निबंध - भूकंप | Essay - Earthquake
भूकंप
भूकंप हे एक नैसर्गिक संकट आहे .
भूकंप म्हणजे जमीन कंप पावणे, जमीन हादरणे, आपल्या पायाखालची जमीन हालणे किंवा सरकल्यासारखी वाटणे.
त्यामुळे खाली पडल्यासारखे, चक्कर आल्यासारखे, अचानक घसरल्यासारखे वाटते.
म्हणून माणूस भीतीने घाबरतो.
भूकंप एकदम होत असल्याने आपण आपल्या कामात, घरात किंवा झोपेत असतो.
त्यामुळे भूकंपाचा धक्का माणसाला, मनाला किंवा शरीराला अचानक मोठा धक्का देतो.
प्राणहानी किंवा आर्थिक नुकसान होते.
भूकंपा मुळे उंच इमारती जमीनदोस्त होतात .
भूकंप झाला की खुप नुकसान होते .
भूकंपाची सुचना मिळाली किंवा जाणीव झाली की आपण मोकळ्या जागी थांबावे .
आलेल्या नैसर्गिक संकटाला शांततेने तोंड देणे हे कौटुंबिक कर्तव्य व समाजकार्य आहे.
भूकंपाचा दोष कोणाचाच नाही व त्याचे भविष्यही सांगता येत नाही.
महाराष्ट्राचे व देशाचे भूकंप शास्त्रीयदृष्ट्या समतोल व सखोल सर्व्हेक्षण करुन जिल्हावार नकाशे
प्रसिद्ध केल्यास त्याची माहिती शिक्षणात समाविष्ट केल्यास व्यवहारात उपयोगी ठरेल.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق