निबंध - घड्याळ | Essay - Watch
घड्याळघड्याळ ही आज अत्यंत महत्वाची वस्तु झाली आहे .
आज सारे जग घड्याळाप्रमाणे चालले आहे.
प्रत्येक कामाची वेळ ठरलेली आहे.
माणसाचे वेळच्या वेळी काम, निसर्गाचे वेळच्या वेळी काम हाच नियम आहे.
म्हणून मानवाच्या जीवनात घड्याळाला फार महत्त्व प्राप्त झाले आहे.
घड्याळ ही अनेक प्रकारची व आकारांची असतात.
हातात बांधावयाची, भिंतीवरची, मनोऱ्यावर लावायची टेबलावर ठेवण्याची अशा विविध प्रकारची घड्याळे सध्या बाजारात आहेत.
घड्याळे वेळ तर दाखवतेच परंतु काही घड्याळे आपणास हव्या त्या वेळी गजर करुन झोपेतून उठवतात.
जगात अनेक नमुन्याची घड्याळे आहेत.
माणूस घड्याळाकडे पाहून चालत आहे.
एका कामाची वेळ चुकली तर पुढची कामे बिघडतात.
आता सर्व कामाचे वेळापत्रक ठरवून चालले पाहिजे.
घड्याळ हे अलंकार नसून उपयोगी वस्तू आहे म्हणून आता प्रत्येकाजवळ घड्याळ असलेच पाहिजे.
सर्वांनी घड्याळाप्रमाणे चालले पाहिजे.
घड्याळ हे आयुष्याचे नियोजन आहे .
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق