Studyfromhome.com Blog content is created for Primary Education Development.

Breaking

abhyas majha इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image

abhyas majha  इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image
Click On Image

Search This Blog

Monday 3 May 2021

बोधकथा - खरी साधना

 खरी साधना


एका गावात एक फकीर राहात होता. तो नियमाप्रमाणे रोज नमाज पठण करत असे. नमाज पठण करताना त्याची जी एकाग्रता होती, ती अगदी वाखाणण्यासारखी होती. असाच तो एक दिवस जंगलातून फिरते फिरत येत असता त्याच्या अंगात एक बाण घुसला. या बाणामुळे त्याला फार वेदना होऊ लागल्या. तो बाणाला हात लावून काढण्याचा जेव्हा प्रयत्न करी. तेव्हा त्याचा जीव अगदी कळवळून जाई. 

फकिराच्या भोवती असणाऱ्या लोकांना त्याची ती तळमळ पाहावेना आणि धड बाणही काढता येईना. आता काय करायचे? हा मोठा प्रश्न पडला. इतक्यात त्या फकिराला जवळून ओळखणारे काही लोक आले. त्यांनी त्याची ती अवस्था पाहिली. त्यांनीही बाण काढायचा प्रयत्न केला; पण बाण काही निघेना. शेवटी ते म्हणाले, 'बाण काढणे तूर्तास तरी राहू द्या. हा फकीर सायंकाळी प्रार्थनस बसेल तेव्हा काढू.' असे करत सर्वजण सायंकाळची वाट पाहू लागले. 

सायंकाळी तो फकीर नमाज पठण करण्यास बसला. क्षणार्धात त्याच्या चित्ताची एवढी एकाग्रता झाली की, तो बाण त्याच्या शरीरातून केव्हा काढला याचे त्यालासुद्धा कळले नाही. नमाज पठण करण्यातं तो इतकी एकाग्रतेने बुडून गेला होता.

तात्पर्य : चित्ताची एकाग्रता हीच खरी साधना.

No comments:

Post a Comment