खरी साधना
फकिराच्या भोवती असणाऱ्या लोकांना त्याची ती तळमळ पाहावेना आणि धड बाणही काढता येईना. आता काय करायचे? हा मोठा प्रश्न पडला. इतक्यात त्या फकिराला जवळून ओळखणारे काही लोक आले. त्यांनी त्याची ती अवस्था पाहिली. त्यांनीही बाण काढायचा प्रयत्न केला; पण बाण काही निघेना. शेवटी ते म्हणाले, 'बाण काढणे तूर्तास तरी राहू द्या. हा फकीर सायंकाळी प्रार्थनस बसेल तेव्हा काढू.' असे करत सर्वजण सायंकाळची वाट पाहू लागले.
सायंकाळी तो फकीर नमाज पठण करण्यास बसला. क्षणार्धात त्याच्या चित्ताची एवढी एकाग्रता झाली की, तो बाण त्याच्या शरीरातून केव्हा काढला याचे त्यालासुद्धा कळले नाही. नमाज पठण करण्यातं तो इतकी एकाग्रतेने बुडून गेला होता.
तात्पर्य : चित्ताची एकाग्रता हीच खरी साधना.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق