दरड कोसळून संपूर्ण गाव उध्वस्त झाले होते.

● नोव्हेंबर 2015 मध्ये चेन्नई तामिळनाडू येथे अतिवृष्टीमुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला होता.


◆काही प्रमुख आपत्ती

● भूकंप

भुगर्भा मध्ये अचानक होणारी कंपनी म्हणजे भूकंप होय यामुळे जमीन थरथर हलते किंवा तिला भेगा पडतात भूकंप झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जेचे उत्सर्जन होत असते आणि या ऊर्जेपासून भूकंप लाटा तयार होतात व त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली हालचाली होतात. 


●भूकंपाचे परिणाम 

भूकंपामुळे बांधकाम पूल रस्ते लोहमार्ग इत्यादी उध्वस्त होतात.

 नद्यांचे प्रवाह बदलतात.

 जीवितहानी, वित्तहानी सुद्धा होते.


●महापूर 

अतिवृष्टीमुळे नदीच्या पात्रामध्ये जास्त पाणी जमा होऊन ते बाहेर पडते .

अतिवृष्टी मुळे गाव शहरातील निचरा व्यवस्था कमी पडते ,गटारे तुंबून पाणी रस्त्यावर पसरते आणि घराघरांमध्ये घुसते.




● महापुराचे परिणाम

 जमिनीची धूप होते .

महापुरामुळे पिकांचे खूप नुकसान होते.

 महापुरामुळे जीवितहानी आणि वित्तहानी होते. पुरानंतर रोगराई आणि आजार पसरतात व सार्वजनिक आरोग्य धोक्यात येते.


●वादळे 

हवेमध्ये कमी जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात व त्यामुळे जोराचा वारा वाहू लागतो.

 या बदललेल्या हवामानामुळे वादळे निर्माण होतात.


 ●वादळाचे परिणाम

 किनाऱ्या जवळील प्रदेशांमध्ये अतोनात नुकसान होते .

जीविताची आणि मालमत्तेची सुद्धा हानी होते. वीजपुरवठा बंद होतो आणि दळणवळण बंद पडते.


●वणवा व आग

 नैसर्गिक आणि नैसर्गिक कारणामुळे जंगल ,गवताळ प्रदेश, कुरणे याठिकाणी जी अनियंत्रित आग लागते तिला वणवा म्हणतात.


●वणव्याचे परिणाम

 वणव्यामुळे सर्व प्राणी आणि वनस्पती हे आगीच्या भक्ष्यस्थानी पडतात .

त्यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचे प्रचंड नुकसान होते. हवेचे प्रदूषण होते.


◆आपत्ती व्यवस्थापन

 आपत्ती आल्यानंतर तिला तोंड देण्यासाठी जी योजना तयार केली जाते तिला आपत्ती व्यवस्थापन असे म्हणतात.

 आपत्ती व्यवस्थापन लोकसहभागातून शक्य होते. ●भारतामध्ये 2005 झाली राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या संस्थेची स्थापना करण्यात आली .

या संस्थेकडून आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करण्यात येते.

● आपत्ती व्यवस्थापन संपर्काचे महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक 

पोलीस 100 

अग्निशामक दल 101 

रुग्णवाहिका 102 

आपत्ती नियंत्रण कक्ष 108 किंवा 112


◆आपत्ती येण्यापूर्वी काही दक्षता घेतल्या पाहिजे


 ●रेडिओ आणि टीव्हीवरील बातम्या काळजीपूर्वक ऐकाव्यात.

 ●रेडिओ आणि मोबाईल हे बॅटरीवर चालणारे वापरावेत.

● हवामान खात्याकडून दिलेल्या सूचना ऐकाव्यात. ●www.imd.gov.in ही वेबसाईट नेहमी वापरावी ●आगीपासून बचाव करण्यासाठी अग्निशामक नळकांडी वापरता येणे आवश्यक आहे.

● अतिवृष्टी, दरड कोसळणे यावेळी डोंगराच्या पायथ्याशी आसरा घेऊ नये .

●नदीला पूर असेल तर उंचावर थांबावे वाहत्या पाण्यातून वाहने चालवू नये .

●भूकंप झाला तर प्रवासाचा मार्ग व्यवस्थित आहे का याची खात्री करूनच बाहेर पडावे .


◆प्रथमोपचार 

कोणत्याही आजारावर उपचार मिळण्यापूर्वी तात्काळ आणि तात्पुरती उपाययोजना म्हणजे प्रथमोपचार .


●रक्तस्त्राव होत असलेल्या व्यक्तीला एका जागी बसवावे .

जखम झाली असल्यास जखम पाण्याने स्वच्छ धुवावी आणि हृदयाच्या पातळीपेक्षा जखमी अवयव वर ठेवावा .


●भाजले असल्यास भाजलेला भाग धुवावा व पाण्यात बुडवून ठेवावा.

 पाणी पिण्यास द्यावे, तेलकट मलम लावू नये. कोरड्या ड्रेसिंगने जखम झाकावी.


● उष्माघात झाल्यास रुग्णास सावलीत बसवावे. शरीर थंड पाण्याने पुसावे .

पिण्यास पाणी आणि सरबत द्यावे .

 लवकरात लवकर त्याला दवाखान्यात हलवावे.


●सर्पदंश 

नाग ,मण्यार ,फुरसे ,घोणस ,समुद्र साप याच सापांच्या जाती विषारी असतात.

 विषारी सर्पदंशाने मृत्यू ओढवू शकतो त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.

 साप मारण्यापेक्षा सर्व मित्रांच्या मदतीने सापाला लांब नैसर्गिक अधिवासात सोडावे .


●सर्पदंशावर प्रथमोपचार 

दंश झालेली जागा पाण्याने धुवावी .

सर्पदंश झालेल्या व्यक्तीला धीर द्यावा.

 सर्पदंश झालेल्या जखमेच्या वरच्या बाजूस कपड्याने घट्ट बांधावे.

तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.


●कुत्रा चावल्यामुळे रक्तामध्ये विषारी


द्रव्य जाण्याचा धोका असतो .

त्यामुळे जखम पोटॅशियम परमॅग्नेट या द्रावणाने धुवावी .

जखमेवर कोरडे कापड ठेवावे.

