Studyfromhome.com Blog content is created for Primary Education Development.

Breaking

abhyas majha इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image

abhyas majha  इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image
Click On Image

Search This Blog

Monday, 10 May 2021

May 10, 2021

बोधकथा - आसक्ती

 बोधकथा - आसक्ती

एकदा एक भिकारी, संत समजल्या जाणाऱ्या महात्माला भेटावयास गेला. तो संत एका अलिशान बैठकीवर बसला होता. त्या बैठकीवर लोंबकळत असलेल्या सोन्याच्या लडीला धरूनच तो सर्वांशी बोलत होता. हे पाहून भिकारी म्हणाला, 'मी भलत्या ठिकाणी आलो असे वाटते. 


आपण श्रेष्ठ संत की सुखोपभोग घेणारे लालची? मला हे राजवैभव, हा थाट पाहून खूप वाईट वाटतंय.' तेव्हा तो संत म्हणाला, 'मी ह्या क्षणी सर्व वैभव सोडून तुझ्याबरोबर यायला तयार आहे. चल, असे म्हणून तो त्या भिकाऱ्यासोबत अनवाणी चालूही लागला. 


काही अंतर गेल्यावर तो भिकारी म्हणाला, 'महाराज, माझं भिक्षापात्र आपल्या गादीवरच राहिलं. आपण इथं थांबा. मी ते घेऊन येतो.' हे ऐकून तो संत म्हणाला, 'मित्रा, तुझा जीव तर साध्या भिक्षापात्रात अडकून पडला आहे. मी तर सारं वैभव सोडून आलोय. मग सांग विरागी कोण? तू का मी? 

अरे, मी जरी सोन्याच्या लडीला धरलं असलं तरी माझ्या नावेच्या दोरीची खुंटी माझ्या हृदयातच नव्हे तर जमिनीतच घट्ट रोवली आहे,'


तात्पर्य : संसारात असणे ही आसक्ती नव्हे तर संसार मनात असणे ही आसक्ती.

May 10, 2021

बोधकथा - गरुड आणि घुबड

 बोधकथा - गरुड आणि घुबड

एक गरुड आणि एक घुबड सारखे एकमेकांशी भांडत असत, शेवटी त्यांनी परस्परांशी मित्रत्वाने वागण्याची शपथ घेतली व एकमेकांच्या पिल्लास खाऊ नये असे ठरविले. 


घुबड गरुडास म्हणाले, गड्या पण माझी पिल्ले कशी असतात, हे तुला ठाऊक आहे ना? ठाऊक नसेल तर ती दुसऱ्या एखाद्या पक्ष्याची आहेत असे समजून त्यांना गट्ट करशील, अशी मला भीती वाटते. 


गरुड म्हणाला, खरेच तुझी पिल्ले कशी असतात, हे मला ठाऊक नाही. घुबड म्हणाले, 'ऐक तर. माझी पिल्ले फार सुंदर असतात. त्यांचे डोळे सुंदर पिसे सगळे काही सुंदर सुंदरच असेत या वर्णनावरून माझी पिल्ले कोणती ते तुला सहज समजतील. 


पुढे एके दिवशी एका झाडाच्या ढोलीत, , गरुडास घुबडाची पिल्ले आहेतं ही. ही तर घुबडाची पिल्ले नसावीत. त्यामुळे त्यांना खाण्यास काही हरकत नाही. संध्याकाळी घुबड घरी आले. आपली पिल्ले नाहीशी झालेली पाहून घुबड म्हणाले, माझी पिल्ले तूंच खाल्ली असणार, यावर गरुड म्हणते, मी खाल्ली तर माझा दोष नाही. तूच तुझ्या पिलांचे सुंदर असे खोटे वर्णन केलेस. त्यामुळे मला वाटलं ही कुरुप तुझी पिल्ले नसावीत.


तात्पर्य : नेहमी खोटी माहिती देणाऱ्यांना असेच संकटाला सामोरे जावे लागते.

May 10, 2021

बोधकथा -आशेची शिदोरी

 बोधकथा  -आशेची शिदोरी


आशा.म्हणजे काळोखातही चमकणारा काजवाच. माणसाच्या एकाकीपणात तर त्याला हीच आशा सावलीसारखी सोबत करीत असते. संकटाच्या काळातही माणसाची आशा किंवा सकारात्मक भाव त्याला सोडत नाही.

अनेकदा आपल्याला तसा अनुभव येतो. माणूस जेव्हा एकाकी असतो, सगेसोयरेही त्याच्याकडे पाठ फिरवतात, तेव्हा मनातील आशाच त्याला धैर्य देत असते. प्रसिद्ध शास्त्रज्ञ सर मॅक्मिलन हे उत्तर ध्रुवाच्या मोहिमेवर चालले होते. तेव्हा त्यांच्या नावे एक पाकीट आले. त्यावर लिहिले होते. तेव्हा त्यांच्या नावे एक पाकीट आले. त्यावर लिहिले होते. जिवंत राहण्याची उमेद नष्ट होईल तेव्हाच हे पाकीट उघडावं.


