Studyfromhome.com Blog content is created for Primary Education Development.

Breaking

abhyas majha इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image

abhyas majha  इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image
Click On Image

Search This Blog

Showing posts with label शालेय खेळ. Show all posts
Showing posts with label शालेय खेळ. Show all posts

Sunday, 2 April 2023

April 02, 2023

Rakshabandhan - रक्षाबंधन

रक्षा बन्धन


रक्षा-बन्धन का त्यौहार भाई-बहिन के पवित्र प्रेम का प्रतीक माना जाता है।
यह हिन्दुओं का प्रमुख त्यौहार है। यह त्यौहार श्रावण मास की पूर्णिमा को मनाया
जाता है। रक्षा बन्धन को राखी, सलूनों व श्रावणी भी कहते हैं।
रक्षा-बन्धन की प्रथा का आरम्भ तब से हुआ जब एक बार देवताओं और
राक्षसों के बीच युध्द हुआ। इस युध्द में देवताओं की हार होने लगी। तब देवताओं
के राजा इन्द्र की पत्नी ने अपने पति के हाथ में रक्षा-सूत्र बाँधा । इसी रक्षा-सूत्र राखी
की शक्ति पाकर इन्द्र ने राक्षसों को हरा दिया। तब से यह रक्षा-बन्धन का त्यौहार
मनाया जाता है ।

इयत्ता 5 वी आजचा सराव*
*💥 वाहतूक टेस्ट*
https://www.dnyaneshwarkute.com/2020/09/blog-post_25.html
*📋सरावासाठी ऑनलाईन टेस्ट*
*📚 इयत्ता - 5 वी*
*मराठी,हिंदी,इंग्रजी,गणित,सामान्य विज्ञान, परिसर अभ्यास* 

https://www.dnyaneshwarkute.com/p/blog-page_21.html

*🔳Semi English Test*
https://www.dnyaneshwarkute.com/p/6-8-semi-english.html

 
प्राचीन काल में ब्राम्हण राजा-महाराजाओं और अपने यजमानों को इस दिन
राखी बांधा करते थे। वे भी बाम्हणों को यथोचित दान देते थे और उनकी रक्षा का
प्रण लेते थे। बहुत समय बाद जब भारत की नारी को रक्षा की आवश्यकता पडी
तब रक्षा-बन्धन की प्रथा ने नया रुप ले लिया। फिर तो बहिन भाइयों की कलाई पर
राखी बाँधने लगीं और उनसे अपनी रक्षा का प्रण लेने लगीं ।
इतिहास में ऐसी कई घटनायें है कि जो रक्षा-बन्धन से सम्बन्ध रखती हैं। एक
बार जब बहादुरशाह ने मेवाड पर आक्रमण किया तब चिंतौड की महारानी कर्मवती
ने मुगल सम्राट हुमायूँ के पास राखी भेजी । हुमायूँ तुरन्त सेना सहित अपनी बहिन
की रक्षा के लिए चल दिया ।

1 ली ते 10 वी सराव एका क्लिकवर*
*https://www.dnyaneshwarkute.com/2021/10/abhyas-majha.html*
रक्षा-बन्धन के दिन बहिन अपने भाई के माथे पर तिलक लगाती है, उसकी
कलाई में राखी बाँधती है, उसका मुँह मीठा कराती है और उसकी लम्बी-आयु व उसके
सुखी जीवन की कामना करती है। इस अवसर पर भाई जहाँ बहिन को धन-वस्त्र आदि
भेंट करता है तो वहाँ उसकी रक्षा करने का भी वचन देता है।
रक्षा-बन्धन भाई-बहिन के पवित्र सम्बन्धों को मधुर और सरस बनाने वाला
त्यौहार है। यह त्यौहार जहाँ बहिनों का मन हर्ष व उल्लास से भर देता है तो वहाँ
भाइयों को बहिनों के प्रति कर्त्तव्यनिष्ठ बनने की प्रेरणा देता रहता है।


Tuesday, 23 March 2021

March 23, 2021

शालेय खेळ - गोलातील खेळ - भाग 2 - School Game Part 2

 शालेय खेळ - गोलातील खेळ - भाग 2 - School Game Part 2  

३. खेळाचे नाव घाणेरडा माणूस.

वर्गरचना 

सर्वाना गोलात उभे करावे. एकावर राज्य द्यावे.

खेळाचे वर्णन - 

सर्व विद्यार्थी गोल करून आतमध्ये तोंड करून उभे राहतील.

एका विद्यार्थ्यावर राज्य द्यावे. राज्य असणारा विद्यार्थी वर्तुळातील उभ्या असणाऱ्या विद्यार्थ्यासमोर जाऊन उभा राहील. त्यावेळी वर्तुळातील विद्यार्थी नाबाद राहण्यासाठी आपला कोणताही एक पाय डावा उजवा वरती उचलून त्याच्या खालून हात घालून नाक पकडून उभा राहील. नाक पकडण्यापूर्वी जर राज्य असणारा विद्यार्थी त्याला शिवला तर तो विद्यार्थी बाद होऊन त्याच्यावर राज्य दिले जाईल. 

बाद झालेला खेळाडू विद्यार्थी ' राज्य ' घेईल.


४. खेळाचे नाव- राम राम पावणं.

वर्गरचना - 

हात धरून मोठा गोल करा.

खेळाचे वर्णन - 

सर्व विद्यार्थी मोठा गोल करून आत तोंड करून उभे राहतील. एका विद्यार्थ्यांवर राज्य द्यावे. तो गोलाच्या बाहेरून धावत असताना कोणत्याही एका विद्यार्थ्याच्या पाठीवर थाप मारील. तो विद्यार्थी विरुद्ध बाजूने धावू लागेल. जेव्हा हे दोघे एकत्र भेटतील त्यावेळी राम-राम पावणं म्हणून एकमेकांना नमस्कार करतील आणि दोघेही मोकळ्या जागेवर जाण्याचा प्रयत्न करतील. ज्याला जागा मिळणार नाही तो बाद होईल .याच खेळात राम-राम पावण, नमस्कार, बैठक, जोर, दण्ड यांचाही उपयोग करून घ्यावा.

निर्णय - सर्व नियमाचे पालन करून जो विद्यार्थी मोकळ्या जागेवर जाऊन प्रथम उभा राहील तो विजयो. ज्याला जागा मिळणार नाही त्याचेवर राज्य द्यावे.


५ . खेळाचे नाव-  घरी जा.

साहित्य 

चुना.

वर्गरचना - 

वर्गाला मोठा गोल करून उभे करा. प्रत्येकाला त्याच्या भोवती ठळक पावलाएवढे वर्तुळ काढण्यास सांगा. चुन्याने ते ठळक करा. विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा ४.५ जणाना वर्तुळ काढण्यास सांगू नये.

खेळाचे वर्णन-

मोठा गोल करून उभे राहावे. प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या भोवती छोटासा गोल किंवा चौकोन ठळक आखण्यास सांगावा. हा चौकोन किंवा गोल हे त्या विद्यार्थ्यांचे घर झाले. त्यातील एकावर राज्य द्यावे. त्याचा चौकोन-गोल पुसून टाकावा. हा विद्यार्थी बेघर झाला. तो वर्तुळाच्या बाहेरून धावत असताना घरातील तीन-चार जणांच्या पाठीवर थाप मारेल. ज्यांच्या पाठीवर थाप बसेल ते विद्यार्थी बेघर विद्यार्थ्यामागून धावतील. बेघर विद्यार्थी एका घरात जाऊन "घरी जा" असे सांगेल. त्यानंतर त्याच्या मागून धावणान्या विद्यार्थ्यांनी मोकळया घरात जाऊन. उभे राहावे. ज्याला घर मिळणार नाही तो बेघर. त्याच्यावर राज्य द्यावे.

निर्णय - ज्या विद्यार्थ्यांना घर मिळणार नाही ते बाद होतील. शेवटपर्यंत घर मिळविणारा विद्यार्थी विजयी ठरेल.

March 23, 2021

शालेय खेळ - गोलातील खेळ - भाग 1 - School Game Part 1

शालेय खेळ - गोलातील खेळ - भाग 1 - School Game Part 1 


गोलातील खेळ 

१ . खेळाचे नाव-खो खो (जोडीदारासह)

वर्गरचना- 

विद्याथ्र्याचा हात धरून गोल करा. त्यांच्या एकापुढे एक अशा जोड्या करा. एका विद्यार्थ्याला धावण्यास सांगा. दुसऱ्याला त्याला पकडण्यास सांगा.

खेळाचे वर्णन- 

सर्व विद्यार्थी जोडीने एकामागे एक असे गोलात उभे राहतील.

दोन वर्तुळे होतील. एका जोडीतील एका विद्यार्थ्याला शिवायला सांगावे व दुसऱ्यास पळण्यास. 

पळणारा विद्यार्थी गोलातील कोणत्याही एका जोडीसमोर उभा राहून टाळी वाजवेल. 

त्याच्या पाठीमागील गोलातील विद्यार्थी धावेल. 

ज्याला टाळी वाजवून खो मिळाला असेल तो पाठीमागे जाऊन उभा राहील.

धावणारा विद्यार्थी टाळी वाजवल्यावर त्याच वेळी तोंडाने खो असेही म्हणेल.

निर्णय - पकडणान्याने धावणा-यास शिवले तर तो बाद होईल. नंतर पकडणारा धावेल. बाद होणारा त्याला पकडेल. त्यानंतर दुसऱ्या जोडीला संधी द्यावी.


२. खेळाचे नाव - खो खो  (जोडीदाराचा हात धरून खो.)

वर्गरचना - 

सर्व विद्यार्थ्यांना आपल्या जोडीदाराचा हात धरून वर्तुळात उभे करावे. एकास धावण्यास व दुसऱ्यास शिवण्यास सांगावे.

खेळाचे वर्णन - 

जोडीदाराचा हात धरून खो. सर्व विद्यार्थी हात धरून वर्तुळात उभे राहतील. एका जोडीतील एका विद्यार्थ्याला धावण्यास सांगावे. दुसऱ्यास पकडण्यास, धावणारा विद्यार्थी हात धरून उभे असलेल्या विद्यार्थ्याचा हात धरेल त्याच वेळी तोंडाने खो म्हणेल. त्यानंतर डाव्या किंवा उजव्या बाजूकडील विद्यार्थी धावेल,

निर्णय - बाद झाल्यावर उलट जोडी करा. नंतर नवीन जोडीवर राज्य द्यावे.

March 23, 2021

शालेय खेळ - बैठे खेळ - भाग 4 - School Game Part 4

शालेय खेळ -  बैठे खेळ - भाग 4 - School Game Part 4 

 १2. खेळाचे वर्णन - जागेवर वस्तू ठेवा.

साहित्य - 

रुमाल, दगड, डंबेल्स, लेझीम,चुना वगैरे.

वर्गरचना - हात धरून मोठा गोल करून उभे करावे.

खेळाचे वर्णन - सोईनुसार विद्यार्थ्यांची रचना करून घ्या. एका जागेवर छोटे वर्तुळ काढा. त्यापासून विद्यार्थ्यांना आपल्या जागेपर्यंतचे पावलाने अंतर मोजून घेण्यास सांगा. नंतर एका विद्यार्थ्यांचे डोळे रुमालाने बांधून त्याच्या हातात एक छोटा दगड, रुमालासारखी वस्तू द्या. ती वस्तू त्याने मोजलेल्या पावलाइतक्या अंतरापर्यंत चालत जाऊन बरोबर आखलेल्या वर्तुळात ठेवण्याचा प्रयत्न करावा. जो बरोबर वर्तुळात दिलेली वस्तू ठेवील तो विद्यार्थी विजयी.

निर्णय - अचूक कृती करणाऱ्याचा योग्य 'अंदाज वीर' म्हणून गौरव करा.

१3 . खेळाचे नाव - जपून न्या.

साहित्य - दगड, बटाटा, डंबेल्स, यासारख्या वस्तू.

वर्गरचना - विद्यार्थ्यांना गोलात नीट उभे करावे. हात समोर तळवे जमिनीकडे अशा स्थितीत.

खेळाचे वर्णन - विद्यार्थी गोलात उभे राहतील. हात समोर तळवे जमिनीकडे एका विद्यार्थ्याच्या हातावर दगड, बटाटा सारखी एखादी वस्तू ठेवावी. त्याने ती वस्तू खाली न पाडता पुढील विद्यार्थ्याच्या हातावर अलगद ठेवावी. ज्याच्या हातातून ती वस्तू पडेल तो विद्यार्थी बाद होईल.

निर्णय - हातावरील वस्तू न पाडता देणारा विद्यार्थी ‘कुशल खेळाडू' म्हणून गौरवावा.

१4 . खेळाचे नाव - गुप्त संदेश सांगा.

वर्गरचना - वर्गात बसल्या जागी सभागृहात, मैदानात हात धरून मोठ्या गोलात.

खेळाचे वर्णन - विद्यार्थ्यांना गोलात उभे करा. एका विद्यार्थ्याच्या कानात शिक्षक एक वाक्य सांगतील. त्या विद्यार्थ्याने तेच वाक्य पुढील विद्यार्थ्याच्या कानांत सांगावे, असे शेवटपर्यंत करावे. शेवटच्या विद्यार्थ्यान निरोप मिळाला की ते वाक्य मोठयाने सांगावे. बरोबर वाक्य नंतर शिक्षक सांगतील.

निर्णय - ज्या विद्यार्थ्याने योग्य संदेश ऐकून पुढच्या विद्यार्थ्याला सांगितला अशाची चौकशी करून टाळ्या वाजवून गौरव करावा.

१५. खेळाचे नाव पत्रावर शिक्का मारा.

वर्गरचना - वर्गाला हात धरून मोठा गोल करण्यास सांगा. प्रत्येकाल त्याच्या गावाचे नाव सांगण्यास सांगा.

खेळाचे वर्णन -  प्रथम सर्व विद्यार्थ्यांना भारतातील किंवा मोठ्या शहरांची नावे सांगण्यास सांगावीत. जे नाव जो विद्यार्थी सांगेल ते त्याचे गाव झाले. नंतर शिक्षक एका विद्यार्थ्याला मधे बोलावतील तो पत्र होईल. शिक्षक सांगितलेल्या नावापैकी कोणत्याही एका गावाचे नाव घेतील. त्यानंतर " पत्र झालेल्या" विद्यार्थ्यांने ते नाव असणान्या विद्यार्थ्यासमोर जाऊन उभे राहावे. जर ते नाव त्याचे नसेल तर त्याने पत्रावर शिक्का म्हणजेच पाठीत बुक्का शिक्क्यासारखा मारून पुढे जा म्हणावे. असे तीन वेळा करण्याची संधी पत्राला द्यावी.

निर्णय-  अचूक जागेवर जाणाऱ्या विद्यार्थ्याच्या नावाएवढया टाळ्या वाजवून गौरव करा. 

Friday, 19 March 2021

March 19, 2021

शालेय खेळ - बैठे खेळ - भाग 3 - School Game Part 3

शालेय खेळ भाग 3 - School Game Part 3 

10)   खेळाचे नाव - माणूस, वाघ, बंदूक.

वर्गरचना

सर्वाना मोठ्या गोलात नीट उभे करा.

खेळाचे वर्णन 

सर्व विद्यार्थ्यांचा गोल करावा. 

एका विद्यार्थ्यावर राज्य द्यावे.

राज्य घेणाऱ्याने नमस्कार केला की ती खूण माणसाची. 

हाताच्या बोटांनी बंदूक दाखवावी आणि दोन्ही हाताचे पंजे कानाजवळ नेले तर वाघ होईल.

त्यानंतर हा विद्यार्थी गोलातील कोणत्याही विद्यार्थ्यासमोर जाऊन वरील तीनपैकी कोणतीही एक खूण करील. 

गोलातील विद्यार्थी त्याला त्यातील एका खुणेने बरोबर उत्तर देतील 

माणसाच्या नमस्काराला वाघाचे कानाजवळ हात नेऊन ; बंदुकीला माणसाच्या नमस्काराने आणि

वाघाला बंदुकीच्या कृतीन उत्तर द्यावे. 

याप्रमाणे जो उत्तर देऊ शकणार नाही तो विद्यार्थी बाद होईल.

निर्णय - अचूक कृती करणारे विद्यार्थी विजयी ठरवावेत.

11)   खेळाचे नाव -  तळ्यात मळ्यात.

साहित्य

दोरी, चुना, टेप.

वर्गरचना 

वर्गाला ५ मीटर त्रिज्येच्या वर्तुळावर उभे करावे. 

मध्यभागी शिक्षक उभे राहतील.

खेळाचे वर्णन

गोलात सर्व विद्यार्थी कमरेवर हात ठेवून उभे राहतील

शिक्षक सांगतील तळयात की सर्व विद्यार्थी आतमध्ये म्हणजेच पुढे छोटी उडी मारतील. 

मळयात म्हणाले की मागे. 

चुकीचे करणारा विद्यार्थी अर्थातच बाद होईल.

निर्णय - शेवटपर्यंत अचूक काम करणारा विद्यार्थी विजयी.

12)   खेळाचे नाव - खादाड भाऊ.

वर्गरचना - 

मैदानात किंवा सभागृहात गोलात अगर ३- ४ ओळीत किंवा वर्गात बसल्या जागेवरच.

खेळाचे वर्णन - 

शिक्षकाने विद्यार्थ्यांना सोईनुसार उभे करून घ्यावे. 

सर्वाच्या समोर शिक्षक उभे राहतील. 

खाण्याच्या वस्तूचे नाव घेतील. 

त्यानंतर विद्यार्थी " खाणार " असे म्हणतील. 

यावेळी एखादे नाव खाण्याच्या वस्तूचे नसेलही, अशा वेळी जे विद्यार्थी " खाणार " म्हणून ओरडतील

ते विद्यार्थी बाद होतील.

निर्णय - शेवटपर्यंत राहणारा विद्यार्थी "निश्चयी विद्यार्थी" म्हणून घोषित करावा.

March 19, 2021

शालेय खेळ- बैठे खेळ - भाग 2 - School Game Part 2

शालेय खेळ भाग 2 - School Game Part 2


7)  खेळाचे नाव- जमीन, आकाश, पाणी आणि अग्नि.

वर्गरचना- 

वर्गात बसल्याप्रमाणे किंवा मैदानात गोलात.

खेळाचे वर्णन

सर्वजणांना शिक्षकांनी सोईनुसार बसवावे. 

एका विद्यार्थ्याला प्रश्न विचारण्यासाठी सांगावे. 

प्रश्नकर्ता अन्य विद्यार्थ्यांपैकी कोणालाही जमीन, आकाश, पाणी यापैकी एकच विचारेल. उदा. जमीन. त्यावेळी

उत्तरकर्ता विद्यार्थ्याने जमिनीवरील कोणत्याही गोष्टीचे नाव सांगावे.

जर या तीन नांवाशिवाय अग्नि' असे विचारले तर कोणतेच उत्तर देऊ

नये. 

चुकीचे उत्तर देणारा विद्यार्थी बाद होईल.

निर्णय शेवटपर्यंत अचूक उत्तर देणारा विद्यार्थी विजयी होईल.


8) खेळाचे नाव . भूऽर्रऽ

वर्गरचना

वर्गात बसल्या जागेवर, सभागृहात, मैदानात गोलात.

खेळाचे वर्णन 

राज्य असणारा विद्यार्थी कोणतेही एक नाव घेऊन भूऽऽम्हणेल. 

यात उडणाऱ्या पक्ष्याचे नाव येईल तेव्हाच भूऽर्र म्हणावे.   (उदा. भूऽर्रऽ कावळा भूऽर्रऽ पोपट भूऽऽ) यावेळी विद्यार्थ्यांनी तोंडाने भूऽर्रऽऽ म्हणताना हाताचे दोन्ही तळवे वरती न्यावेत. 

याशिवाय अन्य नावाच्या वेळी भूऽर्रऽ म्हणणारे विद्यार्थी बाद होतील.

निर्णय - शेवटपर्यंत राहणारा विद्यार्थी " एकाग्रचित्ती म्हणून त्याचा गौरव करावा.

Sunday, 8 November 2020

November 08, 2020

School Games Part 1 - शालेय खेळ - बैठे खेळ - भाग 1

School Games Part 1  - शालेय खेळ भाग 1 






१. बैठे खेळ

१. खेळाचे नाव - उलटे अंक म्हणा.

वर्गरचना  - वर्गात बसल्याप्रमाणेच करावी. सभागृहात  असल्यास गोलात बसवावे किंवा सोईनुसार दोन-तीन गटात विभागणी करावी.

 खेळाचे वर्णन-      आपल्या वर्गाची शिक्षकाने सोईनुसार दोन किंवा तीन गटात विभागणी करावी. प्रथम पहिल्या गटातील विद्यार्थ्यांनी  १००-९९-९८ या उलट क्रमाने अंक मोजन्यास प्रारंभ करावा. मधेच चुकला तर दुसर्या गटाने  त्याच्या पुढील अंक मोजण्यास प्रारंभ करावा. ज्या गटातील विद्यार्थी बिनचूक अंक मोजतील तो गट विजयी घोषित करावा 

निर्णय- बिनचूक अंक मोजणारा गट विजयी.

२. खेळाचे नाव-राम म्हणा कुणी कृष्ण म्हणा.

वर्गरचना-       वर्गात बसल्या जागेवर किंवा  सभागृहात मोठा गोल करून.

खेळाचे वर्णन-  वर्गातील विद्यार्थ्यांना सोईनुसार वर्तुळात एक ते शंभर अंक एकापूढे एक याप्रमाणे विद्यार्थ्यांनी म्हणावेत. या वेळी तीन आणि पाच या संख्येने भाग जाणारी संख्या  (उदा. १. २. राम ४. ५. राम ) पुढील संख्या म्हणावी, तर पाच संख्येने भाग जाणारी संख्या आल्यास त्यावेळी त्या बिद्यार्थ्यानेही कृष्ण म्हणावे ( उदा- १. २. राम ४ कृष्ण ५. राम ७. ८. ९. राम ११ कृष्ण ). पुढील विद्यार्थ्याने पुढील संख्या म्हणावी.जो विद्यार्थी राम किंवा कृष्ण म्हणणार नाही तो बिद्यार्थी खेळातून बाद होईल.

निर्णय - शेवटपर्यंत अचूक अंक म्हणणारा विद्यार्थी विजयी होईल.

३. खेळाचे नाव- नेता ओळखा.

वर्गरचना- मोठया गोलात वर्गात किंवा सभागूहात बसवावे.

खेळाचे वर्णन- वर्गातील एका विद्यार्थ्याला नेता करावा. किंवा त्याच वेळी

विद्यार्थ्याला लांब पाठवून तो आल्यावर सर्वानी प्रथम टाळया वाजविन्यास सुरुवात करावी. त्यानंतर नेता झालेल्या विद्यार्थ्याने सहजपणे कृती बदलावी त्याप्रमाणे सर्वांनी कृती करावी ओळखण्याचे काम

ज्याला  करावयाचे आहे त्याने तीन संधीत नेता शोधून काढावा. तसे न झाल्यास त्याला छोटीशी कृती करण्यास सांगावी 

निर्णय = अचूक नेता ओळखणार्याच्या नावाचा जयजयकार करावा.

४. खेळाचे नाव- प्रश्न विचारा, नेता ओळखा.

वर्गरचना - गोलात किंवा वर्गात बसल्या ठिकाणी.

खेळाचे वर्णन- सर्वाच्या सम्मतीने एका महान राष्ट्रीय नेत्याचे नाव निश्चित करावे. शक्यतो पाठ्यक्रमावर आधारित हे नाव असावे. एका विद्यार्थ्याने बोलावल्यावर यावे व प्रत्येकाला नेता ओळखण्याच्या दृष्टीने प्रश्न विचारावा   उत्तर देताना " हो किंवा नाही " एवढेच यावे. त्याच्या आधारावर प्रश्नकर्त्या  विद्यार्थ्याने कमीत-कमी प्रश्नात नेता' ओळखण्याचा प्रयत्न  करावा.

निर्णय नेता - ओळखणार्या विद्यार्थ्याला वर्गाने शाबासकी द्यावी

५. खेळाचे नाव- शिवाजी म्हणतो.

वर्गरचना - मैदानात वर्ग गोलात किवा चार ओळीत  उभे करावे. शिक्षकांनीच आज्ञा देण्याचे काम करावे.

खेळाचे वर्णन- शिक्षक ज्या  आज्ञापूर्वी " शिवाजी म्हणतो" शब्द म्हणतील त्यानंतरच्या आज्ञेचे पालन करावे नुसत्या आज्ञेचे पालन करू नये. जो विद्यार्थी चूक करील तो विद्यार्थी खेळातून बाद होईल. शेवटपर्यंत राहणारा विद्यार्थी विजयी ठरविला जाईल.

निर्णय- शिवाजी म्हणतो ' नंतर येणारी आज्ञा शेवटपर्यंत पालन करणारा विद्यार्थी विजयी घोषित करावा.

६. खेळाचे नाव- मी ओळखतो.

साहित्य - डोळे बांधण्यासाठी २-४ रुमाल.

वर्गरचना- वर्गात बसल्या ठिकाणी, सभागृहात गोलात किंवा मेंदानात ४ ओळीत.

खेळाचे वर्णन - एका विद्यार्यांचे रुमालाने डोळे बांधाबेत. त्याला थोडेसे फिरवून नंतर एखाद्या विद्यार्थ्यासमोर उभे करावे. डोळे बांधलेला विद्यार्थी त्याला ५-६ प्रश्न विचारील आणि त्याच्या उत्तराच्या आवाजावरून तो कोण आहे त्याचे नाव सांगून ओळखेल. नांव सांगण्याची डोळे बांध-लेल्या विद्यार्थ्याला तीन वेळा तरी संधी द्यावी. 

निर्णय-  तीन संधीत ओळखल्यास त्याचा जयजयकार करा. न ओळखता आल्यास त्याला छोटीशी कृती सांगावी