 आणि डॉक्टरांकडे नेऊन अँटी रेबीजचे इंजेक्शन द्यावे.

August 29, 2020

Diet and Vitamins

 


पोषण आणि आहार


● पोषण-

सजीवांना ऊर्जा मिळवणे ,वाढ होणे आणि आजारापासून प्रतिकार करणे या कामासाठी पोषणाची आवश्यकता असते. 

ही पोषकतत्वे अन्नामधून मिळतात.

 कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे ही निराळी पोषकतत्वे आहेत.



● कर्बोदके-

कर्बोदके -ही आपल्याला भात पोळी भाकरी आणि तृणधान्य यापासून मिळतात कर्बोदके ही ऊर्जादायी पदार्थ म्हणून कार्य करतात.


● स्निग्ध पदार्थ- तेल तूप आणि लोणी यामधून मिळतात हे सुद्धा ऊर्जा'दायी पदार्थ म्हणून कार्य करतात .


● प्रथिने - कडधान्य, मांस ,मासे, अंडी, दूध व दुग्धजन्य पदार्थ यापासून मिळतात. आपल्या शरीराची वाढ आणि शरीराची झीज भरून काढण्यासाठी हे कार्य करतात.

● खनिजे- फळे ,पालेभाज्या, दूध, मीठ यापासून मिळतात .शरीरातील वेगवेगळ्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी हे कार्य करतात.

● जीवनसत्वे- फळे आणि भाज्या यामधून मिळतात. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे कार्य करतात.


● किलो कॅलरी

 अन्न पदार्थांमधून किती उष्णता मिळते हे मोजण्यासाठी किलो कॅलरी हे एकक वापरतात. वाढत्या वयातील मुलामुलींना दररोज सरासरी 2000 ते 2500 किलो कॅलरी ऊर्जा आवश्यक असते .


● खनिजे- लोह, कॅल्शियम व फॉस्फरस, आयोडीन, सोडियम पोटॅशियम हे खनिजे आहेत. हे सुद्धा आपल्याला आवश्यक आहेत.

●लोह -

आपल्याला पालेभाज्या, मास, सफरचंद ,मनुका यापासून मिळतात. 

लोहा चे कार्य रक्तपेशी मार्फत ऑक्सिजनचे वहन करणे हे असते. जर आपल्या शरीरात लोह कमी पडले तर आपल्याला ॲनिमिया, पंडुरोग हा आजार होऊ शकतो.

● कॅल्शियम व फॉस्फरस- मांस, दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या यामधून आपल्याला कॅल्शियम व फॉस्फरस मिळते. हाडे व दात मजबूत करण्यासाठी यांचा उपयोग होतो. 

 यांचा अभाव जर शरीरात असेल तर दातांचे विकार हाडे कमकुवत होणे हे आजार होतात. 

● आयोडीन -आयोडीनयुक्त मीठ, मासे ,मनुका यापासून आयोडीन मिळते.

 वाढीचे नियंत्रण ठेवणे, शरीरातील रासायनिक क्रिया यांची गती वाढवणे हे आयोडीनचे कार्य आहे .

आयोडीनच्या अभावामुळे गलगंड हा आजार होऊ शकतो .

● सोडियम व पोटॅशियम -मीठ, मांस, पालेभाज्या डाळी ,फळे हे स्त्रोत आहेत.

 शरीरातील पाण्याचे संतुलन राखणे, चेतासंस्था आणि स्नायुच्या क्रिया चालू ठेवणे हे कार्य करतात. यांच्या अभावामुळे स्नायूंची कार्यक्षमता वाढीस लागते.


◆जीवनसत्वे जीवनसत्वांचे जलविद्राव्य व जलविद्राव्य असे दोन प्रकार पडतात.

● A जीवनसत्व -

पिवळ्या रंगाच्या व लाल रंगाच्या भाज्या फळे, दूध ,लोणी, हिरव्या भाज्या, रताळे यापासून हे जीवनसत्व मिळते.

डोळ्यांचे, त्वचेचे आणि दाताचे आरोग्य राखण्याचे कार्य हे करतात.

 जीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा, झिरो डर्मा हे आजार होतात.


● B1 जीवनसत्व-

 स्त्रोत- दूध ,मासे, मांस, तृणधान्य, डाळी, कवचाची फळे .

कार्य - चेतातंतू आणि हृदयाचे योग्य कार्य करण्यासाठी मदत करतात..

 अभावजन्य आजार -बेरी-बेरी ,स्नायूंचा अशक्तपणा हा आजार होऊ शकतो.

● B 9- 

 स्त्रोत- पालेभाज्या, पपई ,किवी यापासून मिळते. कार्य -शरीराची वाढ होणे 

 अभावजन्य आजार -वाढ खुंटून जाते.  ॲनिमिया ,विसराळूपणा हे आजार होऊ शकतात. ● B 12 - 

स्त्रोत -मांस, यकृत

 कार्य -लाल रक्तपेशींची निर्मिती करणे.

 अभावजन्य आजार -ॲनिमिया

● C जीवनसत्व -

लिंबूवर्गीय फळे ,आवळा, संत्र ,आंबट पदार्थ, पालेभाज्या 

कार्य - शरीरांतर्गत उती आरोग्य राखणे, हिरड्या दात  यांच्या योग्य कार्यासाठी आवश्यक.

 अभावजन्य आजार -स्कर्वी, ग्रंथीना सूज, न भरणाऱ्या जखमा होणे.

● D जीवनसत्व-

 स्त्रोत -सूर्यप्रकाश, दूध, मांस, अंडी, लोणी, मासे कार्य -कॅल्शिअम आणि फॉस्फरस यांच्या शोषणासाठी आवश्यक.

 अभावजन्य आजार -मुडदूस, हाडे अशक्त होणे, वेदना 

● E जीवनसत्व -

स्त्रोत -वनस्पती तेल ,शेंगदाणे, बदाम, हिरव्या भाज्या 

कार्य -पेशीमधील चयापचय क्रिया चे नियमन करणे .पुनरुत्पादन करणे 

अभाव जन्य आजार -त्वचेचे विकार ,स्नायू कमकुवत होणे, पुनरुत्पादन प्रक्रियेत अडथळा.

● K जीवनसत्व -

स्त्रोत -पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये, अंड्यातील पिवळा बलक 

कार्य -रक्त गोठण्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक असतो.

