बोधकथा - बाह्यज्ञान-अंतर्ज्ञान
एका देवळात बसलेल्या आंधळ्याला पाहून शाम त्याचा मित्र रामला म्हणाला, तो देवळात बसलेला आंधळा पाहिलास? तो या गावातील विद्वान पंडित आहे, असे म्हणतात.
खरे आहे ते? राम म्हणाला,
होय खरे आहे हे. तो आंधळा जरी असला तरी या गावातील विद्वान आहे.
शाम म्हणाला, मला पटत नाही.
राम म्हणाला, तू विश्वास ठेव अगर नाही ठेव; पण हे खरे आहे.
मग शाम इकडचा तिकडचा विचार न करता सरळ त्या देवळात गेला आणि त्या आंधळ्याबरोबर गप्पा मारू लागला. गप्पांच्या ओघात त्याला समजले की तो जन्मांध आहे.
शामने त्याला विचारले, आपण कशाचं चिंतन करता आहात? आपल्या अभ्यासाचा विषय तरी काय आहे?
यावर तो आंधळा म्हणाला, मी खगोलशास्त्रज्ञ आहे.
शामला हे पटेना. तो त्याच्याशी वाद घालू लागला. अखेर तो आंधळा आपल्या छातीवर हात ठेवीत म्हणाला, वेड्या, ह्या ठिकाणच्या सर्व ग्रहताऱ्यांचे मी निरीक्षण करीत असतो. कळलं? विद्वता ही नेहमी अंतर्ज्ञानातूनच प्रकट होते.
[ तात्पर्य : विद्वत्ता ही बाह्यज्ञानात नसून अंतर्ज्ञान जाणून घेण्यात आहे. ]
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق