शालेय खेळ - गोलातील खेळ - भाग 1 - School Game Part 1
गोलातील खेळ
१ . खेळाचे नाव-खो खो (जोडीदारासह)
वर्गरचना-
विद्याथ्र्याचा हात धरून गोल करा. त्यांच्या एकापुढे एक अशा जोड्या करा. एका विद्यार्थ्याला धावण्यास सांगा. दुसऱ्याला त्याला पकडण्यास सांगा.
खेळाचे वर्णन-
सर्व विद्यार्थी जोडीने एकामागे एक असे गोलात उभे राहतील.
दोन वर्तुळे होतील. एका जोडीतील एका विद्यार्थ्याला शिवायला सांगावे व दुसऱ्यास पळण्यास.
पळणारा विद्यार्थी गोलातील कोणत्याही एका जोडीसमोर उभा राहून टाळी वाजवेल.
त्याच्या पाठीमागील गोलातील विद्यार्थी धावेल.
ज्याला टाळी वाजवून खो मिळाला असेल तो पाठीमागे जाऊन उभा राहील.
धावणारा विद्यार्थी टाळी वाजवल्यावर त्याच वेळी तोंडाने खो असेही म्हणेल.
निर्णय - पकडणान्याने धावणा-यास शिवले तर तो बाद होईल. नंतर पकडणारा धावेल. बाद होणारा त्याला पकडेल. त्यानंतर दुसऱ्या जोडीला संधी द्यावी.
२. खेळाचे नाव - खो खो (जोडीदाराचा हात धरून खो.)
वर्गरचना -
सर्व विद्यार्थ्यांना आपल्या जोडीदाराचा हात धरून वर्तुळात उभे करावे. एकास धावण्यास व दुसऱ्यास शिवण्यास सांगावे.
खेळाचे वर्णन -
जोडीदाराचा हात धरून खो. सर्व विद्यार्थी हात धरून वर्तुळात उभे राहतील. एका जोडीतील एका विद्यार्थ्याला धावण्यास सांगावे. दुसऱ्यास पकडण्यास, धावणारा विद्यार्थी हात धरून उभे असलेल्या विद्यार्थ्याचा हात धरेल त्याच वेळी तोंडाने खो म्हणेल. त्यानंतर डाव्या किंवा उजव्या बाजूकडील विद्यार्थी धावेल,
निर्णय - बाद झाल्यावर उलट जोडी करा. नंतर नवीन जोडीवर राज्य द्यावे.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق