Studyfromhome.com Blog content is created for Primary Education Development.

Breaking

abhyas majha इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image

abhyas majha  इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image
Click On Image

Search This Blog

Showing posts with label संस्कार गीते. Show all posts
Showing posts with label संस्कार गीते. Show all posts

Tuesday, 16 May 2023

May 16, 2023

बडबड गीते - प्राण्यांची सहल

 प्राण्यांची सहल


एकदा काय गंमत झाली
पक्ष्यांची सहल जायची ठरली
सकाळी लवकर सारे जमले
प्राण्यांच्या बागेत जायचे ठरले
कावळ्याने आणला लाडू नि चिवडा
चिमणीने आणला गरम वडा
पोपटाने आणली पुऱ्यांची पिशवी
मोराने आणली खिरीची बशी
प्राण्यांच्या बागेत सारे जमले
फुलराणीत सारे बसायला गेले
डब्यात बसली चिमणी नि कावळा
पोपट झाला इंजिनदादा
पोपटाने शिट्टी जोरात फुंकली
फुलराणी ती ऐटीत चालली
वाटेत दिसली वाघाची स्वारी
थरथर कापायला लागली सारी
चिमणी उडाली भुर्र भुर्र भुर्र
कावळा उडाला दूर दूर दूर



उंच आभाळी पोपट उडाला
झाडामागे मोर पळाला.

 

⚛️Online Test for Practice*
*🌀 6 वी भूगोल*
https://cutt.ly/vC8q3Y6
*🌀 6 th Science*
https://cutt.ly/iC8wf99
*🌀 6 th Mathematics*
https://cutt.ly/sC8wEKT
*🌀 7 th Science*
https://mystudyfromhomes.in/http:/mystudyfromhomes.in/.html/7-th-science/
*🌀 8 th Science*
https://mystudyfromhomes.in/http:/mystudyfromhomes.in/.html/8-th-science/

May 16, 2023

बडबड गीते - माझी बाहुली

  माझी बाहुली


लहान माझी बाहुली,
तिची मोठी सावली
नकटे नाक उडविते
घारे डोळे फिरविते
दात काही घासत नाही
तोंड काही धुवत नाही
भात केला कच्चा झाला,
वरण सगळं पातळं झालं
पोळ्या सगळ्या करपून गेल्या
तूप सगळे सांडून गेले
असे भुकेले नका जाऊ
थांबा करते गोड खाऊ
केळीचे शिकरण करायला गेली
दोनच पडले दात
आडाचे पाणी काढायला गेली
धपकन् पडली आत.

इयत्ता 8 वी आजचा सराव*
*💥 त्रिकोणाचे शिरोलंब*
https://www.dnyaneshwarkute.com/2021/09/8-4-online-test.html
*🔹इयत्ता आठवी मराठी ऑनलाईन टेस्ट*
https://www.dnyaneshwarkute.com/p/blog-page_61.html
*🔹इयत्ता आठवी गणित ऑनलाईन टेस्ट*
https://www.dnyaneshwarkute.com/p/blog-page_89.html
*🔹इयत्ता आठवी हिंदी ऑनलाईन टेस्ट*
https://www.dnyaneshwarkute.com/p/blog-page_25.html
*🔹इयत्ता आठवी इंग्रजी ऑनलाईन टेस्ट*
https://www.dnyaneshwarkute.com/p/english.html
*🔹इयत्ता आठवी सा.विज्ञान*
https://www.dnyaneshwarkute.com/p/blog-page_29.html
*🔹इयत्ता आठवी इतिहास*
https://www.dnyaneshwarkute.com/p/blog-page_52.html
*🔹इयत्ता आठवी भूगोल*
https://www.dnyaneshwarkute.com/p/blog-page_69.html
*🔳Semi English Test*
https://www.dnyaneshwarkute.com/p/6-8-semi-english.html
*🛑1 ली ते 10 वी सराव एका क्लिकवर*
*https://www.dnyaneshwarkute.com/2021/10/abhyas-majha.html*
 *✴️Abhyas majha*

May 16, 2023

बडबड गीते - बंडू आणि खंडू

बंडू आणि खंडू


बंडू आणि खंडू


बंडू आणि खंडू जेवायला बसले
हात नाही धुतले, पाय नाही धुतले
देवाला नमन ते पण नाही केले
भांडाभांडी करू लागले
ताटवाटी ओढू लागले
हे माझे हे माझे
म्हणू लागले
गरम गरम आमटीने तोंड भाजले
आई आली घरातून
बाबा आले माडीवरून
पाठीत धपाटे खूपच बसले
बंडू आणि खंडू जेवायला बसले. 

 

📝इयत्ता 5 वी आजचा सराव*
*💥 वाहतूक टेस्ट*
https://www.dnyaneshwarkute.com/2020/09/blog-post_25.html
*📋सरावासाठी ऑनलाईन टेस्ट*
*📚 इयत्ता - 5 वी*
*मराठी,हिंदी,इंग्रजी,गणित,सामान्य विज्ञान, परिसर अभ्यास*
*https://www.dnyaneshwarkute.com/p/blog-page_21.html*

*🔳Semi English Test*
https://www.dnyaneshwarkute.com/p/6-8-semi-english.html
 *✴️Abhyas majha*
*Online Test series*

Saturday, 29 May 2021

May 29, 2021

देशभक्तीपर गीत - जयोस्तुते

 देशभक्तीपर गीत - जयोस्तुते


जयोस्तुते श्री श्री महन्मंगले शिवास्पदे शिवास्पदे शुभदे। ।

स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे।।धृ.।।


राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीति संपदांची।

स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची।

परवशतेच्या नभात तूची आकाशी होशी।

स्वतंत्रते भगवती चांदणी चमचम लखलखशी ।।।।


गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली।

स्वतंत्रते भगवती तूच जी विलसतसे लाली।

तू सूर्याचे तेज उदधिचे गांभीर्यहि तूची।

स्वतंत्रते भगवती अन्यथा ग्रहण नष्टतेची  ।।।।


मोक्षमुक्ति ही तुझीच रूपे तुलाच वेदांती।

स्वतंत्रते भगवती योगिजन परब्रह्म वदती।

जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते।

स्वतंत्रते भगवती सर्व तव सहचारी होते ।।।।

हे अधम रक्त  रंजिते सुजन  पूजिते।

श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते।

तुजसाठि मरण ते जनन मरण ते जनन।

तुजवीण जनन ते मरण जनन ते मरण।

तुज सकल चराचर शरण चराचर शरण।

श्री स्वतंते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते।

                  -स्वातंत्र्यवीर सावरकर

Thursday, 27 May 2021

May 27, 2021

देशभक्तीपर गीत-आचंद्रसूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे

 

देशभक्तीपर गीत-आचंद्रसूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे


हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे

आचंद्रसूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे।।धृ.।।


कर्तव्यदक्ष भूमी, सीतारघूत्तमाची

रामायणे घडावी, येथे पराक्रमाची

शिर उंच उच व्हावळे, हिमवंत पर्वताचे

आचंद्रसूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे  ।।१।।


येथे नसो निराशा, थोड्या पराभवाने

पार्थास बोध केला, येथेच माधवाने

हा देश स्तन्य प्याला, गीतख्य अमृताचे

आचंद्र नांदो, स्वातंत्र्य भारताचे ।।२।।


येथेच मेळ झाला, सामर्थ्य संयमाचा

येथेच जन्म झाला, सिद्धार्थ गौतमाचा

हे क्षेत्र पुण्यदायी, भगवान् तथागताचे

आचंद्रसूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे ।।३।।


हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे

सत्यार्थ झुंड घ्यावी, या जागत्या प्रथेचे

येथे शिव-प्रतापी, नरसिंह योग्यतेचे

आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे ।।४।।

            - ग. दि. माडगूळकर 

Wednesday, 26 May 2021

May 26, 2021

देशभक्तीपर गीत- या भारतात बंधुभाव नित्य वसू दे

देशभक्तीपर गीत- या भारतात बंधुभाव नित्य वसू दे

या भारतात बंधुभाव नित्य वसू दे। 

दे वरचि असा दे ।।धृ।।


हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसूदे

नांदोत सुखे गरीब अमीर एकमंतानी

संग हिंदू असो, ख्रिश्चन वा हो इस्लामी

स्वातंत्र्य-सुखा या सकलामाजी वसू दे। 

दे वरचि असा दे ।।१।।


सकळास कळो मानवता, राष्ट्रभावना।

हो सर्व स्थळी मिळूनी समुदाय प्रार्थना।

उद्योगी तरुण शीलवान येथे असू दे। 

दे वरचि असा दे ।।२।।

जातीभाव विसरुनिया एक हो आम्ही

अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी

खळ-निंदका मनीही सत्य न्याय वसू दे। 

दे वरचि असा दे ।।३।।


सौंदर्य रमो घरघरांत स्वर्गियापरी

ही नष्ट होऊ दे विपती भीती बावरी

तुकडयादास सदा या सेवेमाजी वसू दे।

दे वरचि असा दे ।।४।।

            -श्री संत तुकडोजी महाराज

May 26, 2021

देशभक्तीपर गीत- झेंडा आमचा

देशभक्तीपर गीत - झेंडा आमचा

झेंडा आमचा प्रिय देशाचा, फडकत वरी महान

करितो आम्ही प्रणाम याला, करितो आम्ही प्रणाम  ।।धृ।।



लढले गांधी याच्याकरिता, टिळक, नेहरु, लढली जनता

समर धुरंधर वीर खरोखर, अर्पूनि गेले प्राण...

करितो आम्ही प्रणाम याला, करितो आम्ही प्रणाम ।।१।।



भारतमाता आमची माता, आम्ही गातो या जयगीता

हिमालयाच्या उंच शिखरावर, फडकत राही निशाण...

करितो आम्ही प्रणाम याला, करितो आम्ही प्रणाम।।२।।



या देशाची पवित्र माती, जुळवी आमच्या मधली नाती

एक नाद गर्जतो भारता, तुझा आम्हा अभिमान...

करितो आम्ही प्रणाम याला, करितो आम्ही प्रणाम ।।३।।



गगनावरि अन् सागरतीरी, सळसळ करिती लाटालहरी

जय भारत जय, जय भारत जय, गाताती जयगान...

करितो आम्ही प्रणाम याला, करितो आम्ही प्रणाम ।।४।।

                                         -वि.म. कुलकर्णी