शिवपूर्वकालीन भारत
काळजीपूर्वक वाचन करा
शिवपूर्व काळामध्ये शेवटची वैभवशाली राजवट महाराष्ट्रामध्ये यादवांची राजवट होती. यादव घराण्यातील भिल्लम पाचवा याची राजधानी औरंगाबादजवळील देवगिरी येथे होती. त्यांनी कृष्णा नदीच्या पलिकडे सत्ताविस्तार केला.
◆ वायव्येकडील आक्रमणे
महाराष्ट्रात राष्ट्रकूट ,यादव अशा स्थानिक घराण्याची सत्ता असली तरी उत्तरेत मात्र वायव्येकडून आलेल्या आक्रमकांनी स्थानिक सत्तांना जिंकून आपला अंमल बसवला होता.
इसवी सनाच्या अकराव्या शतकात भारतावर तुर्कांचे आक्रमण होऊ लागली. ते आपल्या सत्तेचा विस्तार भारताच्या वायव्य सरहद्द पर्यंत करत आले.
गझनीचा सुलतान अहमद यांनी भारतावर अनेक स्वाऱ्या केल्या त्याने भारतातील अनेक संपत्तीची नासधूस केली.
◆ उत्तरेकडील सुलतानशाही
1175 आणि 1178 या काळात अफगाणिस्थान स्थानातील घोर येथील सुलतान महंमद घोरी याने भारतावर आक्रमण केली.
भारतातील जिंकून घेतलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी त्याने कुतुबुद्दीन ऐबक यांची नेमणूक केली.
1206 मध्ये मोहम्मद घोरी च्या मृत्यूनंतर ऐबकाने आपल्या प्रभुत्वा खाली भारतातील प्रदेशाचा कारभार पाहण्याला सुरुवात केली.
हा मूळचा गुलाम असून तो दिल्लीचा सत्ताधीश बनला.
1210 मध्ये त्याचा मृत्यू झाला.
इब्राहीम लोदी हा शेवटचा सुलतान होता. त्याच्या स्वभाव दोषामुळे त्याला अनेक शत्रू निर्माण झाले.दौलतखान याने मोगल सत्ताधीश बाबर यास इब्राहीम लोदी विरुद्ध पाचारण केले. या लढाईत बाबराने इब्राहिम लोदी चा पराभव केला आणि त्याबरोबरच सुलतानशाही चा शेवट झाला.
◆ विजयनगरचे राज्य
दिल्लीचा सुलतान महंमद तुघलक याच्या कारकिर्दीत दिल्लीच्या मध्यवर्ती सत्तेविरुद्ध दक्षिणेमध्ये उठाव झाले. त्यातूनच विजयनगर व बहमनी ही दोन राज्ये उदयास आली हरिहर व बुक्क दक्षिण भारतातील दोघे भाऊ दिल्लीच्या सुलतान यांच्या सेवेत सरदार म्हणून काम करत होते त्यांनी तुघलक यांच्या काळात अस्थिरतेचा फायदा घेऊन 1336 मध्ये दक्षीणेत विजयनगरचे राज्य स्थापन केली. कर्नाटक मधील हंपी ही या राज्याची राजधानी होती. हरिहर हा विजयनगर चा पहिला राजा होता त्याच्या मृत्यूनंतर त्याचा भाऊ बुक्क सत्तेवर आला.
◆ कृष्णदेवराय
कृष्णदेवराय इसवी सन 1509 मध्ये विजयनगरच्या गादीवर आला.
कृष्णदेवराय यांच्या कारकिर्दीत विजयनगरचे राज्य पूर्वेस कटक पासून पश्चिमेस गोव्यापर्यंत व उत्तरेस रायचूर दोआबा पासून दक्षिणेस हिंदी महासागरापर्यंत बसले होते.
इसवी सन 1530 मध्ये त्याचा मृत्यू झाला.
कृष्णदेवराय हा विद्वान होता त्याने तेलुगु भाषेमध्ये अमुक्तमाल्यादा हा ग्रंथ लिहिला.
कृष्णदेवराय नंतर विजयनगरच्या राज्याला उतरती कळा लागली.
◆ बहमनी राज्य
मोहम्मद तुगलक याचे वर्चस्व झुगारून दक्षिणेमध्ये सरदारांनी बंद केले 1347 मध्ये नवीन राज्य अस्तित्वात आले यास बहमनी राज्य असे म्हणतात. हसन गंगू याने दिल्लीच्या सुलतानाचा पराभव करून हे बहमनी राज्य स्थापन केले होते.
हसन गंगू बहमनी राज्याचा पहिला सुलतान झाला. कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे त्याने आपली राजधानी स्थापन केली.
◆ मोहम्मद गावान
महमूद गावान हा बहमनी राजाचा मुख्य वजीर आणि प्रशासक होता त्याने बहमनी राज्याचा आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले.
जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली .
बिदर येथे अरबी व फार्सी विज्ञान अभ्यासासाठी मदर संस्था स्थापन केली.
महमूद गावान नंतर बहमनी सरदारांमध्ये गटबाजी वाढीस लागली त्यातूनच बहमनी राज्याचे विघटन झाले.
वऱ्हाडची इमादशाही
बिदरची बरीदशाही
विजापूरची आदिलशाही
अहमदनगरची निजामशाही व
गोवळकोंड्याची कुतुबशाही अशी बहामनी राज्याची पाच शकले झाली.
◆ मुघल सत्ता
इसवी सन 1526 मध्ये दिल्ली येथे सुलतानशाही संपुष्टात आली आणि मुघल सत्तेची स्थापना झाली.
◆ बाबर
बाबर हा मोगल सत्तेचा संस्थापक होता. तो सध्याच्या उज्बेकिस्तान मध्ये असलेल्या फरगाना राज्याचा राजा होता. भारतातील संपत्तीचे वर्णन ऐकून त्याने भारतावर स्वारी करण्याची आखणी केली.
दिल्लीमध्ये त्यावेळी इब्राहिम लोदी सुलतान राज्यकारभार पाहात होता .
सुलतानशाहीच्या पंजाबच्या प्रदेशात दौलतखान लोदी हा प्रमुख अधिकारी होता. दौलत खानाने भारतावर आक्रमण करण्यासाठी बाबराला निमंत्रित केले. बाबराच्या आक्रमणाचा प्रतिकार करण्याकरता ईब्राहिम लोधी लोधी सैनिक घेऊन निघाला.
21 एप्रिल 1526 या दिवशी पानिपत या ठिकाणी इब्राहीम लोदी व बाबर यांच्यामध्ये लढाई झाली.
या लढाईमध्ये इब्राहिम लोदीच्या सैन्याचा पराभव झाला. ही पानिपतची पहिली लढाई आहे.
या लढाईनंतर मेवाडचा राणा संघाने राजपूत राज्यांना एकत्र आणले राणा संग यांच्यामध्ये खानूआ याठिकाणी लढाई झाली. राणा संघाच्या सैन्याचा पराभव झाला.
इसवी सन 1530 मध्ये बाबराचा मृत्यू झाला.
◆ अकबर
हा मोगल घराण्यातील सर्वांत कर्तबगार राजा होता. अकबराने भारत स्वतःच्या एकछत्री अंमलाखाली आणण्यासाठी प्रयत्न केला. तेव्हा त्याला विरोध सुद्धा झाला.
महाराणा प्रताप ,चांदबीबी, दुर्गावती यांनी अकबराविरुद्ध केलेला संघर्ष उल्लेखनीय आहे.
◆ महाराणा प्रताप
उदयसिंहाचा मृत्यूनंतर महाराणा प्रताप मेवाड च्या गादीवर बसला .
तेव्हा त्याच्या अस्तित्वासाठी त्यांनी संघर्ष चालू ठेवला.
महाराणा प्रताप यांनी अखेरपर्यंत अकबराबरोबर संघर्ष केला .पराक्रम, धैर्य, स्वाभिमान'इत्यादी गुणांमुळे महाराणा प्रताप इतिहासात अजरामर झाला आहे.
◆ चांदबिबी
इसवीसन 1595 मध्ये मुघलांनी अहमदनगर या निजामशाहीचा राजधानीवर हल्ला केला.मुगल सैन्याने अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा दिला.
अहमदनगरच्या निजामशहाच्या कर्तबगार मुलीने अत्यंत धैर्याने किल्ला लढवला.
पुढे मुघलांनी अहमदनगरचा किल्ला जिंकून घेतला मात्र निजामशाहीचे संपूर्ण राज्य मुघलांच्या ताब्यात आली नाही. निजामशाहीतील सरदारांमध्ये अंतर्गत दुही निर्माण झाली आणि या दोन्ही मधून चांदबीबीला ठार मारले गेले.
◆ राणी दुर्गावती
विदर्भाचा पूर्वभाग त्याच्याबरोबरचा मध्यप्रदेशचा भाग आणि छत्तीसगडचा पश्चिम भाग हा भाग स्थूलमानाने गोंडवन चा विस्तार होता .
चंदेल राजपूत यांच्या घराण्यात जन्मलेली दुर्गावती लग्नानंतर गोंडवन ची राणी झाली .
मध्ययुगीन इतिहासामध्ये गोंडवनची राणी दुर्गावती मुघलाविरुद्ध दिलेला लढा महत्त्वाचा आहे.
दुर्गा वतीने पतीच्या मृत्यूनंतर अकबराविरुद्ध लढताना प्राणार्पण केले परंतु तिने शरणागती पत्करली नाही.
अकबर
हा सुजाण आणि जागरूक शासक होता .
त्याचे धार्मिक धोरण उदार व सहिष्णू होते. तो सर्व धर्मातील प्रजेला सारखी वागणूक देत असे.
त्यांनी दिन ए इलाही हा धर्म स्थापन केला. परंतु हा धर्म स्वीकारण्याची शक्ती कोणावरही केली नाही.
◆ औरंगजेब
शहाजहान बादशहाच्या क्षेत्रातील औरंगजेब हा सत्तास्पर्धेत यशस्वी होऊन आई-वडिलांना स्थानबद्ध करून इसवी सन 1658 मध्ये बादशाह झाला.
शहाजहानचा थोरला मुलगा दारा शिकोह धार्मिक सहिष्णुतेचे बद्दल प्रसिद्ध होता .
औरंगजेब बादशहा झाला त्यावेळी मुघल साम्राज्य उत्तरेत काश्मीरपासून दक्षिणेस अहमदनगर पर्यंत आणि पश्चिमेस काबुल पासून पूर्वेला बंगाल पर्यंत पसरलेले होते.
◆ शिखांची संघर्ष
शिखांचे नववे गुरु तेगबहादूर यांनी औरंगजेबाच्या असहिष्णू धार्मिक धोरणाविरुद्ध तीव्र नापसंती दर्शवली. औरंगजेबाने त्यांना कैद केले व 1675 मध्ये त्यांचा शिरच्छेद केला.
त्यांच्यानंतर गुरुगोविंद सिंग हे शिखांचे गुरु झाले. गुरुगोविंद सिंग यांनी लढाऊ तरुणांचे एकदल उभे केले त्याला ◆ खालसा दल असे म्हणतात.
आनंदपुर हे त्यांचे प्रमुख केंद्र होते .
गुरुगोविंद सिंग दक्षिणेस आले इसवीसन 1708 मध्ये नांदेड मुक्कामी त्यांच्यावर हल्ला झाला त्यातच त्यांचे निधन झाले.
◆ राजपुतांशी संघर्ष
अकबराने आपल्या सलोख्याच्या धोरणाने राजपुतांचे सहकार्य मिळवले मात्र औरंगजेबाला राजपुतांचे सहकार्य मिळवले आले नाही. मारवाडचा राणा जसवंत सिंग यांच्या मृत्यूनंतर त्याचे राज्य औरंगजेबाने मोगल साम्राज्य जोडून घेतले .दुर्गादास राठोड यांनी जयसिंगाचा अल्पवयीन मुलगा अजित सिंह याला मारवाडच्या गादीवर बसवले. दुर्गादास राठोड मुघलांविरुद्ध मोठा संघर्ष केला.
राजपुत्र अकबर हा स्वतः राजपुतांना जाऊन मिळाला आणि त्याने औरंगजेबा विरुद्ध बंड पुकारले .
या बंडात महाराष्ट्रातील मराठ्यांची मदत घेण्याचा प्रयत्न झाला.
◆ मराठ्यांशी संघर्ष
महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याची स्थापना झाली. त्यांना स्वराज्य स्थापन करण्याच्या प्रयत्नांमध्ये इतर शत्रूबरोबर मुघलांशी सुद्धा संघर्ष करावा लागला. त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण दक्षिण भारत जिंकून घेण्याच्या हेतूने औरंगजेब दख्खनमध्ये आला परंतु मराठ्यांनी औरंगजेबाचे तीव्र संघर्ष केला. आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण केले.
No comments:
Post a Comment