निबंध -फूलबाग | Essay - flower Garden
फूलबाग
मला फुले खुप आवडतात .
फुलांकडे बघून मन प्रसन्न होते .
माझ्या घरी परसात मी एक फुलबाग केली आहे.
बागेत अनेक फुलझाडे लावली आहेत.
गुलाब, शेवंती, मोगरा, जाई, जुई, झेंडु, झेनिया, डेलिया ही झाडे लावली आहेत,
काही पाने रंगीत पानांची शोभेची आहेत.
काकडी,भोपळा, कारले, पडवळ, घोसाळी, तोंडले यांच्या वेली आहेत.
त्याचरोबर वांगी, भेंडी, मिरची, टोमॅटो या फळभाज्या आणि मेथी, कोथिंबीर, आंबडचुका, शेपू, पालक या पालेभाज्या पण माझ्या परस बागेत लावल्या आहेत.
माझ्या या बागेमुळे आम्हाला कधीही फुले किंवा भाजीपाला विकत घ्यावा लागत नाही.
बागेमुळे अनेक पक्षी फुलासारखे घरी येतात त्यामुळे घराची शोभा आणखी वाढते.
माझा रिकामा वेळ बागेला पाणी देणे, पालापाचोळा काढून टाकणे यात जातो.
बागेतील फुला-फळांना, झाडांना, वेलींना हितगुज करण्यात एक वेगळाच आनंद मिळतो.
मन प्रसन्न होते.
बागकाम एक चांगला व फायद्याचा छंद आहे.
,
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق