बाह्यसौंदर्य
एके दिवशी जगातील सुंदरता व कुरुपता या दोघींची नदीकिनारी भेट झाली. दोघीही स्नानाला आल्या होत्या.काही वेळ गप्पा मारून, एकमेकींचे कुशल विचारून त्यांनी पोहण्याची तयारी सुरु केली. वस्त्रे उतरवून काठावर ठेवली.
काही काळ पोहणे झाल्यावर कुरुपता काठावर आली आणि सुंदरतेची वस्त्रे नेसून निघून गेली. थोड्या वेळाने सुंदरता काठावर आली. तिने आपल्या वस्त्रांचा शोध घेतला. अखेर नाईलाजाने कुरुपतेची वस्त्रे नेसून ती निघून गेली.
कपड्यांच्या या अदलाबदलीमुळे कुरुपतेला तिच्या वस्त्रांवरून लोक सुंदरता समजू लागले आणि मुळात सुंदर असलेल्या सुंदरतेला केवळ वस्त्रांवरून कुरुपता समजण्याची चूक करू लागले. यामुळे सुंदरतेला खूप राग आला.
पुन्हा कुरूपता भेटली तेव्हा ती म्हणाली, की माझी वस्त्रे तू नेण्यामुळे लोक मला कुरूप आणि तुला सुंदर समजू लागले. यावर कुरूपता म्हणाली, मी तुझी वस्त्रे परत करते. कारण मला बाह्य सौंदर्याचा मुळी हव्यास आणि अभिमान नाही. कारण माझे खरे सौंदर्य हे बुद्धिमत्तेत आणि अंतरात्म्यात आहे.
[ तात्पर्य : बाह्य सौंदर्यावर भाळून न जाता अंतरात्मा जाणून घेणे महत्त्वाचे असते ]
No comments:
Post a Comment