शालेय खेळ - बैठे खेळ - भाग 4 - School Game Part 4
१2. खेळाचे वर्णन - जागेवर वस्तू ठेवा.
साहित्य -
रुमाल, दगड, डंबेल्स, लेझीम,चुना वगैरे.
वर्गरचना - हात धरून मोठा गोल करून उभे करावे.
खेळाचे वर्णन - सोईनुसार विद्यार्थ्यांची रचना करून घ्या. एका जागेवर छोटे वर्तुळ काढा. त्यापासून विद्यार्थ्यांना आपल्या जागेपर्यंतचे पावलाने अंतर मोजून घेण्यास सांगा. नंतर एका विद्यार्थ्यांचे डोळे रुमालाने बांधून त्याच्या हातात एक छोटा दगड, रुमालासारखी वस्तू द्या. ती वस्तू त्याने मोजलेल्या पावलाइतक्या अंतरापर्यंत चालत जाऊन बरोबर आखलेल्या वर्तुळात ठेवण्याचा प्रयत्न करावा. जो बरोबर वर्तुळात दिलेली वस्तू ठेवील तो विद्यार्थी विजयी.
निर्णय - अचूक कृती करणाऱ्याचा योग्य 'अंदाज वीर' म्हणून गौरव करा.
१3 . खेळाचे नाव - जपून न्या.
साहित्य - दगड, बटाटा, डंबेल्स, यासारख्या वस्तू.
वर्गरचना - विद्यार्थ्यांना गोलात नीट उभे करावे. हात समोर तळवे जमिनीकडे अशा स्थितीत.
खेळाचे वर्णन - विद्यार्थी गोलात उभे राहतील. हात समोर तळवे जमिनीकडे एका विद्यार्थ्याच्या हातावर दगड, बटाटा सारखी एखादी वस्तू ठेवावी. त्याने ती वस्तू खाली न पाडता पुढील विद्यार्थ्याच्या हातावर अलगद ठेवावी. ज्याच्या हातातून ती वस्तू पडेल तो विद्यार्थी बाद होईल.
निर्णय - हातावरील वस्तू न पाडता देणारा विद्यार्थी ‘कुशल खेळाडू' म्हणून गौरवावा.
१4 . खेळाचे नाव - गुप्त संदेश सांगा.
वर्गरचना - वर्गात बसल्या जागी सभागृहात, मैदानात हात धरून मोठ्या गोलात.
खेळाचे वर्णन - विद्यार्थ्यांना गोलात उभे करा. एका विद्यार्थ्याच्या कानात शिक्षक एक वाक्य सांगतील. त्या विद्यार्थ्याने तेच वाक्य पुढील विद्यार्थ्याच्या कानांत सांगावे, असे शेवटपर्यंत करावे. शेवटच्या विद्यार्थ्यान निरोप मिळाला की ते वाक्य मोठयाने सांगावे. बरोबर वाक्य नंतर शिक्षक सांगतील.
निर्णय - ज्या विद्यार्थ्याने योग्य संदेश ऐकून पुढच्या विद्यार्थ्याला सांगितला अशाची चौकशी करून टाळ्या वाजवून गौरव करावा.
१५. खेळाचे नाव पत्रावर शिक्का मारा.
वर्गरचना - वर्गाला हात धरून मोठा गोल करण्यास सांगा. प्रत्येकाल त्याच्या गावाचे नाव सांगण्यास सांगा.
खेळाचे वर्णन - प्रथम सर्व विद्यार्थ्यांना भारतातील किंवा मोठ्या शहरांची नावे सांगण्यास सांगावीत. जे नाव जो विद्यार्थी सांगेल ते त्याचे गाव झाले. नंतर शिक्षक एका विद्यार्थ्याला मधे बोलावतील तो पत्र होईल. शिक्षक सांगितलेल्या नावापैकी कोणत्याही एका गावाचे नाव घेतील. त्यानंतर " पत्र झालेल्या" विद्यार्थ्यांने ते नाव असणान्या विद्यार्थ्यासमोर जाऊन उभे राहावे. जर ते नाव त्याचे नसेल तर त्याने पत्रावर शिक्का म्हणजेच पाठीत बुक्का शिक्क्यासारखा मारून पुढे जा म्हणावे. असे तीन वेळा करण्याची संधी पत्राला द्यावी.
निर्णय- अचूक जागेवर जाणाऱ्या विद्यार्थ्याच्या नावाएवढया टाळ्या वाजवून गौरव करा.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق