Studyfromhome.com Blog content is created for Primary Education Development.

Breaking

abhyas majha इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image

abhyas majha  इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image
Click On Image

Search This Blog

Friday, 2 October 2020

महाराष्ट्र भूस्तर

 महाराष्ट्र- भूस्तर रचना

भू-शास्त्रीयदृष्ट्या महाराष्ट्र हा भारतीय द्वीपकल्पीय पठाराचाच एक भाग आहे महाराष्ट्राचा ९० टेक्के भू-धाग लाव्हारसापासून तयार झालेल्या (अग्निजन्य) 'बेसॉल्ट खडकांपासून बनलेला आहे. दख्खनच्या पठाराच्या निर्मितीची क्रिया सुमारे १४ कोटीवर्षापूर्वी सुरू झाली. त्यानंतर दीर्घकाळ ही क्रिया चालूच राहिली. त्यामुळे राज्यात लाव्हारसाचे एकावर एक अनेक थर दिसून येतात. हाच लाव्हारस थंड होऊन त्याच्यापासून बेसॉल्ट खडकांची निर्मिती झाली. बेसॉल्टपासून बनलेल्या या पठारी प्रदेशाच्या तळभागात आर्कियन प्रणालीतील खडक आहेत. राज्यात जसजसे पूर्वेकडे जावे तसतशी बेसॉल्ट थरांची जाडी कमी कमी होत जाऊन नागपूर, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात बेसॉल्टच्या थराखाली असलेले आर्कियन, धारवाड, कडप्पा आणि विंध्य प्रणालीतील खडक उघडे पड़लेले दिसून येतात. थोडक्यात, या भागात बेसॉल्टचा थर पातळ व विरळ होत जाऊन जवळ जवळ नाहीसा झालेला आढळतो.

       दक्षिण कोकणात, विशेषतः सिंधुदुर्ग जिल्हयात वरचे बेसॉल्टचे थर खनन क्रियेने निघुन गेल्याने खालचे वालुकाश्म आणि गारगोटीचे खडक भू-पृष्ठालगत उघडे पडलेले दिसतात.

चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यांतील कोळशाचे साठे प्राचीन गोंडवन श्रेणीच्या खडकांत सापडतात.आपण वर पाहिल्याच्या अगदी उलट म्हणजे जसजसे पूर्वेकडून पश्चिमेकडे जावे तसतशी बेसॉल्टच्या थरांची जाडी वाढत जाऊन सह्याद्री पर्वतात ही जाडी सर्वांत जास्त म्हणजे सुमारे २,२०० मीटर इतकी झाल्याचे दिसून येते.

  सह्याद्रीत महाबळेश्वाच्या दक्षिणेस तसेच दक्षिणकोकणात डोंगरांच्या माध्यांवर जांभा खडकांचे थर कवचाच्या स्वरूपात आढळतात. राज्यात नद्यांच्या खोऱ्यांत आणि खाड्यांच्या काठांवर वाहून आलेल्या गाळाचे थर आढळतात.याव्यतिरिक्त महाराष्ट्राच्याभूस्तर-रचनेत विशेष अशी विविधता दिसून येत नाही.


महाराष्ट्र- प्राकृतिक रचना

भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर-पश्चिम भागात वसलेला महाराष्ट्र हा प्राकृतिकदृष्टया बहुतांशी पठारी प्रदेश आहे. राज्यातून कोकण किनारपट्टीस समांतर दक्षिणोत्तर गेलेल्या सह्याद्री पर्वत रांगामुळे किंवा पश्चिम घाटरांगांमुळे राज्याचे कोकण आणि देश किंवा पठार असे दोन स्पष्ट भाग पडलेले आहेत. याहून काटेकोरपणे बोलावयाचे तर कोकण, सह-पर्वतरांगा व पठार असे राज्याचे प्राकृतिकदृष्ट्या तीन भाग सांगता येतील.

कोकण किनारपट्टी


उत्तरेकडील बोर्डी-तळासरीपासून दक्षिणेकडील रेडी-बांद्यापर्यंतचा चिंचोळा पट्टा कोकण किनारपट्टीत मोडतो. या पट्ट्यांची उत्तर- दक्षिण लांबी ७०० कि. मी. असून रुंदी सुमारे ५० ते १०० कि. मी. पर्यंत आहे. सह्याद्रीमध्ये उगम पावून पश्चिमेकडे वाहात जाणाऱ्या असंख्य नद्यांनी कोकण पट्टी पिंजून काढली असून या नद्यांच्या दरम्यान लहान-मोठ्या डोंगर रांगा किंवा सह्याद्रीचेच पश्चिमेकडील फाटे-उपफाटे पसरलेले आहेत. याडोंगर रांगांनी जणू कोकण पट्टीतील नद्यांच्या संदर्भात जल-विभाजकाचीच भूमिका बजाविलेली आहे.

उलट दृष्टीने विचार करता कोकण पट्टीचे वर्णन नद्यांनी खणून काढलेला पठारी प्रदेश असे करता येईल. कोकण पट्टीत पसरलेले सहा पर्वताचे हे फाटे-उपफाटे जसजसे किनाऱ्यालगत गेले आहेत तसतशी त्यांची उंची कमी झालेली आहे.कोकणच्या किनार्यावर सागरात घुसलेली भू-शिरे किंवा दोन भू-शिरांच्या दरम्यान पसरलेले सागराचे फाटे असे सर्वसाधारण दृश्य दिसते. 

या सागर फाटयांच्याजमिनीकडीलबाजूस विस्तीर्ण पुळणी किंवा मऊ मातीचे पट्टे- ज्याला आपण सर्वसामान्यतः चौपाटी असे संबोधतो- निर्माण झालेले आहेत. कोकण किनारपट्टी दक्षिणेकडे अधिकाधिक अरुंद होत गेलेली आहे. या उलट उत्तरेकडे ती रुंद होत जाऊन उल्हास नदीच्या खोऱ्यात सर्वाधिक रुंद झालेली आहे. 

कोकण पट्टीचा उत्तरेकडील भाग मुख्यतः बेसॉल्ट प्रकारच्या खडकांनी बनलेला आहे. कोकणच्या दक्षिण भागात विशेषत्वे करून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जांभा प्रकारचा दगड आढळतो.

सहय पर्वत रांगा

सह्याद्रीचे वर्णन महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचा मानंदड याच शब्दात करावे लागेल इतके विशेष स्थान त्यास महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेत आहे. उत्तरेकडे धुळे जिल्ह्यातील नवापूर पासून दक्षिणेकडे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडपर्यंतचा चिंचोळा पट्टा सह्याद्री किंवा पश्चिम घाट प्रदेशात मोडतो. पश्चिम घाट किंवा सह्य पर्वत रांगा दक्षिणेस याहीपलीकडे थेट कन्याकुमारीपर्यंत पसरल्या आहेत, हे या ठिकाणी लक्षात ठेवावे. वर दिलेल्यामाहितीतून राज्यात पसरलेल्या पश्चिम घाट प्रदेशाच्या सीमा आपल्या लक्षात येतात.


महाराष्ट्रातील सह्याद्रीची लांबी सुमारे ८०० कि. मी. असून सरासरी उंची सुमारे ९००मीटर आहे. सह्याद्रीच्या या रांगा कोकण किनारपट्टीला जवळ जवळ समांतर व सुमारे ५० ते १०० कि. मी. अंतरावरून दक्षिणोत्तर गेलेल्या आहेत. सह्याद्रीचे पश्चिम उतार तीव्र असून उभ्या सरळ व कापीव अशा कडयांनी बनले आहेत. त्यामुळे कोकणातून पाहिले असता सह्याद्री प्रचंड उंच भिंतीसारखा व रौद्र स्वरूपाचा वाटतो. 

तळकोकणसारख्या भागातून सह्याद्रीचा माथा १,००० मीटर किंवा त्यापेक्षा अधिक उंचावर आहे. कोकण पट्टी खाली खचल्यामुळे सहायाद्रीचे पश्चिम उतार तीव्र झाल्याचे मानले जाते. त्या तुलनेत सह्याद्रीचे पूर्व उतार मंद असून देशावरून सहयाद्रीकडे पाहिले असता सहाद्री बुटक्या डोंगर रांगांसारखा भासतो. कोकणातून देशावर किंवा पठारावर येण्यासाठी अनेक मार्ग आहे त्यास धाटमार्ग असे संबोधले जाते.

 धळ घाट, माळशेज घाट, बोर घाट, वरथा पध ,कुंभालों घाट, आंबा घाट, फोंडा घाट, अंबोली घाट है सहा पर्वतातील प्रमुख घाट आहेत.

सहयाद्रीच्या धाटमाध्यावर महाबळेश्वर (१,४३८ मीटर) सारखी अनेक पठारे आहेत.राज्याच्या उत्तर भागात सह्याद्रीची उंची जास्त असून याच भागात कळसुवाई (१.६मीटर) हे राज्यातील सर्वोच्च शिखर आहे.


No comments:

Post a Comment