बोधकथा - तीन तत्त्वे
एकदा एका शेतकऱ्याने रात्री बुलबुल पक्ष्यांचे गाणे ऐकले. त्याला ते फार आवडल्यामुळे दुसऱ्या दिवशी फासा लावून त्याने बुलबुलला पकडले. त्याला हातात धरून तो म्हणाला, 'बरा चांगला सापडलास. आता पिंजऱ्यात राहून रोज माझ्यासाठी गाणे म्हण.
'बुलबुल म्हणाला, 'पण आम्ही पिंजऱ्यात राहून कधीच गाऊ शकत नाही आणि मला पिंजऱ्यात टाकलंस तर मी झुरून झुरून मरून जाईन. मग तुला माझे गाणेच ऐकायला मिळणार नाही.
शेतकऱ्याने थोडा वेळ विचार करून म्हटले, 'मग मी तुझा आज खिमाच करतो. असं म्हणतात की, बुलबुलचा खिमा फार चवीला असतो.' यावर बुलबुल गयावया करून म्हणतो, 'तू जर मला सोडून दिलेस तर मी तुला तीन महत्त्वाची तत्त्वे सांगतो, जी मला एका ऋषींनी सांगितली आहेस.' हे ऐकून कुतूहल वाटून शेतकऱ्याने त्या बुलबुल पक्षाला सोडून दिले. तोही आनंदाने शेजारच्या झाडावर बसला आणि त्या शेतकऱ्याला म्हणाला, 'आता ऐक.
पहिलं तत्त्व म्हणजे बंदिवानाच्या वचनावर कधीही विश्वास ठेवू नये. दुसरं तत्त्व म्हणजे जे आपल्या, हातात असेल ते चांगलं सांभाळून ठेवावे आणि तिसरं म्हणजे जे आपल्या हातून गेलं असेल त्याबद्दल उगीच शोक करीत बसू नये.
तात्पर्य : गेलेल्या वाईट संधीबद्दल शोक करत बसू नये.
No comments:
Post a Comment