बोधकथा - संकल्प
जनरल रोमेल म्हणजे साक्षात निर्भयतेची प्रतिकृती. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीचा तो फिल्ड मार्शल होता. एक कट्टर योद्धा असूनही मानवतावादी आणि दयाळू अशी त्याची ख्याती होती.
त्याच्या नेतृत्वाखाली झालेल्या युद्धात शत्रूवर नाहक अत्याचार कधी झाले नाहीत. तो अतिशय धाडसी होता. कोणतेही आव्हान स्वीकारायला तो नेहमी तयार असे. त्यांच्याच जीवनातील ही कथा.
लहानगा रोमेल एका डोंगरासमोर उभा होता. त्याचा मित्र त्याला म्हणाला, 'तू एका तासात या डोंगरावर जाऊन परत येशील तर मी तुला माझी सायकल बक्षीस देईन.' रोमेलला सायकलीपेक्षाही ते आव्हान आवडले. तो भराभर डोंगर चढायला लागला. परतला तेव्हा हातावर जखमा होत्या.
घड्याळात ५२ मिनिटे झाली होती. त्याचे सारे हात-पाय काट्यांनी रक्तबंबाळ झाले होते. मित्राने त्याचे अभिनंदन करून म्हटले, 'धाडसाने एखादे काम तडीला कसं न्यावं हे मी आज तुझ्याकडून "शिकलो.' रोमेल म्हणाला, 'कोणतीही गोष्ट कबूल करण्यापूर्वी त्याचा आधी विचार करावा, हे मी आज शिकलो.'
तात्पर्य : संकल्प केला की कितीही अडचणी आल्या तरी तो शेवटास नेणे महत्त्वाचे.
No comments:
Post a Comment