3 - डिंगोरी
1)
ट्रिंग ट्रिंग सायकल
धावधावे धावली
घरभर भटकून
धपकन धडकली
2)
निळ्या-निळ्या डोळ्यांची
चिमुकली बाहुली
पऱ्यांच्या राज्यात
भटकायला गेली
3)
किल्लीचा ससोबा
तुरुतुरु धावला
गवत खायला
बागेत पळाला.
कोण ते लिहा.
१) चक्कर येऊन पडणारी
भिंगोरी
2) घरभर भटकणारी
सायकल
३) बागेत पळालेला
ससोबा
४) कपाटात झोपणारी
खेळणी
- खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
१) भिंगोरी कशी फिरली ?
भिंगोरी गरगर फिरली.
(२) सायकल कशी पडली ?
सायकल धपकन पडली.
(३) बाहुली कोठे भटकायला गेली ?
बाहली पऱ्यांच्या राज्यात भटकायला गेली.
(४) बाळाची खेळणी कोठे झोपली ?
बाळाची खेळणी कपाटात झोपली.
(५) ससोबा बागेत कशासाठी पळाला ?
ससोबा बागेत गवत खायला पळाला.
(६) ही कविता कोणी लिहिलेली आहे ?
ही कविता मंदा खांडगे यांनी लिहिली आहे.
No comments:
Post a Comment