शालेय खेळ भाग 2 - School Game Part 2
7) खेळाचे नाव- जमीन, आकाश, पाणी आणि अग्नि.
वर्गरचना-
वर्गात बसल्याप्रमाणे किंवा मैदानात गोलात.
खेळाचे वर्णन-
सर्वजणांना शिक्षकांनी सोईनुसार बसवावे.
एका विद्यार्थ्याला प्रश्न विचारण्यासाठी सांगावे.
प्रश्नकर्ता अन्य विद्यार्थ्यांपैकी कोणालाही जमीन, आकाश, पाणी यापैकी एकच विचारेल. उदा. जमीन. त्यावेळी
उत्तरकर्ता विद्यार्थ्याने जमिनीवरील कोणत्याही गोष्टीचे नाव सांगावे.
जर या तीन नांवाशिवाय अग्नि' असे विचारले तर कोणतेच उत्तर देऊ
नये.
चुकीचे उत्तर देणारा विद्यार्थी बाद होईल.
निर्णय शेवटपर्यंत अचूक उत्तर देणारा विद्यार्थी विजयी होईल.
8) खेळाचे नाव - . भूऽर्रऽ
वर्गरचना -
वर्गात बसल्या जागेवर, सभागृहात, मैदानात गोलात.
खेळाचे वर्णन
राज्य असणारा विद्यार्थी कोणतेही एक नाव घेऊन भूऽऽम्हणेल.
यात उडणाऱ्या पक्ष्याचे नाव येईल तेव्हाच भूऽर्र म्हणावे. (उदा. भूऽर्रऽ कावळा भूऽर्रऽ पोपट भूऽऽ) यावेळी विद्यार्थ्यांनी तोंडाने भूऽर्रऽऽ म्हणताना हाताचे दोन्ही तळवे वरती न्यावेत.
याशिवाय अन्य नावाच्या वेळी भूऽर्रऽ म्हणणारे विद्यार्थी बाद होतील.
निर्णय - शेवटपर्यंत राहणारा विद्यार्थी " एकाग्रचित्ती म्हणून त्याचा गौरव करावा.
No comments:
Post a Comment