राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, अधिनियम 2005
अधिनियमाचे नाव :
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम, 2005
अधिनियमाची अंमलबजावणी : 20 जानेवारी 2006
अधिनियमाचा विस्तार : संपूर्ण भारत
अधिनियमातील एकूण कलमे 37
:
अधिनियमातील एकूण प्रकरणे : 7
अधिनियमाची रचना : अध्यक्ष 1
सदस्य 6 (यात कमीत कमी 2 महिला असतील)
अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती : केंद्रशासनाच्या वतीने नियुक्त करण्यात
येतील.
अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाल : नियुक्तीपासून तीन वर्ष
अधिकतम वयोमर्यादा : अध्यक्ष - 65 वर्ष
सदस्य - 60 वर्ष
पदावरून दूर करण्याचा अधिकार : केंद्रसरकारकडे असेल
आयोगाचा सदस्य सचिव : भारत सरकारच्या सहसचिव किंवा
अपर सचिव दर्जाचा अधिकारी
आयोगाचे प्रमुख कार्य :
1. बालहक्काच्या संरक्षणासंबंधीच्या तरतुदीची तपासणी
करणे.
2. बालहक्काच्या सुरक्षा उपायांचा अहवाल केंद्र शासनास
सादर करणे.
3. बालहक्काच्या उल्लंघनाची चौकशी करणे.
4. बालकांच्या हितासाठी प्रभावी उपाय योजना सुचविणे.
5. समाजात बालहक्काबाबत जागृती निर्माण करणे.
6. बालहक्क, सुधारगृहाची देखरेख करुन उपाययोजनाचा
विचार करणे.
कलम 3
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना :
केंद्र सरकार अधिसूचनेद्वारे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम, 2005 ची स्थापना करेल. या आयोगास विशिष्ट अधिकार प्रदान करण्यात येतील.
आयोगाची रचना :
अध्यक्ष : 01
सदस्य : 06 केंद्र शासनाकडून नियुक्त करण्यात येतील
महिला सदस्य : 06 सदस्यांपैकी कमीत कमी दोन महिला सदस्य असतील.
सदस्य निवडीचे निकष :
i) अनुरुप शिक्षण
ii) बालकाचे आरोग्य, कल्याण, काळजी, विकास या
संदर्भातील योगदान, अभ्यास व कार्य
iii) अपंग बालके, दुर्लक्षित बालके किंवा किशोर न्याय यासंदर्भात संवेदनशील
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق