Studyfromhome.com Blog content is created for Primary Education Development.

Breaking

abhyas majha इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image

abhyas majha  इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image
Click On Image

Search This Blog

Sunday, 6 June 2021

June 06, 2021

बोधकथा - स्वतःला जाणा - Moral Story

बोधकथा - स्वतःला जाणा - Moral Story

विवेकानंदांचे भारतभ्रमण सुरू होते. सत्याचा शोध घेत ते फिरत होते. एका रात्री नदी पोहून ते पलीकडच्या काठावरील महर्षी देवेंद्रनाथांच्या आश्रमात गेले. ध्यानस्थ बसलेल्या महर्षीना त्यांनी विचारले, ईश्वर आहे की नाही, हे मला जाणून घ्यायचे आहे. अर्ध्या रात्री येऊन हा प्रश्न विचारणारा तो युवक पाहून महर्षीसुद्धा घाबरले.



महर्षी त्या तरुणाला म्हणजे विवेकानंदांना म्हणाले, मुला तू खाली बैस. मग निवांत बोलू एवढे ऐकताच विवेकानंद त्यांना म्हणाले, आपल्याकडून काहीही मिळणार नाही. मी निघतो. दोन महिन्यानंतर हाच प्रश्न त्यांनी रामकृष्ण परमहंसांना विचारला. रामकृष्ण म्हणाले, तुला खरंच जाणून घ्यायचं असेल तर बोल. देव आहे किंवा नाही, याची चिंता सोडून दे. तुला जाणायचं आहे की नाही, एवढंच सांग. 


विवेकानंद पहिल्यांदाच विचारात पडले. आतापर्यंत मी लोकांना पकडत होतो. मी आत्तापर्यंत विचारच केला नव्हता की माझी जाणून घ्यायची तयारी आहे किंवा नाही. रामकृष्णांजवळ अनुभव होता. फक्त शब्द नव्हते. अनुभवाजवळ टाळाटाळ नसते. संदिग्धता नसते, काहीही शंका नसतात. असे ज्ञान नेहमी आतून येते.



तात्पर्य : स्वत:ला जाणून घ्यायची इच्छा हवी. असं मिळवलेले ज्ञान आतून येते. ते कोणालाही हिरावून घेता येत नाही.

June 06, 2021

बोधकथा - मृगजळ - Moral Story

 बोधकथा - मृगजळ - Moral Story

आकाशातील ढगाचा हेवा वाटून त्याच्या प्राप्तीसाठी एका चिमणीने उड्डाण केले. ती वर वर जाऊ लागली. ती ढगाजवळ पोहोचणार, इतक्यात ढगाने आपली दिशा बदलली. चिमणी त्याच्याकडे जाऊ लागली. ती जवळ येताच ढग अंतर्धान पावला. त्याच्या शोधात चिमणी पुन्हा भटकू लागली. खूप दूरवर तिला तो ढग दिसला. त्याचे वेगवेगळे भाग पडले होते. कोणता भाग पकडावा या विचारात ती भटकू लागली.



इतका वेळ उडत राहिल्याने तिचे शरीर थकले. तरीही ती प्रयत्न सोडत नव्हती. ढग मिळविण्यासाठीचा तिचा लोभ मात्र काही केल्या  सुटत नव्हता.निकराचा प्रयत्न करून तिने त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर ढगच विरून गेला आणि तिच्या हाती काहीही लागले नाही. 


या धावपळीमुळे तिची दमछाक झाली आणि ती जमिनीवर कोसळली. कोसळल्यावर म्हणाली, मी या ढगाच्या मागे लागूनमाझे आयुष्य  संपवले. मला कसे कळले नाही की ढगाच्या मागे लागले म्हणजे मृगजळाच्यामागे धावण्यासारखा प्रकार आहे.



तात्पर्य : मृगजळामागे धावणाऱ्याच्या हाती काहीही लागत नाही.

Thursday, 3 June 2021

June 03, 2021

बोधकथा - संकुचित वृत्ती - Moral Story

 बोधकथा - संकुचित वृत्ती - Moral Story

एका छोट्याशा विहिरीतच आयुष्य व्यतीत करणाऱ्या बेडकाला समुद्रात राहणारा बेडूक भेटला. विहिरीतल्या बेडकाने विचारले, कसा असतो समुद्र? यावर समुद्रातल्या त्या बेडकाने माहिती दिली. विहिरीतल्या बेडंकाने जरा लांब उडी मारून विचारले, इतका मोठा असतो का समुद्र? समुद्री बेडकाने उत्तर दिले नाही. मग पुन्हा विहिरीतील बेडकाने अजून मोठी उडी मारली आणि विचारले, इतका मोठा असतो का समुद्र? 


दुसऱ्या बेडकाने नकारार्थी मान हलवली. असे बऱ्याच वेळ झाले. विहिरीतील बेडूक विहिरीत  उड्या मारायचा आणि समुद्रातील बेडूक त्याला म्हणायचा, यापेक्षा मोठा समुद्र आहे. असा जन्मभर उड्या मारत राहिलास तरी समुद्राएवढे अंतर तू दाखवू शकणार नाहीस. हे ऐकून त्या विहिरीतील बेडकाला राग आला. तो म्हणाला, तू खोटे बोलतो आहेस. या विहिरीपेक्षा जग मोठे असूच शकत नाही.


मला अंतर मोजता येणार नाही, असा कोणताच  समुद्र या जगातच नाही...! हे उत्तर ऐकून समुद्रातील बेडूक निघाला. जाताना म्हणाला, याला कारण तुझी संकुचित वृत्ती.

तात्पर्य : विहिरीसारखी कुंपणे घालून आपण त्या विहिरीतल्या बेडकासारखेच जगत असतो. अशी बंधने झुगारून देणे आवश्यक असते.

Wednesday, 2 June 2021

June 02, 2021

बोधकथा - जीवनमूल्ये - Moral Story

 बोधकथा - जीवनमूल्ये - Moral Story

एका दरिद्री मजुराला रस्त्यावर खोदकाम करत असता एक सुंदर शिल्प सापडले. घडीव दगडात कोरलेली ती सुंदर मूर्ती पाहून त्याला गावातील प्राचीन मूर्त्यांचा संग्रह करणाऱ्या बंडोपंतांची आठवण झाली. त्याने विचार केला की, त्यांना प्राचीन मूर्त्यां जमविण्याचा छंद आहे. ही मूर्ती जर मी त्यांना देऊन टाकली तर मला याची बरीच किंमत मिळेल. 


चला आजचा दिवस भाग्याचा आहे. बंडोपंतांची आर्थिक स्थितीही उत्तम होती. त्या मजुराने ती मूर्ती त्यांना दिली. बंडोपंतांनी त्याला थोडे पैसे दिले. ते पैसे घेऊन तो घरी गेला. त्याला खूप आनंद झाला. तो म्हणाला, छंद इतका वेडा असू शकतो, हे मला माहीतच नाही. इतकी जुनी मूर्ती; पण या बंडोपंतांनी केवढे पैसे दिले त्याचे!



चला आपल्याला काय पैसे मिळाल्याशी मतलब. इकडे बंडोपंतांनी मूर्ती स्वच्छ केली. ते मनात विचार करू लागले. बरीच वर्षे मूर्ती जमिनीत पडली होती. याची किंमत लाखांच्या घरात होती. या वेड्याने काही लाखांची दुर्मिळ मूर्ती मला कवडीमोल किंमतीत दिली. मूर्ख लेकाचा. जीवनातही असेच असते. जीवनमूल्यांची किंमतही अशीच बदलत असते. काही अनमोल गोष्टी आपण कवडीमोलाच्या ठरवतो. त्याचे मोल आपल्याला नसते.



तात्पर्य : जीवनमूल्यांची किंमतही अशीच परिस्थितीनुसार, व्यक्तीनुसार बदलते.

Tuesday, 1 June 2021

June 01, 2021

इयत्ता पहिली- गणित- 7.५ ची ओळख व लेखन

  इयत्ता पहिली- गणित- ५  ची ओळख व लेखन 


🍅 🍅 🍅 🍅 🍅      

पाच टोमेटो 


🍦  🍦 🍦 🍦  🍦   

   

   पाच आइसक्रीम



🌻  🌻 🌻 🌻  🌻    


पाच सुर्यफुले


🐄 🐄 🐄 🐄 🐄      


पाच गायी 










June 01, 2021

इयत्ता पहिली- गणित- 6.४ ची ओळख व लेखन

 इयत्ता पहिली- गणित- ४ ची ओळख व लेखन 




⌚⌚⌚⌚                चार घड्याळ  


🌸🌸🌸🌸              चार फुले 


🎈🎈🎈🎈                 चार फुगे 


🚓🚓🚓🚓             चार कार 


🌂🌂🌂🌂            चार छत्र्या