मॅमिलन यांनी ते पाकीट सोबत घेतले आणि ते उत्तर ध्रुवाची मोहीम करून सुखरुप परतही आले. त्या घटनेलाही पंचवीस-तीस वर्षे झाली. त्यांची मुलाखत घेणाऱ्याला त्यांनी हा प्रसंग सांगितला. तेव्हा मुलाखत घेणारा म्हणाला, अजूनही आपण ते पाकीट का उघडलं नाहीत? मॅमिलन म्हणाले. पहिली गोष्ट, ज्या व्यक्तीने मला हे पाठवलंय त्याचा विश्वास मी तोडू शकत नाही. आणि दुसरे म्हणजे मी कधीच आशा सोडलेली नाही.

तात्पर्य : ईश्वराच्या शोध मार्गात आशेशिवाय अन्य शिदोरी नाही

Friday, 7 May 2021

May 07, 2021

बोधकथा - संघर्ष

 बोधकथा -  संघर्ष

एका नदीच्या प्रवाहातून दोन तृणकाड्या वाहात होत्या. नदीचा प्रवाह तसा जलदच होता, सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे तशा लाटाही निर्माण झाल्या होत्या; पण या दोन तृणकाड्यांमध्ये फरक इतकाच होता की एक प्रवाहाच्या दिशेने वाहात होती आणि दुसरी काडी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहात होती. 

जणू प्रवाहाला थोपवू पहात होती. विरुद्ध दिशेने जाणारी काडी म्हणायची, मी मेले तरी चालेल, पण पाण्याला पुढे जाऊ देणार नाही. तरीही ती काडी पाण्याबरोबर वाहात होती. पाण्याला रोखण्याचा तिचा प्रयत्न नदीला माहीतही नव्हता. या क्षुद्र तृणकाडीबद्दल तिला काहीच माहीत नव्हते.

नदीच्या दृष्टीने ती काडी पाण्यात असली काय अन् नसली काय सगळे सारखेच; पण तृणकाडीच्या जीवनात मात्र फरक पडला होता. तिने काहीही धडपड केली नाही तरी ती जिथे पोहोचायची होती तिथे पोहोचणारच होती; पण पाण्याशी संघर्ष करण्याच्या नादात तिचे आयुष्य मात्र संघर्षमय होऊन गेले होते.


( तात्पर्य : संघर्षामुळे जीवनाच्या प्रवाहात अडथळे निर्माण होतात.)

May 07, 2021

बोधकथा - जीवनाचे सत्य

 बोधकथा - जीवनाचे सत्य

एका नावेतून काही प्राध्यापक प्रवास करत होते. नाव पलिकडे जात असताना, एका प्राध्यापकाने नावाड्याला विचारले, काय रे तुला गणित येतं का? 

नावाडी म्हणाला, गणित? माझा आणि गणिताचा काय संबंध? 

यावर तो प्राध्यापक म्हणाला, गणित येत नाही? मग तुझं २५ टक्के आयुष्य वाया गेलं आणि थोडा वेळ गेल्यावर त्याच प्राध्यापकाने विचारले, तुला ज्योतिष तरी कळतं का? 

नावाड्याने नकारार्थी मान हलवून म्हणाला, नाही साहेब. 

प्राध्यापक म्हणाला, काय रे? तुला गणित येत नाही. ज्योतिष कळत नाही. तुझं ५० टक्के आयुष्य वाया गेलं. 

अचानक वादळं आलं. सोसाट्याचा वारा सुटला. नाव हेलकावे खावु लागला. सगळे घाबरून गेले. यावेळी नावाडी त्यांना म्हणाला, तुम्हाला पोहायला येतं? प्राध्यापक म्हणाला, नाही. मग नावाड्याने उडी मारली आणि म्हणाला तुमचं शंभर टक्के आयुष्य वाया गेलं. मला पोहता येतं. जे व्यवहारात कामाचे नाही, ते तुम्हाला येतं; पण मला जीवनात उपयोगी असणाऱ्या कला येतात. हेच जीवनाचे सत्य आहे.


( तात्पर्य : जीवनाचे सत्य साध्या साध्या व्यवहारातून कळते. )

Thursday, 6 May 2021

May 06, 2021

बोधकथा - योग्य धोरण

बोधकथा - योग्य धोरण


एक कोल्हा एका खोल तलावात पडला. यातून त्याला बाहेर निघता येईना. इतक्यात तिकडून एक तहानलेला बोकड आला.  तलावात कोल्ह्याला पाहून त्याने विचारले, काय हो, आतलं पाणी चांगलं पिण्यासारखं आहे का? ही आयतीच संधी पाहून कोल्ह्याने त्या पाण्याची खूप स्तुती केली. बोकडालाही खूप तहान लागली असल्या कारणाने काही विचार न करता त्याने आत उडी घेतली.


पोटभर पाणी प्याल्यावर मात्र मग ते दोघे बाहेर कसं पडायचं याचा विचार करू लागले. कोल्हा एकदम म्हणाला, बघ, एक चांगली कल्पना सुचलीय. मला तू मदत केलीस तर आपल्या दोघांचीही सुटका होईल. असं कर, तू पुढचे दोन्ही पाय या तलावाच्या भिंतीना लाव आणि शिंगे ताठ करून उभा राहा. म्हणजे तुझ्या शिंगावरून उडी मारून मी वर जातो. मग तुलाही मी वर ओढून घेईन. 


बोकडाने आनंदाने कोल्ह्याच्या सांगण्याप्रमाणे केले. ताबडतोब त्याच्या पाठीवरून, खांद्यावरून आणि शिंगांवरून अलगद उडी मारून कोल्हा वर गेला आणि चालू लागला. बोकडाने तक्रार केल्याबरोबर तो थोडासा मागे वळून म्हणाला, मित्रा, तुझ्या या लांब दाढीपेक्षा तुझ्या डोक्यात थोडी अक्कल जास्त असती तर बरं झालं असतं. आत उडी मारण्यापूर्वी परत वर कसं यायचं याचा विचार केला होतास का?

 

( तात्पर्य : अखेरपर्यंतचा सर्व विचार केल्याशिवाय धोरणी माणूस कुठल्याही कामाला हात घालत नाही, )

May 06, 2021

बोधकथा - उंटावरून शहाणा

 बोधकथा - उंटावरून शहाणा

एकदा एका गावातील शेतकऱ्याचे वासरू मडक्यातील पाणी पिण्यासाठी गेले; पण पाणी पिऊन झाल्यानंतर त्याला त्याची मान बाहेर काढता येईना. दुदैवाने त्या वासराचे डोके त्या मडक्यात अडकून बसले. शेतकऱ्याने बराच प्रयत्न केला; पण त्याचे डोके काही बाहेर निघेना. मग आजूबाजूची माणसे गोळा झाली. त्यांनीसुद्धा प्रयत्न केला. पण त्या वासराचे डोके काही बाहेर आले नाही. मग त्या माणसांनी एका शहाण्या माणसाला सल्ला देण्यासाठी बोलावले; पण गंमत अशी की तो शहाणा माणूस उंटावरूनच आला आणि म्हणाला, मी या वासराची सुटका करेन; पण मला त्याच्याजवळ जावे लागेल आणि मी काही उंटावरून खाली उतरणार नाही. 


तुम्हाला या शेतकऱ्याची भिंत पाडावी लागेल. मग त्या शेतकऱ्याची भिंत पाडली. तो माणूस तसाच उंटावरून त्या वासराजवळ गेला आणि म्हणाला, या वासराची मान कापा; पण डोके शाबूत राहील, याची काळजी घ्या आणि मगच मडके फोडा. म्हणजे तुमचा प्रश्न सुटेल. जमलेली माणसे अवाक् होऊन त्या शहाण्याचे बोल ऐकतच राहिली, आपण काय म्हणून याला बोलावले आणि याच्या सांगण्यावरून या गरीब शेतकऱ्याची भिंत पाडली, असे लोकांना वाटू लागले; पण आता काही इलाज नव्हता. भिंत तर पाडली गेली होती आणि वासरू तर अडकून बसले होते.


 ( तात्पर्य : मूर्ख माणसांचे सल्ले घेऊ नयेत. )

May 06, 2021

बोधकथा - शब्दज्ञान

 बोधकथा - शब्दज्ञान

एका फकिराजवळ एक प्राध्यापक गेले आणि त्याला विचारू लागले, सत्य काय आहे, हे मला जाणून घ्यायचे आहे. फकीर म्हणाला, सत्य तर तुमच्याजवळ आहे. हे जाणून घेण्यासाठी इथं कशाला आलात? शब्दज्ञानाने तुमचं डोकं गच्च भरलं आहे. एवढे बोलून तो " फकीर गप्प झाला. त्याने त्या प्राध्यापकांसाठी चहा केला. तो कपबशीत चहा ओतू लागला. कप भरून गेला, बशीही भरणार-तरीही फकीर चहा ओतत होता. 

इतक्यात प्राध्यापक म्हणाले, आता थांबा की, त्या कपबशीत एक थेंबही चहा मावणार नाही. फकीर म्हणाला, तुम्हाला दिसतंय की, आता चहा ओतला तर तो सांडेल. तसंच तुमचं झालंय. तुमच्या डोक्यातील जागा शब्दज्ञानानं भरून गेली आहे. त्यात आणखी काही भरलं तर वेड लागेल. सत्य जाणण्यासाठी अगोदर शब्दज्ञान विसरा.


(तात्पर्य : ज्ञान जाणून घेण्यासाठी मन मोकळे हवे. विचारांची गर्दी असेल तर सगळे ज्ञान पाण्यात जाते)