■ शिवपूर्वकालीन महाराष्ट्र
खालील ठळक मुद्द्यांचे काळजीपूर्वक वाचन करा
◆ शिवपूर्वकालीन महाराष्ट्र मध्ये पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच इत्यादी सत्तामधील सागरी स्पर्धा तीव्र होत गेल्या होत्या.त्यांनी पश्चिम किनारपट्टीवरील गोव्यात आणि वसईमध्ये राज्य स्थापन केले.
महाराष्ट्र मध्ये सुद्धा अस्थिरता आणि असुरक्षितता या कारणामुळे निर्माण झाली होती.
युरोपातील या वेगवेगळ्या लोकांना त्यांच्या शिरस्त्राणावरून टोपकर असे म्हटले जायचे.
◆ शिवपूर्वकाळात लोकवस्ती, प्रजा, राज्यकर्ते यांच्यामधील दुवा म्हणून कार्य करणारे अधिकारी, बाजारपेठा, कारागीर यांचे स्वरूप समजण्यासाठी गाव कसबा आणि परगना असे भौगोलिक स्थान प्रचारात आले.
◆ गाव बहुतेक लोक गावांमध्ये राहत असत.
●गावाला मौजा असे म्हटले जायचे.
पाटील हा त्या गावाचा प्रमुख असे.
लोकांनी जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणावी यासाठी तो प्रयत्न करत असे.
● गावांमध्ये तंटा झाला तर तो शांततेच्या मार्गाने सोडविण्याचा प्रयत्न पाटील करत असे. या कामांमध्ये त्याला कुलकर्णी मदत करत असत. जमिनीचा महसूल जमा करण्याचे काम कुलकर्णी करत असे.
●गावात कारागीर जी सेवा देत असतात त्याबद्दल शेतकऱ्याकडून त्यांना शेतीच्या उत्पन्नाचा वाटा मिळत असे या पद्धतीला बलुते पद्धत असे म्हणतात.
◆ कसबा कसबा हे एक मोठे खेडेगाव असायचे. सामान्यत: ते परगण्याची मुख्य ठिकाण मानले जायचे.
उदाहरण -इंदापूर परगणा हा इंदापूर कसबा, वाइ परगणाचे मुख्य ठिकाण वाई कसबा याप्रमाणे
कसबा यामध्ये मुख्य व्यवसाय शेतीचा असायचा. त्याला जोडूनच बाजारपेठ असे.शेटे व महाजन हे पेठेचे वतनदार कारभारी असायचे.
◆ परगणा अनेक गावे मिळून परगणा होत असला तरी सर्व परगण्यातील गावांची संख्या ही एक सारखी नसायची.
●पुणे परगणा हा सर्वात मोठा परगणा होता. या परगण्यात 290 गावे होती. चाकण परगणा मध्ये 64 गावे होती तर शिरवळ परगणा हा सर्वात लहान होता.या परगण्यात 40 गाव होती.
●देशमुख व देशपांडे हे परगण्याचे वतनदार अधिकारी असायचे.देशमुख या परगणा तील पाटलांचा प्रमुख असे.
गाव पातळीवर पाटील जे काम करत असतात तेच काम परगणा पातळीवर देशमुख करत असे. परगण्यातील सर्व कुलकर्णी यांचा प्रमुख देशपांडे असे. गाव पातळीवर कुलकर्णी जे काम करतात तेच काम या पातळीवर देशपांडे करत असायचे.
◆ दुष्काळाचे संकट
शिवपूर्वकालीन महाराष्ट्रामध्ये शेती ही बहुतांशी पावसाच्या पाण्यावर अवलंबून असे. त्यामुळे पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान व्हायचे. लोकांना गावात राहणे कठीण होऊन जाई, लोक गाव सोडायचे. दुष्काळ हे रयतेला सर्वात मोठे संकट वाटत असे.
● महाराष्ट्रात एक मोठा दुष्काळ इसवी सन 1630 मध्ये पडला होता. या दुष्काळाने सर्व लोक हवालदिल झाले. भाकरीच्या तुकड्यासाठी लोक स्वतःला विकून घेण्यास तयार होते पण विकत घेणारा कोणी नव्हता. असे काही वर्णांमध्ये वाचायला मिळते. शेती व्यवसाय या दुष्काळामुळे उद्धवस्त झाला, उद्योगधंदे संपुष्टात आले, लोक देशोधडीला लागले. अशा उध्वस्त झालेल्या लोक जीवनाची घडी बसवणे हे एक मोठे आव्हान होते.
◆वारकरी पंथांचे कार्य अंधश्रद्धा व कर्मकांड यांचा समाजावर जबरदस्त पगडा त्याकाळी होता लोक दैववादाच्या आहारी गेले होते.प्रयत्नशीलता थंडावली होती. रयतेची स्थिती हलाखीची झालेली होती. याच काळामध्ये समाजामध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रातील वारकरी पंथाने कार्य सुरू केले. महाराष्ट्रात संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांच्यापासून संत परंपरा सुरू झाली. ती पुढे संत चोखामेळा, संत गोरोबा, संत सावतामाळी, संत नरहरी, संत सेना संत शेख महंमद इत्यादी संतांनी पुढे चालवली.संत चोखोबांची पत्नी संत सोयराबाई, बहिण संत निर्मळाबाई ,संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा,संत बहिणाबाई शिऊरकर यासारख्या अनेक स्त्रिया संत चळवळीमध्ये कार्य करू लागल्या. या संत चळवळीचे पंढरपूर हे केंद्र होते आणि विठ्ठल हे सर्वांचे दैवत होते.पंढरपुरामध्ये चंद्रभागेच्या काठी ही सर्व मंडळी एकत्र येऊन भक्ती सागरामध्ये नाहून निघायची. किर्तन आणि सहभोजन या माध्यमातून समतेचा प्रसार केला जायचा.
◆संत नामदेव
संत नामदेव हे हे एक श्रेष्ठ संत होते तसेच ते कुशल संघटक होते.सर्व जाती-जमातीतील स्त्री-पुरुषांना एकत्र करून समतेची भावना त्यांनी निर्माण केली." नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी " ही त्यांची एक प्रतिज्ञा होती.त्यांची अभंग रचना प्रसिद्ध आहे. त्यांनी लिहिलेली पदे शिखांच्या गुरुग्रंथसाहिब या ग्रंथांमध्ये समाविष्ट केली आहे.भागवत धर्म गावोगावी पोहोचवण्याचे काम संत नामदेव यांनी केले.पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत चोखामेळा यांची समाधी त्यांनी बांधली हे त्यांचे अविस्मरणीय कार्य आहे.
◆संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर यांनी भगवत गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीमध्ये स्पष्ट करणारा भावार्थदीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला.त्याचबरोबर त्यांनी अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली.त्यांनी आपल्या अभंगातून भक्तिमार्गाचे महत्त्व सांगितले.प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगावे लागले असूनही त्यांनी आपल्या मनाचे संतुलन ढळू दिले नाही आणि कोणताही कटुता बाळगली नाही. ज्ञानेश्वरी मधील पसायदान हे उदात्त संस्कार करणारे आहे.संत ज्ञानेश्वरांचे बंधू संत निवृत्तीनाथ व संत सोपानदेव आणि भगिनी मुक्ताबाई यांच्या काव्य रचना सुद्धा प्रसिद्ध आहेत.
◆संत एकनाथ
महाराष्ट्रामध्ये भक्ती चळवळीमध्ये संत एकनाथांचे स्थान सुद्धा मोलाचे आहे.त्यांनी अभंग, गौळणी ,भारुडे इत्यादी संत रचना केल्या. भागवत धर्माची मांडणी सोपी आणि सविस्तर केली.भावार्थ रामायणात राम कथेच्या निमित्ताने लोकजीवनाचे चित्र संत एकनाथ यांनी रेखाटले. परमार्थ प्राप्ती साठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही हे त्यांनी स्वतःच्या आचरणातून दाखवून दिले. आपली मराठी भाषा कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही असे ते मानत." संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासून आली" असे त्यांनी संस्कृत पंडितांना मराठी भाषेचे महत्व समजावताना ठणकावून सांगितले.त्यांनी इतर धर्माचा तिरस्कार करणाऱ्यावर कडक शब्दांमध्ये टीका केली आहे.
◆ संत तुकाराम
पुण्याजवळ देहू या गावांमध्ये संत तुकाराम यांचे वास्तव्य होते.त्यांच्या अभंगांना श्रेष्ठ कवित्वाची उंची लाभली आहे. संत तुकारामांची गाथा ही मराठी भाषेचा एक अनमोल ठेवा मानला जातो.रंजल्या गांजल्या मध्ये देवत्व पाहण्यास सांगताना ते म्हणतात "जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले ।तोचि साधु ओळखावा। देव तेथेची जाणावा।। अशा उदात्त दृष्टिकोनातून त्यांनी लोकांना संदेश दिला.आपल्याकडे असलेली लोकांना दिलेल्या कर्जाची कागदपत्रे इंद्रायणी नदीच्या डोहात त्यांनी बुडवली आणि कित्येक कुटुंबांना कर्जमुक्त केले.भक्तीला नीतीची जोड देण्यावर त्यांचा भर होता. "जोडूनिया धन उत्तम व्यवहारे।उदास विचारे वेच करी या शिकवणी मधून त्यांचे सार सांगता येईल. संत तुकारामांचे शिष्य आणि सहकारी विविध जाती जमातीचे होते. नावजी माळी, गवनरशेट वाणी, संताजी जगनाडे ,शिवबा कासार ,बहिणाबाई शिरूरकर ही त्यातली काही नावे.
◆संत सावता माळी
"कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी" असे संत सावतामाळी यांनी यांनी शेतीच्या कामासंदर्भात केली असली तरी संताच्या दैनंदिन कामांनाही लागू पडते.
◆ रामदास स्वामी
रामदास स्वामी हे मराठवाड्यातील जांब या गावचे होते. त्यांनी बलोपासना चे महत्व समजावले. "मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्रधर्म वाढवावा" हा संदेश त्यांनी दिला.त्यांनी दासबोध हा ग्रंथ लिहिला.
No comments:
Post a Comment