हातचे सोडून पळत्याच्या मागे...
एक कोल्हा होता. पात्रता नसताना त्याला आपण कोणीतरी खूप मोठे आहोत, असे वाटे; पण प्रसंगी ते सारे नाटक गळून पडे स्वत:विषयी मोठेपणाच्या कल्पना बाळगणाऱ्या व्यक्तींसारखाच तो कोल्हा होता.
एका सकाळी तो असाच उठला, गुहेबाहेर आला आणि सहज त्याचे लक्ष पश्चिमेकडे गेले. त्याची स्वत:ची सावली लांबच लांब पडलेली त्याला दिसली. त्या लांबच लांब सावलीला पाहून त्याला वाटले, आपण इतके मोठे झालो, आता आपणाला खायला मोठे काळवीटच हवे. असा विचार करून त्याने दिवसभर काळविटाचा शोध घेतला. ससा दोन वेळा त्याच्यापुढून गेला; पण त्याने त्याच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही.
दुपार झालीतरी काळवीट मिळेना. भुकेने तो कासावीस झाला. सहज त्याने आपली सावली पाहिली तर जेमतेम एक फूट त्याला वास्तवाचे भान आले आणि तो सशाच्या पाठी लागला; पण ससा तोपर्यंत सावध झाला होता. तो आपल्या बिळातून बाहेरच आला नाही.
[ तात्पर्य : भलत्याच मोठेपणाच्या कल्पना बाळगणान्याला वास्तवाचे चटके कधीतरी कधी तरी बसतातच. ]
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق