निबंध - माझे घर | Essay - My House
माझे घर
माझे घर खुप सुंदर आहे .
या घरात मी, आई, बाबा व माझी ताई राहतो.
माझे घर तीन खोल्यांचे आहे.
पूर्वेकडे तोंड असलेल्या माझ्या घराला दारे, खिडक्या आहेत.
त्यामुळे घरात भरपूर सूर्यप्रकाश व हवा खेळती राहते.
माझ्या घराला पिवळा रंग दिला आहे.
घरासमोर मी एक बाग केली आहे.
या छोट्याशा बागेत गुलाब, जाई-जुई, शेवंती ही फुलझाडे तर निलगिरी, आंबा, बोर, जांभूळ यांची झाडे लावली
आहेत.
माझी आई दिवसभर घरकाम करते.
माझी ताई आईला घरकामात मदत करते.
बाबा दिवसभर शेतात काम करतात.
सुट्टीच्या दिवशी मी आई- बाबांना त्यांच्या कामात मदत करत असतो.
संध्याकाळी आम्ही सर्वजण मिळून जेवण करतो,
आई, बाबा, ताई यांच्या बरोबर रोजचा दिवस आनंदात जातो,
माझे घर मला फार आवडते.
मी कुठे दूरगावी गेलो तरी मला सारखी घराची आठवण येते व कधी आपल्या घरी जातो असे वाटते.
Shital sunil more
ردحذف