निबंध -रेडिओ | Essay - Radio
रेडिओ पूर्वी सर्व घरात असायचा .
आता रेडिओ फार कमी लोक वापरतात .
रेडिओवर अतिशय सुंदर सुंदर कार्यक्रम ऐकता येतात .
रेडिओचा शोध मार्कोनी या शास्त्रज्ञाने लावला.
सार्या जगात रेडिओचा प्रसार झाला आहे.
ज्या घरात रेडिओ नाही त्यांना करमत नाही.
रेडिओवर बातम्या, गाणी, भजने, भाषण, संगीत ऐकावयास मिळतात.
शाळेतील सर्व विषयांचे अभ्यासाचे पाठ होतात.
शेतीविषयक महत्त्वाची माहिती, अनेक प्रकारचे शास्त्रीय ज्ञान रेडिओव्दारा आपणास मिळते.
रेडिओ ज्ञान मिळण्याचे मोठे साधन आहे.
तसेच मनोरंजनाचेही साधन आहे.
रेडिओ जगातील महत्त्वाची गरज आहे.
आजकाल अनेक आकारांचे सुंदर रेडिओ बाजारात मिळतात.
पण ते बनविण्याचे तंत्र एकच असते.
रेडिओ वरील ज्ञान व मनोरंजनाचे कार्यक्रम मुलांनी रोज ऐकावेत.
सर्व जगातील बातम्या घरी बसून ऐकायला मिळतात.
रेडिओमुळे सारे जग एक झाले आहे.
रेडिओला आकाशवाणी असे सुध्हा म्हणतात .
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق