Studyfromhome.com Blog content is created for Primary Education Development.

Breaking

abhyas majha इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image

abhyas majha  इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image
Click On Image

Search This Blog

Tuesday 23 March 2021

शालेय खेळ - गोलातील खेळ - भाग 2 - School Game Part 2

 शालेय खेळ - गोलातील खेळ - भाग 2 - School Game Part 2  

३. खेळाचे नाव घाणेरडा माणूस.

वर्गरचना 

सर्वाना गोलात उभे करावे. एकावर राज्य द्यावे.

खेळाचे वर्णन - 

सर्व विद्यार्थी गोल करून आतमध्ये तोंड करून उभे राहतील.

एका विद्यार्थ्यावर राज्य द्यावे. राज्य असणारा विद्यार्थी वर्तुळातील उभ्या असणाऱ्या विद्यार्थ्यासमोर जाऊन उभा राहील. त्यावेळी वर्तुळातील विद्यार्थी नाबाद राहण्यासाठी आपला कोणताही एक पाय डावा उजवा वरती उचलून त्याच्या खालून हात घालून नाक पकडून उभा राहील. नाक पकडण्यापूर्वी जर राज्य असणारा विद्यार्थी त्याला शिवला तर तो विद्यार्थी बाद होऊन त्याच्यावर राज्य दिले जाईल. 

बाद झालेला खेळाडू विद्यार्थी ' राज्य ' घेईल.


४. खेळाचे नाव- राम राम पावणं.

वर्गरचना - 

हात धरून मोठा गोल करा.

खेळाचे वर्णन - 

सर्व विद्यार्थी मोठा गोल करून आत तोंड करून उभे राहतील. एका विद्यार्थ्यांवर राज्य द्यावे. तो गोलाच्या बाहेरून धावत असताना कोणत्याही एका विद्यार्थ्याच्या पाठीवर थाप मारील. तो विद्यार्थी विरुद्ध बाजूने धावू लागेल. जेव्हा हे दोघे एकत्र भेटतील त्यावेळी राम-राम पावणं म्हणून एकमेकांना नमस्कार करतील आणि दोघेही मोकळ्या जागेवर जाण्याचा प्रयत्न करतील. ज्याला जागा मिळणार नाही तो बाद होईल .याच खेळात राम-राम पावण, नमस्कार, बैठक, जोर, दण्ड यांचाही उपयोग करून घ्यावा.

निर्णय - सर्व नियमाचे पालन करून जो विद्यार्थी मोकळ्या जागेवर जाऊन प्रथम उभा राहील तो विजयो. ज्याला जागा मिळणार नाही त्याचेवर राज्य द्यावे.


५ . खेळाचे नाव-  घरी जा.

साहित्य 

चुना.

वर्गरचना - 

वर्गाला मोठा गोल करून उभे करा. प्रत्येकाला त्याच्या भोवती ठळक पावलाएवढे वर्तुळ काढण्यास सांगा. चुन्याने ते ठळक करा. विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा ४.५ जणाना वर्तुळ काढण्यास सांगू नये.

खेळाचे वर्णन-

मोठा गोल करून उभे राहावे. प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या भोवती छोटासा गोल किंवा चौकोन ठळक आखण्यास सांगावा. हा चौकोन किंवा गोल हे त्या विद्यार्थ्यांचे घर झाले. त्यातील एकावर राज्य द्यावे. त्याचा चौकोन-गोल पुसून टाकावा. हा विद्यार्थी बेघर झाला. तो वर्तुळाच्या बाहेरून धावत असताना घरातील तीन-चार जणांच्या पाठीवर थाप मारेल. ज्यांच्या पाठीवर थाप बसेल ते विद्यार्थी बेघर विद्यार्थ्यामागून धावतील. बेघर विद्यार्थी एका घरात जाऊन "घरी जा" असे सांगेल. त्यानंतर त्याच्या मागून धावणान्या विद्यार्थ्यांनी मोकळया घरात जाऊन. उभे राहावे. ज्याला घर मिळणार नाही तो बेघर. त्याच्यावर राज्य द्यावे.

निर्णय - ज्या विद्यार्थ्यांना घर मिळणार नाही ते बाद होतील. शेवटपर्यंत घर मिळविणारा विद्यार्थी विजयी ठरेल.

No comments:

Post a Comment