Studyfromhome.com Blog content is created for Primary Education Development.

Breaking

abhyas majha इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image

abhyas majha  इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image
Click On Image

Search This Blog

Friday 19 March 2021

शालेय खेळ - बैठे खेळ - भाग 3 - School Game Part 3

शालेय खेळ भाग 3 - School Game Part 3 

10)   खेळाचे नाव - माणूस, वाघ, बंदूक.

वर्गरचना

सर्वाना मोठ्या गोलात नीट उभे करा.

खेळाचे वर्णन 

सर्व विद्यार्थ्यांचा गोल करावा. 

एका विद्यार्थ्यावर राज्य द्यावे.

राज्य घेणाऱ्याने नमस्कार केला की ती खूण माणसाची. 

हाताच्या बोटांनी बंदूक दाखवावी आणि दोन्ही हाताचे पंजे कानाजवळ नेले तर वाघ होईल.

त्यानंतर हा विद्यार्थी गोलातील कोणत्याही विद्यार्थ्यासमोर जाऊन वरील तीनपैकी कोणतीही एक खूण करील. 

गोलातील विद्यार्थी त्याला त्यातील एका खुणेने बरोबर उत्तर देतील 

माणसाच्या नमस्काराला वाघाचे कानाजवळ हात नेऊन ; बंदुकीला माणसाच्या नमस्काराने आणि

वाघाला बंदुकीच्या कृतीन उत्तर द्यावे. 

याप्रमाणे जो उत्तर देऊ शकणार नाही तो विद्यार्थी बाद होईल.

निर्णय - अचूक कृती करणारे विद्यार्थी विजयी ठरवावेत.

11)   खेळाचे नाव -  तळ्यात मळ्यात.

साहित्य

दोरी, चुना, टेप.

वर्गरचना 

वर्गाला ५ मीटर त्रिज्येच्या वर्तुळावर उभे करावे. 

मध्यभागी शिक्षक उभे राहतील.

खेळाचे वर्णन

गोलात सर्व विद्यार्थी कमरेवर हात ठेवून उभे राहतील

शिक्षक सांगतील तळयात की सर्व विद्यार्थी आतमध्ये म्हणजेच पुढे छोटी उडी मारतील. 

मळयात म्हणाले की मागे. 

चुकीचे करणारा विद्यार्थी अर्थातच बाद होईल.

निर्णय - शेवटपर्यंत अचूक काम करणारा विद्यार्थी विजयी.

12)   खेळाचे नाव - खादाड भाऊ.

वर्गरचना - 

मैदानात किंवा सभागृहात गोलात अगर ३- ४ ओळीत किंवा वर्गात बसल्या जागेवरच.

खेळाचे वर्णन - 

शिक्षकाने विद्यार्थ्यांना सोईनुसार उभे करून घ्यावे. 

सर्वाच्या समोर शिक्षक उभे राहतील. 

खाण्याच्या वस्तूचे नाव घेतील. 

त्यानंतर विद्यार्थी " खाणार " असे म्हणतील. 

यावेळी एखादे नाव खाण्याच्या वस्तूचे नसेलही, अशा वेळी जे विद्यार्थी " खाणार " म्हणून ओरडतील

ते विद्यार्थी बाद होतील.

निर्णय - शेवटपर्यंत राहणारा विद्यार्थी "निश्चयी विद्यार्थी" म्हणून घोषित करावा.

No comments:

Post a Comment