निबंध - बाजार | Essay - Bazar the Market
बाजार
आमच्या गावाचा बाजार दर रविवारी भरतो.
रविवारी आम्हाला सुट्टी असते.
प्रत्येक गावात बाजार भरत नाही शेजारी असलेल्या मोठ्या गावी बरेच बाजार भरतात.
आठवडाभर लागणारे धान्य, भाजीपाला व इतर वस्तू लोक बाजारात खरेदी करतात.
जवळच्या गावांहून अनेक लहान लहान व्यापारी आपला माल घेऊन विकण्यास येतात.
बाजाराच्या एका भागात भाजीपाला विक्रीस येतो.
यामध्ये कांदे, वांगी, मिरची, कोबी, टोमॅटो, बटाटे, भेंडी, काकडी, मेथी, पालक, शेपू इत्यादी ताज्या भाज्या विक्रीला ठेवलेल्या असतात.
भाजीपाला भागालगत केळी, मोसंबी, आंबा, सफरचंद, चिकू, फणस, पेरु, सीताफळ वगैरे फळांची
दुकाने सजलेली आहेत.
मिठाईची दुकाने मुलांना फार आवडतात.
त्याला लागून कपड्यांची दुकाने मांडलेली असतात.
एका बाजूस ज्वारी, गहुँ, तांदुळ, डाळी वगैरे असतात.
तर किराणा व मसाल्याची दुकानेही येतात.
बाजारामुळे लोकांच्या गरजा भागतात.
ग्रामीण भागासाठी बाजाराचा दिवस फार महत्वाचा असतो .
आम्ही मुले सुद्धा कधीकधी शालेय साहित्य घेण्यासाठी बाजारात जात असतो .
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق