खालील ठळक मुद्दे काळजीपूर्वक वाचा
◆ भारतीय उपखंडामध्ये काही ठराविक देशांचा समावेश होतो. त्यामध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूटान बांगलादेश, श्रीलंका आणि भारत देश यांचा समावेश होतो .
या सर्व भूभागाला दक्षिण आशिया या नावाने सुद्धा ओळखले जाते.या भागांमध्ये भारत या देशाचा विस्तार खूप मोठा आहे आणि म्हणून या सर्व भागाला भारतीय उपखंड असे नाव पडले आहे.
◆ इतिहासाची रचना करताना - भुतकाळा मध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत, त्यांची सुसंगतपणे मांडणी केलेली असते त्यालाच इतिहास असे म्हणतात. मानवी समाज हा वस्ती करून राहणारा समाज आहे आणि तो एका ठिकाणी दीर्घकाळ वस्ती करून राहतो.
◆ मानवी समाज हा पूर्वी डोंगराळ प्रदेशामध्ये राहत होता. डोंगराळ प्रदेशात राहत असताना त्याचे मुख्य अन्न हे शिकार आणि जंगलातून मिळालेली वेगवेगळे पदार्थ हे होते.
● भारतामध्ये सर्वात प्राचीन नागरी संस्कृती ही हडप्पा संस्कृती आहे.
◆ इतिहास आणि भूगोल या दोघांचा खूप जवळचा संबंध आहे. स्थळ ,काळ ,व्यक्ती आणि समाज हे इतिहासाचे चार आधारस्तंभ असतात .त्यापैकी स्थळ हा घटक भूगोलाशी संबंधित असल्यामुळे इतिहासावर त्याचा खूप मोठा परिणाम होतो.
No comments:
Post a Comment