अभावजन्य आजार -अति रक्तस्त्राव होणे.


उष्णता व प्रकाश यामुळे जीवनसत्व नष्ट होतात ही .

C जीवनसत्व लवकर नष्ट होते,

 म्हणून C जीवनसत्व युक्त पदार्थ न शिजवता कच्चे खावेत.


● संतुलित आहार

 सर्व पोषक तत्व पुरेशा प्रमाणात असलेल्या आहाराला संतुलित आहार म्हणतात. 

> संतुलित आहारामुळे पोषण चांगल्याप्रकारे होते. > शरीर निरोगी आणि धडधाकट राहते .

> मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य चांगले राहते. > काम करण्याची क्षमता मिळते .

> रोगप्रतिकार शक्ती वाढते .


● तंतुमय पदार्थ 

आपल्या रोजच्या आहारात पुरेशा तंतूमय पदार्थांचा समावेश असला पाहिजे.


● पाणी 

 एक पोषक तत्व आहे,, दूध, ताक, सरबत, फळांचे रस ,भरपूर पाणी शरीरात दररोज


गेले पाहिजे .


● कुपोषण -

आहारामध्ये सर्व पोषकतत्वे न मिळाल्यामुळे, असंतुलित आहारामुळे कुपोषण होते .

तसेच गरजेपेक्षा जास्त अन्न घेतल्यामुळे अतिपोषण होते .

अतिपोषण हा सुद्धा असंतुलित आहाराचा परिणाम आहे.

● जंक फूड -

चटपटीत ,चविष्ट लागणारे परंतु पोषकतत्व नसलेले पदार्थ शरीराला काहीही उपयोगी नसतात अशा पदार्थांना जंकफूड म्हणतात.

 चॉकलेट ,बर्गर ,नूडल्स, चिप्स ,वेफर्स, शीतपेय, कुरकुरे हे जंकफूड जास्त खाऊ नये .


लठ्ठपणा टाळण्यासाठी 

> संतुलित आहार घ्यावा. पुरेशा प्रमाणात व्यायाम करावा .

> भूक नसताना खाऊ नये.

> जंक फूड टाळावे.

> मोटार गाड्या चा कमी वापर करावा.

● अन्नपदार्थातील भेसळ- चांगल्या अन्नपदार्थात त्याच्यासारखेच स्वस्त आणि अतिरिक्त पदार्थ मिसळणे याला अन्नातील भेसळ म्हणतात. 

अन्नातील भेसळ ही आरोग्यास घातक असते, त्यामुळे भेसळ करणे हा कायद्याने गुन्हा आहे.


August 29, 2020

Wind System

 ◆ वारा 

हवेच्या वाहत्या प्रवाहाला वारा म्हणतात. वाऱ्याचा स्पर्श आपल्याला जाणवतो, परंतु आपण वारा पाहू शकत नाही .


◆ वाऱ्याची निर्मिती

 पृथ्वीवर हवेचा दाब एक सारखा नसतो.

 तो भौगोलिक परिस्थितीनुसार बदलत असतो. जास्त दाबाच्या पट्टयाकडून हवा कमी दाबाच्या पट्ट्याकडे हालचाल करते.



 ही हालचाल क्षितिजसमांतर दिशेमध्ये असते. हवेच्या या हालचालीमुळे वाऱ्याची निर्मिती होते.

◆ वाऱ्याची गती- 

हवेच्या दाबाच्या खडकांमधील तीव्रतेचा परिणाम वाऱ्याच्या गतीवर होत असतो.

हवेच्या दाबातील फरक जेथे कमी असतो तेथे वारे मंद गतीने वाहतात. सर्वसाधारणपणे जागतिक पातळीवर हवेच्या दाबातील फरक जेथे अधिक

असेल तेथे वारे हे वेगाने वाहतात.


◆ पृथ्वीचे परिवलन आणि वाऱ्याच्या वाहण्याची दिशा 

पृथ्वीचा परिवलनाचा परिणाम वाऱ्याच्या वाहण्याच्या दिशेवर होत असतो.

उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेपासून उजवीकडे वळतात, तर गोलार्धात वारे मूळ दिशेच्या डावीकडे वळतात.

पश्चिमेकडून पूर्वेकडे होणाऱ्या पृथ्वीच्या परिवलनामुळे वाऱ्याच्या मूळ दिशेमध्ये बदल होत असतो.


वाऱ्यांचे प्रकार 

वाऱ्यांची वाहण्याची दिशा, कालावधी आणि व्यापलेला प्रदेश तसेच हवेची स्थिती यावरून वाऱ्याचे तीन प्रकार पडतात.

ग्रहीय वारे, स्थानिक वारे ,हंगामी किंवा मोसमी वारे.

बहुतांश वारे हे ते ज्या दिशेने वाहत येतात त्या दिशेच्या किंवा प्रदेशाच्या नावाने ओळखले जातात.

● ग्रहीय वारे 

पृथ्वीवर जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वर्षभर नियमितपणे वाहणाऱ्या वाऱ्यांना ग्रहीय वारे असे म्हणतात.

हे वारे पृथ्वीचे विस्तीर्ण क्षेत्र व्यापतात.

उदाहरण .पूर्वीय वारे, पश्चिमी वारे, ध्रुवीय वारे दोन्ही गोलार्धामध्ये 25 ते 35 अंश अक्षवृत्तच्या दरम्यान असलेल्या मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टयाकडून  विषयवृत्तीय  कमी दाबाच्या पट्टयाकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना पूर्वीय वारे म्हणतात.

दोन्ही गोलार्धात मध्ये अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडुन 55 ते 65 अंश अक्षवृत्तच्या दरम्यान असलेल्या  उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना पश्चिमी वारे म्हणतात.

तर उत्तर आणि दक्षिण गोलार्धात ध्रुवीय जास्त दाबाच्या पट्टयाकडून 55 अंश ते 65 अंश अक्षवृत्त च्या दरम्यान असलेल्या उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना ध्रुवीय वारे म्हणतात.


● स्थानिक वारे 

काही वारे कमी कालावधीत आणि विशिष्ट प्रदेशांमध्ये निर्माण होतात.

यांचे क्षेत्र मर्यादित असते म्हणून या वाऱ्यांना स्थानिक वारे म्हणतात. स्थानिक वारे ज्या प्रदेशात वाहतात तेथील हवामानावर त्यांचा परिणाम दिसून येतो .हे वारे निरनिराळ्या प्रदेशात निरनिराळ्या नावांनी ओळखले जातात. सूर्योदयानंतर दिवसा दरीतून पर्वताकडे थंड वारे वाहतात या वाऱ्यांना दरीय वारे म्हणतात. सूर्यास्तानंतर रात्री पर्वता कडून दरीकडे थंड वारे वाहतात या वाऱ्यांना पर्वतीय वारे म्हणतात. दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहतात त्या वाऱ्यांना सागरी वारी किंवा खारे वारे म्हणतात. रात्री जमिनीकडून समुद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना भुमिय किंवा मतलई वारे म्हणतात. 

वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या परिस्थितीत हे वारे वाहतात हे वारे स्थानिक वारे म्हणून ओळखले जातात.

उदाहरण सिमुम, चिनूक, बोरा, पांपोरा फॉन


●  हंगामी किंवा मोसमी वारे 



जमीन आणि पाणी यांच्या ऋतूनुसार कमी-अधिक तापल्यामुळे मोसमी वारे निर्माण होतात .

आग्नेय आशिया, उत्तर आस्ट्रेलिया, पूर्वआफ्रिका या प्रदेशावर मोसमी वाऱ्यांचा विशेष परिणाम दिसून येतो.

भारतीय उपखंडामध्ये उन्हाळा व हिवाळा या ऋतु वर मोसमी वाऱ्यांचा प्रभाव असतो.

मोसमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे भारतीय उपखंडात उन्हाळा व हिवाळा यांच्याव्यतिरिक्त पावसाळा व मान्सून परतीचा काळ असे ऋतू सुद्धा होतात. मोसमी वारे हे मोठ्या प्रमाणावरील खारे व मतलई वारे असतात. भारतीय उपखंडावर होणारी बहुतांश पर्जन्यवृष्टी ही मोसमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे होते .हे वारे विषुववृत्त ओलांडल्यानंतर नैऋत्य दिशेकडून भारतीय उपखंडातकडे जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये वाहतात यांना नैऋत्य मोसमी वारे म्हणतात.

या वाऱ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात बाष्पअसते सप्टेंबर ते डिसेंबर पर्यंत विषयवृत्तीय लगत हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे भारतीय उपखंड कडून विषयवृत्त कडे वारे वाहू लागतात या वाऱ्यांना ईशान्य मोसमी वारे म्हणतात .हे वारे कोरडे असतात.


● आवर्त 

एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो व सभोवताली हवेचा दाब जास्त असतो अशावेळी आवर्त वार्‍याची परिस्थिती निर्माण होत असते. हवेची स्थिती दर्शवणाऱ्या नकाशा मध्ये आवरता चा केंद्रभाग हा 'L' या अक्षराने दाखवतात.

आवर्त प्रणाली एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सरकते. आवर्तना आपण वादळ किंवा चक्रीवादळ असे सुद्धा म्हणतो.

कॅरेबियन समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे हरिकेन्स या नावाने ओळखले जातात. समशीतोष्ण कटिबंधात


सुद्धा आवर्त तयार होतात  त्यांची तीव्रता कमी असते.

ती विनाशकारी नसतात.


● प्रत्यावर्त 

एखाद्या क्षेत्रामध्ये विशिष्ट वातावरणीय परिस्थितीमध्ये केंद्रभागी हवेचा अधिक दाब निर्माण होतो.

केंद्र भागाकडून वारे सभोवतालच्या प्रदेशाक हवेची स्थिती दर्शवणाऱ्या नकाशामध्ये प्रत्यावर्तचा केंद्र भाग 'H'  या अक्षराने दाखवतात. हे चक्राकार दिशेने वाहत असतात.

August 29, 2020

Speed and Force

 ◆गती

वस्तूचे ठरावीक वेळेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होणारे विस्थापन म्हणजेच त्या वस्तूची

गती होय. गतीमध्ये बदल हा बलामुळे होतो.


◆. अंतर (DIstance) व विस्थापन (Displacement) :

● अंतर : 

गतीच्या दिशेचा विचार न करता, एखाद्या गतिमान वस्तूने प्रत्यक्ष पूर्ण केलेल्या मार्गाची लांबी

म्हणजे अंतर होय. 

अंतर ही अदिश राशी आहे.

(2) विस्थापन: 

एखादया गतिमान वस्तूने आरंभीच्या ठिकाणापासून अंतिम ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी एकाच

दिशेने म्हणजेच सरळ रेषेत पार केलेले कमीत कमी अंतर म्हणजे विस्थापन होय.



विस्थापन ही सदिश राशी आहे. 

विस्थापनामध्ये अंतर व दिशा या दोन्ही गोष्टींचा विचार होतो.

(3) अंतर व विस्थापन या दोन्ही राशींचे SI व MKS मापन पद्धतींत एकक मीटर (m) आहे.

(4) वेग : 

वेग म्हणजे विशिष्ट दिशेने एकक कालावधीत वस्तूने कापलेले अंतर होय.

(5) वस्तूच्या वेगाचे सूत्र :

वेग = विस्थापन/ विस्थापनाला लागलेला वेळ



◆. चाल व वेग (Speed and Velocity) : 

चाल सांगत असताना गतीची दिशा सांगण्याची आवश्यकता नसते.

गाडीची चाल 50 किमी प्रतितास असे सांगितले जात असताना गाडीच्या गतीची दिशा स्पष्ट करण्याची गरज

नाही. परंतु वादळ एखादया विशिष्ट ठिकाणी येणार की नाही याची कल्पना येण्यासाठी वादळाच्या दिशेचा

 उल्लेख करणे जरुरीचे ठरते. 

चाल व वेग दोन्हीचे SI एकक मीटर/सेकंद (m/s) आहे.

● एखाद्या वस्तूने एकक कालावधीत कापलेल्या अंतरास चाल म्हणतात.


 चाल = कापलेले अंतर/ वेळ


◆ सरासरी वेग व तात्कालिक वेग : एखादी वस्तू सरळ रेषेत जात असतांना तिचा वेग बदलत जाऊ शकतो.


(1) सरासरी वेग :

वस्तूचे विस्थापन/त्या विस्थापनाला लागलेला कालावधी


(2) तात्कालिक वेग : एका विशिष्ट क्षणी असलेल्या वेगाला तात्कालिक वेग म्हणतात. तात्कालिक वेग

वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा असू शकतो.



◆.  त्वरण (Acceleration) :


(1) वेगामधील वेळेच्या संदर्भात होत असलेल्या बदलाला त्वरण म्हणतात.

 ही सदिश राशी आहे. वेग वाढत असल्यास

त्वरण धन असते. वेग कमी होत असल्यास त्वरण ऋण असते. वेग बदलत नसल्यास त्वरण शून्य असते.

 

त्वरणाचे सूत्र :

वेगातील बदल/बदलास लागलेला कालावधी


त्वरणाचे SI एकक

मीटर/सेकंद×सेकंद  (m/s').


◆. बल (Force) :


(1) त्वरण घडवणाच्या आंतरक्रियेला बल असे म्हणतात. म्हणजेच बलामुळे वस्तूच्या वेगात बदल होतो. बल हे

वस्तूवर कार्य करते. 

बल = वस्तुमान x त्वरण. 

बल ही सदिश राशी आहे.

2) सर आयझक न्यूटन या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम बल आणि त्यामुळे घडणाऱ्या त्वरणा संबंधीचा अभ्यास केता


◆. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम :



(1) एखद्या वस्तूवर बल कार्य करीत नसेल, तर त्या वस्तूचा वेग बदलत नाही. म्हणजेच बल लावले नसताना

वस्तू जर स्थिर असेल तर ती स्थिर राहते व तिला गती असेल, तर ती एकाच वेगाने म्हणजेच एकाच

चालीने एकाच दिशेने सतत पुढे जात राहते.

(2) जर वस्तूवर कार्य करणारे एकूण बल 0 असेल तर वस्तूचे त्वरणसुद्धा  0 असते.

(3) न्यूटन : एक किलोग्रॅमचे प्रमाण घर्षण नसलेल्या पृष्ठभागावर ठेवले आणि 1 m/s' इतक्या त्वरणाने ओढले तर त्यासाठी लावलेल्या बलाला 1 न्यूटन किंवा 1 N म्हणतात.



1 N=105 dymes (पूरक माहिती)


◆. बल, विस्थापन व कार्य 

(Force, Displacement and Work) :


बल, विस्थापन व कार्य यांचा एकमेकांशी संबंध पुढील सूत्रात दाखवला आहे :


बलाने केलेले कार्य (W)= वस्तूवर लावलेले बल x बलाच्या दिशेत झालेले वस्तूचे विस्थापन


W = FXs


बल, विस्थापन या सदिश राशी आहेत.

पण कार्य ही अदिश राशी आहे.



* SI पद्धतीत कार्याचे एकक- ज्यूल

* बलाचे एकक- न्यूटन (N)

आणि विस्थापनाचे एकक--मीटर (m)


* CGS पद्धतीत कार्याचे एकक- अर्ग (erg)


टेबलावरील लाकडी ठोकळ्याला टेबलाच्या पृष्ठभागाशी

समांतर असे 1 N इतके बल लावले आणि एक मीटर

इतके ठोकळ्याचे विस्थापन केले, तर बलाने 1 ज्यूल

इतके कार्य केले असे समजतात.

August 29, 2020

Machines


 यंत्रे दैनंदिन जीवनामध्ये कमी श्रमात आणि कमी वेळेमध्ये जास्त काम करण्यासाठी जी साधने वापरली जातात त्यांना यंत्र म्हणतात.

 यंत्र दोन प्रकारची असतात-  साधी यंत्र, गुंतागुंतीची यंत्रे.


◆ साधी यंत्र-

 ज्या यंत्रामध्ये एक किंवा दोन भाग आहेत आणि ज्यांची रचना साधी सोपी असते अशा यंत्रांना साधी यंत्र असे म्हणतात.


◆ गुंतागुंतीची यंत्रे

 ज्या यंत्रांमध्ये अनेक भाग एकमेकांना जोडलेले असतात आणि यामध्ये अनेक प्रक्रिया एकाच वेळी होत असतात अशा क्लिष्ट रचनेच्या यंत्रांना गुंतागुंतीची यंत्र म्हणतात.



आपल्या रोजच्या जीवनात आपण अनेक साधी यंत्र आणि गुंतागुंतीची यंत्र कामाच्या स्वरूपानुसार वेळ आणि श्रम यांचा विचार करून वापरत असतो.

साधी यंत्रे उदाहरण 

उतरण

> वजन उचलण्यासाठी तिरपी ठेवलेली फळी म्हणजे उतरण असते.

> उतरंडीमुळे कमी वजन पेलावी लागते आणि वजन चढणे सोपे जाते.

> उतरणीचा चढाव जेवढा कमी आणि लांब जितकी जास्त तितके वजन कमी जाणावे.

> उतरणीचा चढाव जितका जास्त आणि लांबी जितकी कमी तितके वजन जास्त पेलावे लागते.

> स्क्रू हादेखील उतरणीचा एक प्रकार आहे.

> डोंगरावर जात असताना नागमोडी घाटातील रस्ता हासुद्धा उतरणीचा एक प्रकार आहे.

● ग्रीक वैज्ञानिक आर्किमिडीज यांनी आर्किमिडीज स्क्रू या साध्या यंत्राचा शोध लावला.


● पाचर 

दोन उतरणी जोडून केलेल्या धारदार अवजाराला पाचर म्हणतात.

उदाहरण .कुऱ्हाड, पटाशी, सुरी, खिळा ही सर्व पाचर प्रकारची यंत्रे आहेत.

तरफ-

तरफेचे बल, भार आणि टेकू असे तीन भाग असणाऱ्या लांब पहारी सारख्या अवजाराला तरफ असे म्हणतात. 

तरफेचा दांडा ज्या आधारावर टेकलेला असतो त्याला टेकू असे म्हणतात.

ज्या बला विरुद्ध तरफ कार्य करते त्याला भार असे म्हणतात.

आणि टेकू पासून भारा पर्यंतच्या तरफेच्या बाजूला भार बाजू म्हणतात.

 तरफेच्या दुसऱ्या बाजूने भार उचलण्यासाठी बल लावावे लागते या बाजूला बल बाजू म्हणतात.

◆ तरफेचे प्रकार -

तरफेचे तीन प्रकार पडतात.

हे तिन्ही प्रकार भार ,बल व टेकू यावरून पडतात.


● तरफेचा पहिला प्रकार

ज्या प्रकारांमध्ये मध्ये टेकू व एका बाजूला भार व दुसऱ्या बाजूला बल अशी रचना असते तो पहिला तरफेचा पहिला प्रकार असतो.

उदाहरण - सी सॉ 

● तरफेचा दुसरा प्रकार

या प्रकारामध्ये टेकू एका बाजूला भार मध्यभागी आणि बल दुसऱ्या बाजूला असते तो तरफेचा दुसरा प्रकार असतो.

उदाहरण -बाटलीचे ओपनर


● तरफेचा तिसरा प्रकार- 

मध्यभागी बल ,एका टोकाला टेकू आणि दुसऱ्या टोकाला भार अशी तिसऱ्या प्रकारची तरफ असते.

उदाहरण- चिंता


◆ कप्पी- 

वजन उचलण्यासाठी खाचा असलेले चाक आणि त्यातून टाकलेली दोरी अशी रचना असलेल्या साध्या यंत्राला कप्पी म्हणतात.

कप्पीचा वापर करताना वरच्या दिशेने वजन उचलताना बल खालच्या दिशेने लावावे लागते. यामुळे कप्पी कमी श्रमामध्ये आपले काम करते.


चाक व आस-

दांड्यावर बसवलेले चाक हे सुद्धा साधे यंत्र असते. दांडा हा आस असतो आणि फिरणारे चाक हे त्या आसाभोवती फिरत असते.


◆ यंत्रांची निगा

 यंत्रे योग्य रीतीने वापरता यावी ती खूप काळासाठी टिकावी म्हणून यंत्रांची निगा घेणे आवश्यक असते.


● यंत्रे खराब होण्याची कारणे-

> यंत्रांचा सततचा वापर

> यंत्रावर होणारा हवामानाचा परिणाम

> यंत्रावर धूळ बसणे 

> यंत्राचे काही भाग घासले जाऊन त्याची झीज        होणे.


● यंत्राची निगा

> यंत्रांचे सर्व भाग पुसून ठेवणे.

> यंत्राच्या घासल्या जाणाऱ्या भागावर नियमितपणे तेल किंवा वंगण लावले तर यंत्राची निगा राखता येईल.

> यंत्राच्या भागांचे घर्षण कमी करून त्यांची झीज थांबवल्यामुळे यंत्र खूप काळपर्यंत चांगल्या स्थितीत राहतील.

> यंत्र जेव्हा उपयोगात नसतील तेव्हा झाकून ठेवले पाहिजेत. त्यामुळे त्यावर धूळ बसणार नाही.

> यंत्राच्या धातूच्या भागावर रंग देणे म्हणजेच हवामानाचा त्यावर परिणाम होणार नाही,गंज चढणार नाही.


● यंत्राची योग्य निगा न राखल्यामुळे

जेव्हा आपल्याला यंत्रांची गरज असते तेव्हा ती वापरता येत नाही.

त्यामुळे यंत्राची निगा आपण नियमित राखली पाहिजे.

यंत्र हाताळतांना अपघात होणार नाही याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे.

August 29, 2020

Heat energy

उष्णता

खालील ठळक मुद्दे काळजीपूर्वक वाचा 

1. उष्णता हे ऊर्जेचे एक रूप आहे. 

उष्णतेचे संक्रमण म्हणजे उष्णतेचे एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे जाणे,

म्हणजेच उष्णतेचे स्थानांतर अथवा स्थलांतर होय.


2. उष्णतेचे संक्रमण हे  वहन, अभिसरण आणि प्रारण या तीन प्रकारे होते.

◆ वहन

पदार्थाच्या उष्ण भागाकडून थंड भागाकडे होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास उष्णतेचे वहन म्हणतात. उष्णता वहनास पदार्थरूपी माध्यमाची आवश्यकता असते. म्हणजेच निर्वात पोकळीमधून उष्णतेचे वहन होत नाही.

मुख्यत: स्थायू पदार्थांमध्ये उष्णतेचे वहन होते.



◆ अभिसरण.

कोणत्याही  द्रव पदार्थास भांड्याच्या तळाकडून उष्णता दिली असता आधी तळालगतचा द्रव पदार्थ गरम होतो व त्याची घनता कमी  होऊन तो वरच्या भागाकडे जातो. 

या द्रव पदार्थाची जागा वरुन येणारा थंड द्रव घेतो. घनतेच्या फरकामुळे असे प्रवाह निर्माण होतात व  त्यादवारे द्रव पदार्थात उष्णतेचे संक्रमण होते. 

यास उष्णतेचे अभिसरण म्हणतात.

वायूंमध्येही अशा प्रकारे उष्णतेचे संक्रमण होते.

अभिसरणासही पदार्थरूपी माध्यमाची आवश्यकता असते.

◆. प्रारण 

कोणतेही माध्यम नसतानाही विद्युतचुंबकीय तरंगांच्या स्वरूपात होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास प्रारण म्हणतात.

माध्यम असतानाही अशा प्रकारे उष्णतेचे संक्रमण होऊ शकते. ही प्रारणे एखादया वस्तूवर पडली असता त्यांचा काही भाग परावर्तित होतो, काही भाग शोषला जातो व उरलेला भाग पारेषित केला जातो.

◆. उष्णतेचे सुवाहक

ज्या पदार्थांमधून उष्णतेचे वहन सहजपणे होते, त्या पदार्थला उष्णतेचे सुवाहक म्हणतात.

उदा., तांबे, लोखंड.

◆उष्णतेचे दुर्वाहक

 ज्या पदार्थांतून उष्णतेचे वहन सहजपणे होत नाही, त्यांना उष्णतेचे दुर्वाहक म्हणतात.

उदा., लाकूड, प्लॅस्टिक


◆. उष्णतेमुळे धातू प्रसरण पावतात व उष्णता काढून घेतल्यास ते धातू आकुंचन पावतात.


◆. सामान्यत: उष्णतेमुळे द्रव पदार्थ प्रसरण पावतात व उष्णता काढून घेतल्यास ते आकुंचन पावतात.


◆. उष्णतेमुळे वायूंचे आकारमान वाढते व उष्णता काढून घेतल्यास त्यांचे आकारमान कमी होते.

◆. थर्मास प्लास्कमध्ये उष्ण पदार्थ बराच काळ उष्ण राहतो, तसेच थंड पदार्थ बराच काळ थंड राहतो.


★ थर्मासची रचना व कार्य 


थर्मासची रचना - हा दुहेरी भिंत असलेला फ्लास्क असतो. यात एकात एक बसवलेल्या काचेच्या सीलबंद केलेल्या नळ्या असतात. दोन्ही नळ्यांचे पृष्ठभाग चांदीचा मुलामा देऊन चकचकीत केलेले

असतात. दोन्ही नळ्यांदरम्यानची शक्य तेवढी सगळी हवा काढून घेऊन जवळजवळ निर्वात पोकळी तयार केलेली असते. नळ्यांच्या बाहेर धातू किंवा प्लॅस्टिकची संरक्षक बरणी असते. ही बरणी व

आतील फ्लास्क यांच्यामध्ये स्पंज किंवा रबरासारख्या दुर्वाहकाचे तुकडे फ्लास्कच्या संरक्षणासाठी लावलेले असतात.

थर्मास फ्लास्कचे कसे कार्य करते  :

 जेव्हा एखादा उष्ण पदार्थ फ्लास्कमध्ये ठेवला जातो तेव्हा आतील नळीच्या चकचकीतपणामुळे बाहेर

जाणारी उष्णता प्रारणे पुन्हा आत परावर्तित होतात. जवळजवळ निर्वात पोकळीमुळे उष्णतेचे वहन जवळजवळ होऊ शकत नाही व अभिसरणही जवळजवळ होऊ शकत नाही. त्यामुळे उष्णता बाहेरील थंड भागाकडे  संक्रमित होत नाही आणि आतल्या आत दीर्घकाळासाठी राहते.

काचे तुन होणाच्या अल्प  वहनामुळे उष्णता बाहेर येत असते. त्यामुळे फ्लास्कच्या दर्जानुसार काही तासांनंतर आतील उष्ण पदार्थ तेवढा उष्ण राहत नाही.

जेव्हा एखादा थंड पदार्थ फ्लास्कमध्ये ठेवला जातो तेव्हा त्यास बाहेरुन जवळजवळ काहीही उष्णता मिळत नाही त्यामुळे फ्लास्कच्या दर्जानुसार काही तास तो पदार्थ थंड राहतो.



◆ राजस्थानमध्ये घरांचा  पांढरा रंग

राजस्थानमध्ये वातावरणाचे तापमान खुप जास्त असते, पांढऱ्या रंगामुळे आपाती उप्णता प्रारणाचे

मोठया प्रमाणावर परावर्तन होऊन उष्णतेचे शोषण कमी प्रमाणात होते. म्हणून राजस्थानम्ये घरांना पांढरा रंग देतात.


●खारे वारे व मतलई वारे उष्णता संक्रमण प्रकार

दिवसा सूर्याकडून मिळणाऱ्या उष्णता प्रारणामुळे जमीन लवकर तापते व जमिनीलगतच्या हवेची

चनता कमी झाल्याने ती वर जाते. या वेळी समद्रावरील त्यामानाने कमी तापमानाची व जास्त धनतेची हवा जमिनीच्या दिशेने वाहते. उष्णतेच्या अभिसारणाने खारे वारे वाहतात.

रात्री जमीन लवकर थंड होते. त्यामुळे जमिनीलगतच्या हवेची घनता अधिक होते. त्यामानाने समुद्रावरील हवेचे तापमान अधिक असते व घनता कमी असते. अशा वेळी जमिनीवरची हवा समुद्राच्या दिशेने वाहते.

उष्णतेच्या अभिसरणाने मतलई वारे वाहतात.

◆ अंटाक्क्टिका खंडातील पेंग्विन पक्षी

अंटाक्क्टिका खंडात वातावरणाचे तापमान कमी असते. काळया रंगाच्या पदार्थावर / वस्तूवर पडणाऱ्या

उष्णता प्रारणाचे मोठ्या प्रमाणावर शोषण होते. पेंम्विन पक्ष्यांचा रंग वरून काळा असल्याने उप्णतेचे मोठ्या प्रमाणावर शोषण होऊन त्यांना त्यांच्या शरीराचे तापमान कायम राखण्यास त्याची मोठी मदत होते.


◆ खोलीमध्ये हीटर  व वातानुकृ


लन यंत्रे यांचे स्थान 

उष्णतेच्या अभिसरणात जमिनीलगतची/तळालगतची हवा गरम झाल्याने तिची घनता कमी होऊन ती वर जाते व वरची कमी तापमानाची व जास्त घनतेची हवा खाली येते, त्यामुळे अभिसरण प्रवाह तयार होतात. म्हणून खोलीमध्ये हीटर खाली व वातानुकूलन  यंत्रे भिंतीवर उंचावर बसवलेली असतात.

◆ उष्णता शोषक

धातूच्या (स्टीलचा चमचा, तवा) जास्त प्रमाणात उष्णता शोषून घेतात.

लाकडी पोळपाट, लाकडी चमचा व प्लॅस्टिकची प्लेट फार कमी प्रमाणात उष्णता शोषून घेतात. मेण कदाचित वितळेल.

August 29, 2020

पदार्थाच्या अवस्था

 चला पदार्थ समजून घेऊया

पदार्थाच्या तीन अवस्था असतात .

स्थायू, द्रव आणि वायू .

पाणीसुद्धा तीन अवस्थांमध्ये आढळते.

 वाफ ही पाण्याची वायू अवस्था आहे.

 पाणी ही पाण्याची द्रव अवस्था आहे.

बर्फ ही पाण्याची स्थायु अवस्था आहे.



स्थायू पदार्थ -

स्थायू पदार्थाला स्वतःचा आकार असतो. त्याला ठराविक आकारमान असते. सपाट पृष्ठभागावर ओतल्यास त्याचा ढीग तयार होतो.

 उदाहरण .धातूचे तुकडे, साखर, मीठ.


द्रवपदार्थ-

 द्रवपदार्थ ना स्वतःचा आकार नसतो. ज्यामध्ये ते टाकले जाते तसा आकार त्याला मिळतो. द्रवपदार्थ याला ठराविक आकारमान नसते. ठराविक जागा व्यापतात. सपाट पृष्ठभागावर ओतल्यास सगळीकडे पसरतात व उताराच्या दिशेने वाहतात .

उदाहरण- पाणी ,तेल, दूध.


वायु पदार्थ -

वायु पदार्थाला स्वतः आकार नसतो. उपलब्ध सर्व जागा ते व्यापतात. ठराविक आकारमान सुद्धा नसते. बंद जागेमध्ये दाबाखाली ठेवल्यास त्यांचे आकारमान कमी होते .

उदाहरण -हवा ,वाफ


अवस्थांमधील बदल

 उष्णता दिल्यास ,

स्थायूचा- द्रव,

 द्रवाचा- वायू अवस्थेमध्ये बदल होतो.

 त्याचबरोबर उष्णता काढून घेतल्यानंतर,

 वायूचा- द्रव

 द्रवाचा- स्थायू मध्ये बदल होतो.


तापमापी 

पदार्थाचे तापमान मोजण्यासाठी तापमापी चा वापर केला जातो .

अंश सेल्सिअस हे तापमान मोजण्याचे एकक आहे. हल्ली डिजिटल तापमापी सुद्धा वापरतात .


उत्कलन

उत्कलन म्हणजे उकळणे. द्रवपदार्थ ला उष्णता दिल्यावर दिल्यानंतर त्यांचे बाष्पीभवन होते आणि तापमान वाढत जाते तसे बाष्पीभवनाचा वेग वाढतो आणि ते उकळायला लागते .पाणी उकळत ठेवल्यास 100 डिग्री सेल्सियस तापमानाला वाफेचे बुडबुडे पृष्ठभागावर येतात यालाच पाण्याचे उत्कलन म्हणतात.

 शुद्ध पाण्याचा उत्कलनांक 100 डिग्री सेल्सिअस असतो.



संघनन

 पाण्याची वाफ थंड झाली की त्या वाफेचे पुन्हा पाणी होते याला संघनन म्हणतात .शुद्ध पाण्याचा संघनन बिंदू 100 डिग्री सेल्सिअस असतो .पाण्याचा उत्कलनांक आणि संगणन बिंदू एकच असतो.


गोठण -

द्रवपदार्थाचे स्थायू पदार्थात रूपांतर होणे म्हणजे गोठण होय. ज्या तापमानाला पदार्थाची गोठण होते त्याला त्या पदार्थाचा गोठणबिंदू म्हणतात. पाण्याचा गोठणबिंदू शून्य डिग्री सेल्सिअस आहे. फ्रिजर चे तापमान  - 18 डिग्री सेल्सिअस असते.


विलयन -

स्थायू पदार्थाला उष्णता मिळाल्यानंतर त्याचे पुन्हा द्रवात रूपांतर होते याला विलयन म्हणतात. पाण्याचा गोठणबिंदू आणि विलयबिंदू एकच आहे तो 0 डिग्री सेल्सिअस आहे.


संप्लवन- स्थायू रुपाला उष्णता दिली असता त्याचे द्रव रूपात रूपांतर न होता थेट वायुरूपात अवस्थांतर होते याला संप्लवन असे म्हणतात. उदाहरण. आयोडीन ,कापूर या पदार्थांचे संप्लवन  होते.



◆पदार्थाचे गुणधर्म -

प्रत्येक पदार्थाचे विशिष्ट गुणधर्म असतात.


●ठिसूळपणा - पदार्थाचे लहान कणामध्ये रूपांतर होण्याची क्षमता म्हणजे ठिसूळपणा होय. ●कठीणपणा- दुसऱ्या पदार्थास विरोध करण्याची क्षमता म्हणजे पदार्थाचा कठीणपणा होय. ●स्थितिस्थापकता- ताण किंवा दाब काढल्यास मूळ स्थितीत येण्याची क्षमता म्हणजे पदार्थाची स्थितिस्थापकता होय .

●प्रवाहीता -पदार्थाची सहजपणे वाहण्याची क्षमता म्हणजे प्रवाहिता होय .

●घनता -पदार्थाच्या वस्तुमान यामुळे त्याची घनता ठरते .

●विद्राव्यता - स्थायुच्या विरघळन्याच्या क्षमतेला विद्राव्यता म्हणतात. जे पदार्थ विरघळू शकतात त्यांना विद्राव्य तर जे विरघळू शकत नाही त्यांना अविद्राव्य पदार्थ म्हणतात.

● पारदर्शकता -ज्या पदार्थांमधून आरपार पाहिले जाऊ शकते अशा पदार्थांना पारदर्शक व अशा क्षमतेला पारदर्शकता म्हणतात.

 उदाहरण काच, प्लास्टिक.



◆धातूचे गुणधर्म


● वर्धनीयता -धातूला ठोकून त्याचा हप्ता तयार करता येतो या गुणधर्माला वर्धनीयता असे म्हणतात. ●तन्यता- धातु खेचून त्याची तार करता येते या गुणधर्माला तन्यता असे म्हणतात .

●विद्युत वाहकता- धातूचा विजेचा प्रवाह वाहून नेण्याचा जो गुणधर्म असतो त्याला विद्युत वाहकता असे म्हणतात.

●उष्णता वाहकता -उष्णतेचे वहन करू शकतो म्हणजेच त्यामध्ये उष्णता वाहकता असते. ●नादमयता- एखाद्या धातूवर आघात केल्यास त्यातून नाद येतो या गुणधर्माला नादमयता असे म्हणतात. 

●रंग व चकाकी- प्रत्येकदा धातुला त्याचा विशिष्ट रंग आणि चकाकी असते.



●सर्वात कठीण पदार्थ 

नैसर्गिकरीत्या उपलब्ध असणारा हिरा ,मानव निर्मित व्युरटझाईट ,बोरॉन नायट्राइट आणि धूमकेतू पासून येणारा लॉन्सडाइट हे सर्वात कठीण पदार्थ आहेत.

 हे हिऱ्याहुनही  कठीण असतात.