बोधकथा - अशक्य गोष्ट
एका वर्गात टीचरनी प्रत्येक विद्यार्थ्याला एक कागद दिला व ज्या गोष्टी आपणाला अशक्य वाटतात, त्यांची यादी करायला सांगितली.
चौथीचा वर्ग होता तो. एकानं लिहिले, मला चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात फेकता येत नाही. दुसऱ्यानं लिहिलं, मला चार अंकी भागाकार येत नाही. एका मुलीनं लिहिले, मी सुप्रियासारखे चित्र काढू शकत नाही. तर दुसऱ्या मुलीनं लिहिलं, मला बाईंसारखे नटता येत नाही. सर्व मुलांनी अशी यादी केली.
काही वेळांनी टीचरनी ते कागद न वाचताच एकत्र केले व त्या म्हणाल्या, मुलांनो, आपण आता या अशक्य गोष्टींची होळी करू. त्यांनी ते कागद पेटवून दिले. त्यांनी मुलांना विचारले, आपण आता काय केले? मुले म्हणाली, अशक्य गोष्टींची होळी केली.
टीचर म्हणाल्या, ज्या गोष्टी आपल्याला जमत नाहीत, त्या. जळून खाक झाल्या. आता त्यांची आठवणही नको. आता आपण मी ज्या ज्या अशक्य गोष्टी आहेत त्या करु शकेन, असा विचार पक्का मनात करू, म्हणजे आपण कोणत्याही विषयात, कलेमध्ये मागे राहणार नाही. यश नक्कीच मिळेल.
(तात्पर्य : प्रत्येकाने जगताना असा नकारात्मक दृष्टिकोन काढून
टाकून सकारात्मक दृष्टिकोन बाळगायला हवा.)
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق