Studyfromhome.com Blog content is created for Primary Education Development.

Breaking

abhyas majha इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image

abhyas majha  इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image
Click On Image

بحث هذه المدونة الإلكترونية

الثلاثاء، 6 أبريل 2021

मराठी वाक्प्रचार आणि अर्थ - भाग 1

मराठी वाक्प्रचार आणि अर्थ

अट्टहास करणे - आग्रह धरणे.

अवाक् होणे - आश्चर्यचकित होणे.

अजरामर होणे - कायमस्वरूपी टिकणे.

अनमान करणे-संकोच करणे.

अटकेपार झेंडा लावणे- फार मोठा पराक्रम गाजवणे.

अपूर्व योग येणे - दुर्मिळ योग येणे.

अभिलाषा धरणे- एखाद्या गोष्टीची इच्छा बाळगणे.

अभंग असणे- अखंड असणे.

अमलात आणणे - कारवाई करणे.

अप्रूप वाटणे- आश्चर्य किवा कौतुक वाटणे.

अनभिज्ञ असणे - एखाद्या विषयाचे मुळीच ज्ञान नसणे

अठरा विश्वे दारिद्र्य असणे- पराकोटीचे दारिद्रय असणे

अर्धचंद्र देणे - हकालपट्टी करणे.

अडकित्त्यात सापडणे - पेचात सापडणे.

अत्तराचे दिवे लावणे - भरपूर उधळपट्टी करणे.

अन्नास जागणे - उपकाराची आठवण ठेवणे.

अन्नास मोताद होणे - आत्यंतिक दारिद्र्यात जगणे.

अन्नास लावणे - उपजीविकेचे साधन मिळवून देणे.

अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे- थोड्याशा यशाने चढून जाणे.

अठरा गुणांचा खंडोबा - लबाड माणूस.

आयोजित करणे- सिद्धता करणे.

आखाडे बांधणे- मनात आराखडा किंवा अंदाज करणे..

आवर्जून पाहणे - मुद्दामहून पाहणे.

आकाशाची कुन्हाड - आकस्मिक संकट.

आकांडतांडव करणे-रागाने आदळआपट करणे.

आकाश ठेंगणे होणे - अतिशय आनंद होणे.

आड येणे- अडथळा निर्माण करणे.

आकाश पाताळ एक करणे- फार मोठ्याने  आरडाओरड करून थैमान घालणे.

आकाश फाटणे- चारी बाजूंनी संकटे येणे.

आकाशाला गवसणी घालणे- आवाक्याबाहेरची गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे.

आगीत तेल ओतणे-भांडण किंवा वाद विकोपाला जाईल असे करणे.

आच लागणे-झळ लागणे.

आपल्या पोळीवर तूप ओढणे - साधेल तेवढा स्वतःचाच फायदा करून घेणे-

आभाळ कोसळणे - एकाएकी फार मोठे संकट येणे.

ليست هناك تعليقات:

إرسال تعليق